रविवारची मस्त सकाळ..
चला जाऊ आज सुर्याला अभिवादन करायला...
मग झाले तयार....
दिवाळी आहे ना! तर कपड्यात थोडा बदल केला.
बाहेर पडले, गेटजवळ आले आणि.....
लक्ष वेधलं चंद्रकोरीने!!!!!
आज खरंतर द्वादशी.
बीजेची चंद्रकोर आवर्जून बघतात.
हं तर काय सांगत होते.... स्त्री जशी हौशीने कपाळावर चंद्रकोर रेखते तसंच वाटत होतं.
जणूकाही पृथ्वीने आपल्या भाळावर चंद्रकोर रेखली आहे.
चंद्रकोर त्यावर एक चांदणी आणि अजून थोड्या अंतरावर एक चांदणी!!!
सुंदर दृश्य....
नजर पुन्हा पुन्हा तिकडेच जात होती.

मग मात्र ती दिसत नव्हती. इमारती होत्या ना मोठ्या मोठ्या.
विल्सन कॉलेज जवळ आले तर घोळक्या घोळक्यांनी लोक धावतांना दिसले.
( आज बऱ्याच जणांचा टी-शर्ट लाल होता)
आणि फुटपाथवर त्यांना पाणी देण्यासाठी बिसलेरी कंपनीचे चारपाच लोक उभे होते. लोक पाणी पिऊन पुढे धावत होते. तसं पुढे दोन ठिकाणी दिसले असे कंपनीचे लोक.
मॅरेथॉनची प्रॅक्टीस सुरू आहे ना…!!!
शहीद ओंबळे, लो.टिळक यांना प्रणाम करून पुढे आले

आणि
पुन्हा चंद्रकोर दिसू लागली.
मग मात्र मी इकडे तिकडे न बघता हे सुंदर दृश्य बघतच चालू लागले.
अजूनही तसा काळोखच होता पण पुर्वेकडे मात्र इथून सुर्योदय होणार!!!
मग मात्र मी इकडे तिकडे न बघता हे सुंदर दृश्य बघतच चालू लागले.
अजूनही तसा काळोखच होता पण पुर्वेकडे मात्र इथून सुर्योदय होणार!!!
असा बदल आकाशात दिसू लागला. हा बदल बघत बसले समुद्र किनारी....
(आकाश वेगवेगळ्या रंगात दिसत होते)
मस्त…!!!
चला खूप वेळ आहे. सुर्यदर्शन व्हायला....
निघूया....
(आकाश वेगवेगळ्या रंगात दिसत होते)
मस्त…!!!
चला खूप वेळ आहे. सुर्यदर्शन व्हायला....
निघूया....
आणि सुंदर दिसलेल़्या चंद्रकोरीचे वर्णन लिहूया...
बीजेची चंद्रकोर घरातूनच दिसते.
पुर्वी माझी शेजारीण हाक मारून सांगायची....
बघ गं चंद्रकोर, बीज आहे आज!
बघ गं चंद्रकोर, बीज आहे आज!
****************************** ****************************** ****
No comments:
Post a Comment