Tuesday, 1 December 2015

महासंस्थानात दत्तयाग



१ डिसेंबर २०१३ 

यादिवशी  पिठापुरम् मंदिरातील सभागृहात दत्तयाग झाला.
येथे दत्तयागाची थोडी वेगळी पद्धत होती.
कुरवपुर येथील दत्तयाग मूळ मंदिराच्या बाजुला मोकळी जागा आहे तेथे झाला
पिठापुरम् ला मात्र मुळ मंदिरातील सभागृहात याग झाला.
दोन्ही याग हे सर्वांच्या कल्याणाकरीता केले.
याग सुरू असतांना चरितामृतातील ४५ ते ४८ अध्याय बऱ्याच जणांनी वाचले.
येथेही दत्तगुरुंना आमरसाचा अभिषेक केला.
याग सुरु असतांना असं लक्षात आलं की आरशात मंदिरातील तीनही देवांचे दर्शन होत आहे.
यागानंतर बारा चौदा गुरुजी मंत्रोच्चार करत होते
 यात दहा बारा वर्षे वयाची दोनतीन मुले सहभागी झाली होती.

दत्तात्रेयांची मुर्ती
चांदीचे बेलाचे पान वाहीले
कुरवपुरला सुद्धा






होम... सुंदर केलेली यज्ञ वेदी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~




आरती व पालखी सोहळा.!!


काकड आरती: सकाळी पाच वाजता असते, ती जेमतेम एक ते दोन मिनिटांची असते.
त्यानंतर देवांचे स्नान होतेे.
हा सोहळा आम्हाला बघता आला.
संध्याकाळी जी आरती होते त्यानंतरचा पालखी सोहळा......

अहाहा काय वर्णन करावे.?

तुतारीवर सिद्धमंगल स्तोत्र वाजवतात..
अप्रतिम...!!!

पालख्या दोन असतात.
एक चांदीची आणि दुसरी लाकडाची.
पालखी घ्यायची असेल तर सोवळे नेसावे लागते.
पालखीच्या वेळी आपण गायन, भजन, स्तोत्र म्हणू शकतो.
नंतर श्रीपाद श्रीवल्लभ यांना पाळण्यात बसवतात त्या पाळण्याला झोके देऊ शकतो.
पालखी घेऊन तीन प्रदक्षिणा घालतात. 

तर एक तास असतो हा सोहळा…!!!

आपण जेव्हा प्रदक्षिणा घालतो तेव्हा तेहेतीस पावलांची प्रदक्षिणा आहे.
पण..... हा पालखी सोहळा असतो ना.....
हा पालखी सोहळा वर्णन करण्यास माझे शब्द अपुरे पडत आहेत.

मला शब्दात वर्णन करता येत नाहीये.

मी ते मनात साठवून ठेवले आहे.

¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!¡!

No comments:

Post a Comment