Thursday, 5 November 2015

थंडी म्हणजे......


थंडी म्हणजे.. दिवाळी!!!
थंडी म्हणजे ..अभ्यंग!!!
थंडी म्हणजे... स्निग्धता,
खाण्यापिण्याची रेलचेल
थंडी म्हणजे रंगीबेरंगी कपडे
थंडी म्हणजे... लोकरीचे कपडे
थंडी म्हणजे... सहल, ट्रीप
थंडी म्हणजे.... हुःहुःहुःSss
(खरंतर हा तोंडाने येणारा आवाज.... लिहिता येत नाही)

तोंडातून वाफा,
हात हातावर चोळून ऊब निर्माण करणं...
गरमागरम चहा पिणं !!!

थंडी म्हणजे … शेकोटी
गप्पाटप्पा.....
ऑक्टोबरचा शेवट आणि नोव्हेंबरची सुरुवात थंडीची चाहुल देऊन गेला.
ओठ कोरडे व्हायला लागलेत, घसा कोरडा होऊ लागला. सकाळी जरा लोळत राहू लागलो,
 पहाटेची गुलाबी थंडी जाणवू लागली.
आणि हो......
 नाक्यानाक्यावर नेपाळी लोक वुलन कपडे घेऊन बसू लागलेले दिसू लागले.
 दुकानं तर थंडीच्या आधुनिक कपड्यांनी सजली की....
मन मोहवून टाकणारे हे कपडे.…....
पुढे येणारे सण तर... मस्त !!

काहीही खा आणि कितीही खा म्हणणारे!!!
 आणि ऋतु तर सांगतोय.... बिनधास्त खा.

थंडी आणि स्निग्धता हे समीकरण.

 स्निग्धता या नावातच केवढा गोेडवा आहे ना....

आता हळूहळू दिवस लहान आणि रात्र मोठी होत जाणार
मजेत स्वागत करुया

या आवडत्या शीतल ऋतुचे!

(•) (•) (•) (•) (•) (•) (•) (•) (•) (•) (•)(•) (•) (•) (•) (•) (•) (•) (•) (•) (•) (•)(•) (•) (•) (•) (•)

No comments:

Post a Comment