देव दिवाळी... !!!
दीपोत्सव...
त्रिपुरारी पौर्णिमा.....
बऱ्याच वर्षापुर्वी एक सुंदर अनुभव घेतला....
संध्याकाळी शंकराची पूजा करून यथाशक्य तेलाचे दिवे लावले जातात.
संध्याकाळी शंकराची पूजा करून यथाशक्य तेलाचे दिवे लावले जातात.
खिडकाळी येथील शंकराच्या मंदिरात आम्ही खूपजण गेलो होतो.
यजमान दांपत्याने शंकराची पूजा केली, बिल्वपत्रे वाहिली.
नंतर आम्ही तेलवात करून पणत्या भरून देत होतो.
नंतर आम्ही तेलवात करून पणत्या भरून देत होतो.
आणि यजमान दांपत्य ते दिवे
लावत होते.
सगळ्यात शेवटी एक मोठी पणती त्यांनी लावली,
आणि मग प्रत्येक
दिव्याला नमस्कार केला.
सर्व मंदिर परीसर या दिव्याने उजळून निघाला.
तिन्हीसांजेची वेळ, ह्या तेवत असलेल्या पणत्या....
तिन्हीसांजेची वेळ, ह्या तेवत असलेल्या पणत्या....
बहुतेकांचे पांढरे कपडे.
(शंकराला पांढरा रंग आवडतो)
अशा या सुंदर दृश्याचा आनंद घेत, दिलेला प्रसाद ग्रहण करत गप्पा मारत या
(शंकराला पांढरा रंग आवडतो)
अशा या सुंदर दृश्याचा आनंद घेत, दिलेला प्रसाद ग्रहण करत गप्पा मारत या
त्रिपुरी पौर्णिमेची संध्याकाळ आनंद आणि आठवणींचा ठेवा देऊन गेली.
तसंच एकदा मी दीपस्तंभ, (उंच दगडी स्तंभ)
हे देवळाच्या प्रवेशद्वारापाशीच असतात.
दिव्यांनी उजळवतांना बघायला गेले होते.
फारच सुरेख असतो हा सोहळा.
प्रथम पूजा केली जाते या दीपस्तंभाची.
फारच सुरेख असतो हा सोहळा.
प्रथम पूजा केली जाते या दीपस्तंभाची.
दिव्यात त्रिपुर वाती घालतात.
मग तेलाचे दिवे लावण्यासाठी त्यावर चढतात व
वर पासून खाली येत दिवे लावले
जातात.
No comments:
Post a Comment