Wednesday, 25 November 2015

कार्तिकी पौर्णिमा....


या दिवशी श्रीगणेशाचे मोठे भाऊ कार्तिक स्वामींचे दर्शन घेतात.
 विद्याप्राप्ती, ज्ञान मिळविण्याठी 
 त्याच्या २८ नावे असलेल्या प्रज्ञाविवर्धनम् स्तोत्राचा पाठ करतात.
आज कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले.
 याचदिवशी स्त्रिया स्वामींचे दर्शन घेऊ शकतात.
मोराचे पीस, पांढरी फुले घेतली. ती त्यांच्या चरणाशी वाहिली.
पण ती प्रसादरूपाने आपल्याला परत देतात.
दर्शनासाठी रांग होती.
याच रांगेत उभे राहून प्रज्ञाविवर्धनम् स्तोत्र म्हणत होते.
 (न मोजता, अनेक वेळा म्हटले) या स्तोत्रात कार्तिक स्वामींची २८ नावे आहेत.
ज्ञान मिळविण्यासाठी हे स्तोत्र म्हणतात.
देवळातून बाहेर पडतांना प्रसाद व सोनटक्क्याची छान उमललेली फुले मिळाली.
सकाळच्या प्रसन्न वेळी शांततेत कार्तिकेय स्वामींचे सुंदर दर्शन झाले.

    आता काही वर्षापुर्वीचा अनुभव.....

पुण्याला फिरायला म्हणून गेलो होतो.
चला पर्वतीला जाऊ....
पर्वती चढायला सुरुवात केली.
पर्वतीवर खूप बायका चढता उतरतांना दिसत होत्या!
 या आजुबाजुच्या परीसरातील बायका होत्या.
दुपारची वेळ, उन मी म्हणत होते. दमत दमत आम्ही चढत असतांना एक बाई म्हणाल्या ,
" जा लवकर, स्वामींचं मंदिर बंद होईल, आजच्याच दिवशी  हे मंदिर फक्त उघडतं"
(हे मंदिर थोडं मागच्या बाजुला आहे)
आम्ही भराभर आधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
त्यावेळी आम्हाला कळले की कार्तिक स्वामींचे काही ठराविक ठिकाणीच मंदिरं असतात
 व स्त्रियांसाठी फक्त कार्तिकी पौर्णिमेलाच दर्शन असते.










★*★*★*★*★*★*★*★*★*★*★*★*★*★*★*★*★*★*★*★*★*★*★*★*★

No comments:

Post a Comment