Tuesday, 3 November 2015

फराळ, दिवाळीचा.....


परंपरागत की नव्या जमान्याचा, मुलांना आवडणारा????
     चकली, कडबोळी,चिवडा, शेव, बोरं, लाडू- रवा, बेसन,
करंजी, म्हटलं की ओल्या नारळाची, खोबऱ्याची, पुटाची....
शंकरपाळे- गोड, खारे....
अनारसे, चिरोटे.....
सुरूवात होते तिच मुळी आमच्यावेळी ना.....
पायलीचा डबा भरून फराळाचे पदार्थ बनवत होतो....
खरंय…!!!
त्यावेळी घरात माणसं भरपूर असायची,
करणारे हात पण भरपूर तसंच खाणारेही आवडीने खात असत.
बरं हे पदार्थ सुद्धा फक्त दिवाळी किंवा घरात शुभ कार्य असेल तेव्हाच बनत असत.
 त्यामुळे त्याचं अप्रुप होतं.
शकुनाच्या म्हणून करंज्या हव्यात.
लक्ष्मीपूजनाला अनारसे हवेत.
चिवड्यावर शेव हवी.
कडबोळी फक्त दिवाळीतच बनतात.
चकली लोणी किंवा चकली दही छान लागतं.
शंकरपाळे खुसखुशीत सुंदर लागतात.
म्हणजे काय.... तर सगळे पदार्थ बनवले जायचेच.
बरं, हे पदार्थ स्निग्ध!
त्यावेळी ऋतु सुद्धा थंडीचा!
त्यामुळे हे पदार्थ खाल्ले तरी त्रास होत नसे,
पै पाहुणे,
घरात कोणाचा दिवाळसण, नातेवाईकांना घरी फराळ देण्याची पण पद्धत होती.
आता झालंय काय!!!!
की घरात माणसं पण कमी, त्यात आवडीने खाणारे कमीच.
तयार करायला वेळेची कमी, आणि एवढी मेहनत घेऊन,
 वेळ काढून केलेले पदार्थ एकदोनदा खाण्यातच मजा वाटते.
आतातर रोजचीच दिवाळी आहे.
मनात येईल तेव्हा आवडता पदार्थ आणावा पाव किलो. आणि लगेच संपवावा. असे विचार आणि दिवस.
त्यामुळे फराळाचे पदार्थ घरी बनवण्यापेक्षा कुठे चांगले मिळतात ते वर्षभर बघावे.
 आणि दिवाळीच्या महिन्यात ऑर्डर देऊन आणावेत आणि मजेत खावेत असा विचार असतो,
आता तर दिवाळी आली की असं म्हणतात …
की हे तेलाचे पदार्थ केले की तळणीमुळे खोकला होतो.
आणि त्यात नंतर ते खाल्ल्यामुळे खोकला अजूनच वाढतो.
(त्या तळणीच्या तेलाचं काय करायचं हा प्रश्नच असतो.)

तरीपण बदल म्हणून काय करू शकतो????
रवा-बेसन लाडू यापेक्षा कधीतरी केले जाणारे पण 
थंडीच्या दिवसात खावे असे डिंक, आळिव लाडू करू शकतो.
थंडी पडलीच दिवाळीत तर आल्याच्या वड्या (आलेपाक) करूया.
नुसताच सुका मेवा खाऊया.
खजूर+मारी बिस्किट रोल येईल करायला.
डाळींचे डोसे,
सकाळी नाश्ता म्हणून करता येईल.
मेदुवडे सांबार चटणी.....
जेवतांना दहीवडे स्पेशल डीश म्हणून येईल करायला..

आणि असं आवडेल खायला.
कुठलाही पदार्थ ताजा करून खायचा.
मग काय मज्जाच मज्जा...!!!

तुम्हीपण असं काही वेगळं करत असाल तर सांगा...


★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★


एक रिप्लाय:
तुझी आजची रांगोळी छान!
आता तुझ्या लिखाणाबरोबर रोज नवी छान रांगोळी पण पाहता येईल.
एक बुद्धीला खाद्य,
तर दुसरे नेत्र सुख…!!!
आजचे तू वर्णन केलेले दिवाळीचे पदार्थ म्हणजे रसनेला मेजवानी आणि कल्पकतेलाही मेजवानी…!

कुठला खाद्यप्रकार करायचा दिवाळीला???

मी अळीव लाडू, गुळपापडी वड्या,
चीझ खारे शंकरपाळे, तर कधी शेजवान शंकरपाळे,
भणंग,
 खजूर बिस्किटचुरा बॉल्स,
मिक्स पिठाचे लाडू,
बेसन ऐवजी सर्व पिठे

 आवडीप्रमाणे+ तीळ+ खोबरे + खसखस+ खारीकपावडर + पोहे तळून 

 म्हणजेच हेल्दी लाडू.

ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़़ंं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़

No comments:

Post a Comment