रुद्राभिषेकानंतर
श्रीपादांचे जन्मस्थळी म्हणजेच त्यांचे आजोळ,
बापन्नाचार्य यांचे घरी गेलो.
बापन्नाचार्य यांचे घरी गेलो.
महासंस्थानापासून जवळच त्यांचे जन्मस्थान आहे.
बरेच जण असल्यामुळे छान दिंडीप्रमाणे, गजर करत निघालो.
येथे औदुंबर वृक्ष आहे त्याला राखी बांधण्याची प्रथा आहे.
खरंतर राखीपौर्णिमेला राखी बांधतात.
पण.... आता जेव्हा जाऊ तेव्हा राखी बांधता येते.
खरंतर राखीपौर्णिमेला राखी बांधतात.
पण.... आता जेव्हा जाऊ तेव्हा राखी बांधता येते.
आम्ही आठवणींने राखी नेली होती. पण तेथे राखी मिळते.
त्या औदुंबर वृक्षाजवळ आम्ही संस्कारभारती रांगोळी काढली
व शोभा यावी म्हणून पणत्या लावल्या.
मग तेथे फेर धरला, गजर म्हटला, बसून स्तोत्र गायली.
भजन म्हटले.
भजन म्हटले.
येथे एक छोटे मंदिर आहे तेथे तुपाचे तांब्याचे दीप लावले.
आवारातच एक हॉल आहे तेथे प्रदर्शन असते, कपडे, फोटो, काही वस्तू तेथे मांडलेल्या आहेत.
जेथे श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म झाला त्या खोलीत ज्योत लावलेली असते,
त्या ज्योतीचे शांत चित्ताने दर्शन घेतले.
श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म ज्योतीरूप झालेला आहे.
येथे अपंगामसाठी अन्नदान असते. तेथे पाणी वाढण्याची सेवा केली.
येथे आपण विशिष्ट दिवशी अन्नदान करू इच्छित असू तर
तो दिवस द्यायचा व पैसे भरायचे म्हणजे त्यादिवशी येथे अन्नदान केले जाते.
प्रसाद म्हणून फोटोफ्रेम, भजनाची सीडी, पुस्तक इ. मिळते.
No comments:
Post a Comment