Sunday, 8 November 2015

झोपाळा....


घरी पुन्हा एकदा झोपाळा लावला....

 आणि आनंद गगनात मावेना...!!!
 
काही वर्षापुर्वी पहिल्यांदा झोपाळा लावला तेव्हा ही असाच आनंद झाला होता.
म्हणजे अगदी लहान असतांनाच आपली ओळख या झोपाळ्याबरोबर होते.
     पाळणा, झोळी, दाराच्या चौकटीला बांधलेला झोका,
सूरपारंब्या, बंगळी....
नव्या रूपातले झोके पण खूप सुंदर असतात.

 जाळीचा noylon दोरीचा कुठेही बांधता येणारा त्यावर आडवे पडता येते relax वाटतं
वेताचा झोका, एकट्यांनी बसण्याचा
बगीचा किंवा बंगल्याच्या आवारातला झोपाळा त्याची शान काय वर्णावी…!!!
झोकाच घेणे पण त्या त्या वयाप्रमाणे प्रकार वेगळे…!!!
     गावाला मोठे झोपाळे असतात. एक अंगणात आणि एक माजघरात. कोणी आला गेला अंगणात झोपाळ्यावर टेके, गप्पा मारून निघून जाई.
माजघरातल्या झोक्यावर काम करता करता बसता येतं, मुलं दिवे लागणीला शुभंकरोति म्हणत,
 उकडायला लागलं की झोपाळ्यावर बसावं चार झोके घ्यावे, गारव्याचा आनंद घ्यावा.
सूरपारंब्या एक खेळ मुलांचा.
मी पण सूरपारंबी येते का बघितलं करून…!!!
श्रावणात झाडाला झोके बांधून मुली बायका झोके घेतांना मी आताच अलिकडे बघितलं, 
आधी नुसतंच ऐकलं होतं!

तर घरात झोपाळा बांधला मात्र......

सकाळी कॉफी पिणं, देवाचं म्हणणे, दुपारचं जेवण, संध्याकाळी शुभंकरोती म्हणणं,
रात्री झोपाळ्यावर बसून सिरिअल बघणं, ते बघता बघता जेवणे,
 झोपाळ्यावर बसून गाणं गुणणे हा तर माझा आवडता छंद …!!!
सारं काही झोपाळ्यावरच......
घरातला झोपाळा फार लहान नाही फार मोठा नाही.
आणि हो...
खूप आठवणी आहेत  झोपाळ्यासंबंधी…!!!

असा हा प्राणप्रिय झोपाळा माझा मित्रच होऊन गेला आहे.



|••| |••| |••| |••| |••| |••| |••| |••| |••| |••| |••| |••| |••| |••| |••| |••| |••| |••| |••| |••| |••| |••| |••| |••| |••|

No comments:

Post a Comment