Sunday, 29 November 2015

|| श्री गुरूदेव दत्त ||

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀


  २८ नोव्हेंबर २०१३ च्या सकाळी काकीनाडा येथून पिठापूरम् येथे आलो.
 आता पुढील चार दिवस आम्ही येथेच राहणार आहोत.
(१ डिसेंबर पर्यंत)
हे घर म्हणजे श्रीपाद वल्लभ यांच्या आत्याचे घर…!!!

व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांचे घर.

     या घराच्या मागच्या अंगणात श्रीदत्तात्रेयांचे सुंदर मंदिर आहे. 
समोरच औदुुंबर आहे त्याच्या खोडावर झोळी घेतलेले दत्तगुरू आहेत असे वाटते.


३० नोव्हेंबरला दत्तगुरू व त्यांच्या पादूकांची पूजा करण्याचा योग आम्हाला मिळाला.
 सुंदर पिवळी फुले व छान हार मिळाला, नेवैद्यासाठी डिंक लाडूचा प्रसाद....
सर्व उपलब्ध साहित्याने पूजा केली. काढलेल्या रांगोळीने शोभा आली.
पूजा केल्यावर मन प्रसन्न झाले.


तसेच श्रीपाद श्रीवल्लभ यांची प्रतिमा, पादुका असलेल्या नाण्यांवर अभिषेक केला.
 नंतर ती नाणी प्रसाद म्हणून सर्वांना दिली गेली.


शनिप्रदोष होता, मनात आलं की तुपाचे ११ दिवे लावावेत.
 म्हणून संध्याकाळी दिवे लावले, आरती केली व घोरातकष्ट स्तोत्र म्हटले.

     जेव्हा थोडा वेळ असेल तेव्हा 
सिद्धमंगल स्तोत्र, 
भजन, भक्तीगीतं यामुळे येथील वातावरण एकदम मस्त होते.

पूजेला वेगळे लोक बसत त्यामुळे वेगळ्या पूजा बघायला मिळत.
एकदिवस सुंदर पांढऱ्या खऱ्या उमललेल्या फुलांची पूजा मन मोहवून गेली.

बघत रहावे दत्तात्रेयांकडे असे मंद स्मित करणारे विलोभनीय रूप…!!!





: :  : :  : :  : :  : :  : :  : :  : :  : :  : :  : :: :  : :  : :  : :  : :  : :  : :  : :  : :  : :  : :



|| सिद्धमंगल स्तोत्र ||

 

 

श्रीमदनंत श्रीविभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ||


श्रीविद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ||


माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ||


सत्यऋषिश्वर दुहितानंदन बापन्नार्यनुत श्रीचरणा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ||


सवित्रुकाटकचयन पुण्यफल भारद्वाजऋषी गोत्रसंभवा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ||


दो चौपाती देव लक्ष्मी गण संख्याबोधित श्रीचरणा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ||


पुण्यरूपिणी राजमांबसूत गर्भपुण्यफल संजाता |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ||


सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ||


पीठिकापुरा नित्यविहारा मधुमतीदत्ता मंगलरूपा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ||


|| श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये ||

****************************************************************

श्रीदत्तप्रभुंचे प्रथम अवतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांना अत्यंत प्रिय असलेले

 सिध्दमंगल स्तोत्र नित्य वाचन करावे, जीवनात सकारात्मक बदल घडतात.


******************************
**********************************









No comments:

Post a Comment