Wednesday, 4 November 2015

फोनवर बोलतांना......


फोनवर बोलतांना
 आपण प्रथम हॅलो, हाय, नमस्कार अशा शब्दांनी सुरूवात करतो.

आपलं काही काम असेल तर 
त्याप्रमाणे कल्पना देतो की माझं असं काम आहे म्हणून मी फोन केला आहे.

जर आपण गप्पा मारायला फोन केला असेल तर
 तशी कल्पना द्यावी- विचारावे की तुला वेळ आहे का?? 
मी सहज गप्पा मारायला फोन केला आहे.

लँडलाईनवर फोन करत असू तर आपले नाव प्रथम सांगावे.
काहीजण परीक्षा बघितल्यासारखे विचारतात- ओळख बरं मी कोण????
समोरचा कुठल्यातरी वेगळ्याच कामात असतो,
 त्याला एखादवेळेस वेळ नसतो, मस्करीची मनःस्थिती नसते.

फोन करून जर आपण घरी जाणार असू तर 
आपण जेवायला येणार आहोत की नाही ते स्पष्ट सांगावे.
कमीतकमी बोलून आपले संभाषण संपवावे.

############################################

No comments:

Post a Comment