लहानपणची......
सकाळी दोनही भावांना तेल उटणे लावून आंघोळ घालायची.
(माझ्या वडिलांना पण त्यांची बहिण अशीच आंघोळ घालायची,
(माझ्या वडिलांना पण त्यांची बहिण अशीच आंघोळ घालायची,
वडिल ते कौतुकाने सांगायचे. ते तिच्याकडे आदल्या दिवशीच जायचे.)
सगळ्यांचे जेवण झाले की मग औक्षण.
भावांना औक्षण करतांना आई सगळी तयारी हातात द्यायची,
भावांना औक्षण करतांना आई सगळी तयारी हातात द्यायची,
भाऊ नवे कपडे, टोपी घालून पाटावर बसायचे
मी परकर पोलका घालुन हातात तबक घेऊन किंचित वाकून उभी राहायची.
भावांना आई करंजी चकली असं बशीत द्यायची,
मी परकर पोलका घालुन हातात तबक घेऊन किंचित वाकून उभी राहायची.
भावांना आई करंजी चकली असं बशीत द्यायची,
आणि हातात चांदीचा एक एक रूपया
(राजा किंवा राणी छाप).
ओलं केलेल्या कुंकवाचा कुमकुम तिलक
(राजा किंवा राणी छाप).
ओलं केलेल्या कुंकवाचा कुमकुम तिलक
व अक्षता कपाळावर लावायच्या.
आणि भावांच्या हातात सुपारी द्यायची.
(काहीही भेटवस्तू नसली तरी चालेल पण औक्षण करणं महत्त्वाचं हा त्यामागे भाव आहे.)
औक्षण झालं की भाऊ प्रेमाने चकली करंजी देत मग चांदीचा रूपया.
औक्षण म्हणजे आयुष्यवान हो.
भरपूर आयुष्य लाभू दे.
卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐
आताच वाचनात असं आलं की.....एक छान मेसेज
.ツ.... .ツ.... .ツ.... .ツ.... .ツ.... .ツ.... .ツ.... .ツ.... .ツ.... .ツ.... .ツ.... .ツ....
कार्तिक शुद्ध द्वितीया भाऊबीज…!!!
बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा सण…!!!
हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया.
द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे.
म्हणूनच द्वितियेच्या चंद्रकोरीचे दर्शन घेतात. तेव्हा
म्हणूनच द्वितियेच्या चंद्रकोरीचे दर्शन घेतात. तेव्हा
‘बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो’
ही त्यामागची भूमिका आहे.
बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.
ज्या समाजात
भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या
संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात
निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस, म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस.
या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि
सायंकाळी
चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते.
भाऊ
मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.
No comments:
Post a Comment