Monday, 30 November 2015

श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान.....


रुद्राभिषेकानंतर

श्रीपादांचे जन्मस्थळी म्हणजेच त्यांचे आजोळ,
बापन्नाचार्य यांचे घरी गेलो.

महासंस्थानापासून जवळच  त्यांचे जन्मस्थान आहे.
बरेच जण असल्यामुळे छान दिंडीप्रमाणे, गजर करत निघालो.

येथे औदुंबर वृक्ष आहे त्याला राखी बांधण्याची प्रथा आहे.
खरंतर राखीपौर्णिमेला राखी बांधतात.
पण.... आता जेव्हा जाऊ तेव्हा राखी बांधता येते.
आम्ही आठवणींने राखी नेली होती. पण तेथे राखी मिळते.

त्या औदुंबर वृक्षाजवळ आम्ही संस्कारभारती रांगोळी काढली

 व शोभा यावी म्हणून पणत्या लावल्या.

मग तेथे फेर धरला, गजर म्हटला, बसून स्तोत्र गायली.
भजन म्हटले.

येथे एक छोटे मंदिर आहे तेथे  तुपाचे तांब्याचे दीप लावले.

आवारातच एक हॉल आहे तेथे प्रदर्शन असते, कपडे, फोटो, काही वस्तू तेथे मांडलेल्या आहेत.

जेथे श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म झाला त्या खोलीत ज्योत लावलेली असते,

 त्या ज्योतीचे शांत चित्ताने दर्शन घेतले.
श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म ज्योतीरूप झालेला आहे.


येथे अपंगामसाठी अन्नदान असते. तेथे पाणी वाढण्याची सेवा केली.
येथे आपण विशिष्ट दिवशी अन्नदान करू इच्छित असू तर
 तो दिवस द्यायचा व पैसे भरायचे म्हणजे त्यादिवशी येथे अन्नदान केले जाते.
प्रसाद म्हणून फोटोफ्रेम, भजनाची सीडी, पुस्तक  इ. मिळते.

       <><><><><><><><><><><><><><><><><><>

 

त्या औदुंबर वृक्षाजवळ आम्ही संस्कारभारती रांगोळी काढली

 

छोटे मंदिर आहे तेथे  तुपाचे तांब्याचे दीप लावले.



 




Sunday, 29 November 2015

प्रदक्षिणा.... प्रसाद...

प्रदक्षिणा.... प्रसाद...


आम्ही जमेल तेव्हा १०८ प्रदक्षिणा घालुया असे ठरवले... 
तीन दिवस मी १०८ प्रदक्षिणा घालू शकले.
प्रदक्षिणा घालतांना सहज मनात आले म्हणून पावले मोजली ती ३३ झाली
मला हा योगायोग वाटला
(चरितामृतात ३३ या अंकाचे महत्त्व दिले आहे)

प्रसाद.....

     मी एकएक दिवस वेगळा प्रसाद दाखवत होते.
मोठे साखरफुटाणे,
गूळाची ढेप,
राजगीरा चिक्की,
पत्री साखर व शेंगदाणे.
असा नेवैद्य दाखवला.
पण जेव्हा राजगीरा चिक्की व गुळाचा नेवैद्य दाखवला
 तेव्हा तो मंदिरातच ठेवला याचे समाधान वाटले.

     यागाचे दिवशी पेढ्यांचा नेवैद्य दाखवला आणि तो वाटला.
     शनिप्रदोषाचे दिवशी हलव्याचा प्रसाद वाटला.
हलवा श्रीपाद श्रीवल्लभ यांना फार आवडत असे.
 त्यांची आजी त्यांना करून देत असे.
 चांदीच्या वाटीत देत असे 

~~~~••••~~~~~••••~~~~••••~~~~~••••~~~~••••~~~~~••••~~~~••••~~~~~••••

शनिप्रदोष :

यादिवशी आम्ही मंदिरात सामुहिक १०८ तुपाचे दिवे लावले. औदुंबराभोवती.


त्यानंतर आवळ्याचे झाड आहे 
तेथे श्रीपादांची एक फ्रेम व छोटे मंदीर आहे
 तर झाडाभोवती जो पार आहे 
त्या पारावर ११ तुपाचे दिवे लावले.

 जेथे आमचे वास्तव्य होते तेथे
 दत्तात्रेयांसमोर ११ तुपाचे दिवे लावले.


[•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•]

अन्नावरम् मंदिर, सत्यनारायण मंदिर:

हे दुमजली मंदिर आहे.
वरच्या मजल्यावर मुखदर्शन तर खालच्या मजल्यावर धड व पाय यांचे दर्शन ......

ब्रह्म कमळावर उभे आहेत सत्यनारायण...!!!

येथे सुद्धा अकरा तुपाचे दिवे लावले.... झाडाच्या पाराभोवती.







अभिषेक......

मुख्य मंदिरात .....


   पाषाणांच्या पादुकांवर अभिषेक केला जातो.
      पंचामृत, नारळपाणी, संत्रारस, आमरस, सुकामेवा भस्म याचा अभिषेक होतो.
जेव्हा पादुकांवर दुधाचा अभिषेक होतो तेव्हा त्या खूप सुंदर दिसतात.
जेव्हा मधाचा अभिषेक होतो तेव्हा त्या सोन्याच्या भासल्या.
हे सर्व नंतर प्रसाद म्हणून ग्लासमधुन देतात.

पाण्याचा अभिषेक होतो ते तीर्थ म्हणून वाटतात.
भस्म नंतर अंगारा म्हणून आपण घेऊ शकतो.
पादुकांना अष्टगंध लेपन करतात हे सुद्धा नंतर वाटतात.

चित्रा नक्षत्र पूजन...

आम्ही स्वतंत्र पैसे भरून अभिषेक केला.
यासाठी ऑफिसमधे आदल्या दिवशी पैसे भरावे लागतात.
गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र धरतात.
ज्यांनी पैसे भरले असतील त्यांचे नाव पुकारतात.
(आपण बसून मंदिरात होणारा अभिषेक- याचा अनुभव घ्यायचा)
२९ नोव्हेंबर ....
चित्रा नक्षत्र पूजन सगळ्यांनी मिळून केले. त्यावेळी अभिषेक केला.

३० नोव्हेंबर

शनिप्रदोष....

त्यावेळी अभिषेक झाला.
पाषाण पादुकांवर अभिषेक झाला की त्यावर चांदीच्या पादुका ठेवतात.
 पादुकांच्या मागेच चांदीची दत्तात्रेयांची मुर्ती आहे. त्यावर फुले वाहतात.
ही फुलाची सजावट, फुलं अर्पण करणं, फुलं वाहणं हा छान सोहळाच असतो. 
गुरुजी सुंदर व झटपट हा सोहळा… करतात.
श्रीदत्तात्रेय, नृसिंह सरस्वती, व श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या 
संगमरवरी मुर्तींना सुंदर हार- फुलांचे व तुळशीचे अर्पण करतात.
खुप खुप देखणे बघत राहावे असे दृश्य.... बघत राहावे असे....
हे पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.

 संध्याकाळी 
काळे तीळ , काळे कापड , काळे उडीद , काळ्या दोऱ्यात लवंगा बांधुन  असे गुरुजींना दान दिले

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

फोटो.... विलोभनीय दत्तात्रेय पुजेचे


वेगवेगळ्या दिवशीच्या पूजा…...


|| श्रीदत्तात्रेय ||
सुंदर
 तुळशीहार व  कमळ 
यांनी केलेली पुजा


पिवळ्या फुलांनी केलेली पूजा




शनिप्रदोष
यादिवशी केलेली पूजा
आणि रांगोळी






गुरूदेव दत्तात्रेयांच्या पादुका
पिवळी फुले कमळ
दुध दही केळं सुकामेवा
श्रीपाद यांच्या प्रतिमा असलेली नाणी, त्यावर अभिषेक
वेगवेगळ्या दिवशींची पादुकांची पूजा व अभिषेक










 शनिप्रदोष
या दिवशी संध्याकाळी तुपाचे दिवे लावले



नीट बघितले तर श्रीदत्तात्रेय आहेत असे वाटते








|| श्री गुरूदेव दत्त ||

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀


  २८ नोव्हेंबर २०१३ च्या सकाळी काकीनाडा येथून पिठापूरम् येथे आलो.
 आता पुढील चार दिवस आम्ही येथेच राहणार आहोत.
(१ डिसेंबर पर्यंत)
हे घर म्हणजे श्रीपाद वल्लभ यांच्या आत्याचे घर…!!!

व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांचे घर.

     या घराच्या मागच्या अंगणात श्रीदत्तात्रेयांचे सुंदर मंदिर आहे. 
समोरच औदुुंबर आहे त्याच्या खोडावर झोळी घेतलेले दत्तगुरू आहेत असे वाटते.


३० नोव्हेंबरला दत्तगुरू व त्यांच्या पादूकांची पूजा करण्याचा योग आम्हाला मिळाला.
 सुंदर पिवळी फुले व छान हार मिळाला, नेवैद्यासाठी डिंक लाडूचा प्रसाद....
सर्व उपलब्ध साहित्याने पूजा केली. काढलेल्या रांगोळीने शोभा आली.
पूजा केल्यावर मन प्रसन्न झाले.


तसेच श्रीपाद श्रीवल्लभ यांची प्रतिमा, पादुका असलेल्या नाण्यांवर अभिषेक केला.
 नंतर ती नाणी प्रसाद म्हणून सर्वांना दिली गेली.


शनिप्रदोष होता, मनात आलं की तुपाचे ११ दिवे लावावेत.
 म्हणून संध्याकाळी दिवे लावले, आरती केली व घोरातकष्ट स्तोत्र म्हटले.

     जेव्हा थोडा वेळ असेल तेव्हा 
सिद्धमंगल स्तोत्र, 
भजन, भक्तीगीतं यामुळे येथील वातावरण एकदम मस्त होते.

पूजेला वेगळे लोक बसत त्यामुळे वेगळ्या पूजा बघायला मिळत.
एकदिवस सुंदर पांढऱ्या खऱ्या उमललेल्या फुलांची पूजा मन मोहवून गेली.

बघत रहावे दत्तात्रेयांकडे असे मंद स्मित करणारे विलोभनीय रूप…!!!





: :  : :  : :  : :  : :  : :  : :  : :  : :  : :  : :: :  : :  : :  : :  : :  : :  : :  : :  : :  : :  : :



|| सिद्धमंगल स्तोत्र ||

 

 

श्रीमदनंत श्रीविभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ||


श्रीविद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ||


माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ||


सत्यऋषिश्वर दुहितानंदन बापन्नार्यनुत श्रीचरणा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ||


सवित्रुकाटकचयन पुण्यफल भारद्वाजऋषी गोत्रसंभवा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ||


दो चौपाती देव लक्ष्मी गण संख्याबोधित श्रीचरणा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ||


पुण्यरूपिणी राजमांबसूत गर्भपुण्यफल संजाता |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ||


सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ||


पीठिकापुरा नित्यविहारा मधुमतीदत्ता मंगलरूपा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्रीविजयीभव ||


|| श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये ||

****************************************************************

श्रीदत्तप्रभुंचे प्रथम अवतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांना अत्यंत प्रिय असलेले

 सिध्दमंगल स्तोत्र नित्य वाचन करावे, जीवनात सकारात्मक बदल घडतात.


******************************
**********************************









Friday, 27 November 2015

पिठापुरम फोटो



         गेटवर (कमानीवर) असं छोटं मंदिर
 जेथुन आपण आत शिरतो ती कमान


 आवळ्याच्या पारापाशी छोटे मंदिर




 पारापाशी फ्रेम



  चांदीचे दरवाजे, मुख्य मंदिर, उजवीकडे छोटे पादुका मंदिर आणि औदुंबर



 ।। दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा ।।
ज्यांच्या दर्शनाची ओढ होती ते.... श्रीदत्तात्रेय…!!! चेहऱ्यावर मंद स्मित चेहरा किंचित उजवीकडे झुकलेला.
श्रीपाद श्रीवल्लभ …!!!
नृसिंह सरस्वती…!!!





 पण येथे फोटो काढू नये असं लिहिलं होतं, मग हा फोटो देऊळबंद या सिनेमातून घेतला.





गोशाळा








 रामस्वामी यांचा पाठमोरा फोटो....
ते जात होते त्याच बाजुला गोशाळा …!!!





अगदी उजवीकडे आरशात दिसणारे ,
 मंदिरातील मुळ मुर्ती…. थोडं अस्पष्ट आहे


औदुुंबर, छोटे पादुका मंदिर..!!


मुळ मंदिराचा मागील भाग















मंदिराबाहेर असलेले पोस्टर
मूळ मंदिरातील मूर्ती
पादुका
त्यामागे दत्त मूर्ती

रामस्वामी















२८ नोव्हेंबर २०१३

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀


सकाळी काकीनाडा येथून पिठापूरम् येथे आलो. 
आता पुढील चार दिवस आम्ही येथेच राहणार आहोत.
हे घर म्हणजे श्रीपाद वल्लभ यांच्या आत्याचे घर…!!!
व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांचे घर.

卐   卐   卐   卐   卐   卐   卐   卐   卐   卐

पिठापुरम् महासंस्थान...

मला वाटतं हे मंदिर १९८४ या वर्षी बांधले.
दोन्ही बाजुच्या गेटवर श्रीपाद श्रीवल्लभ यांचे छोटे मंदीर आहे.
 जणूकाही ते येणाऱ्या भक्ताचे स्वागत करत आहेत.
आत आल्यावर आवळ्याचे झाड, त्याला पार आणि छोटेसे मंदिर श्रीपादांचे.
 आणि एक मोठी फ्रेम आहे.
मुख्य मंदिर १०×१० चे असावे.
मंदिराचे दरवाजे चांदीचे आहेत.
सभागृह नंतर बांधले.

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

मंदिरात समोरच श्रीदत्तात्रेय,

 डावीकडे श्रीपाद श्रीवल्लभ
उजवीकडे नृसिंह सरस्वती

अप्रतिम, सुंदर, विलोभनीय,  नितांत सुंदर असे दर्शन…!!!

     या मंदिराला लागूनच औदुुंबर व छोटे पादुकांचे मंदिर आहे.
     उजव्या बाजुला समोर एक आरसा आहे यात सुद्धा दर्शन मस्त होते.

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

     ज्यांना पारायण करायचं असेल त्यांना मंदिरामागे सभागृहात बसून पारायण करता येते.
     येथुन हलुच नये असे वाटत होते.
     येथे कितीही वेळ दर्शन घेत उभे राहिले, बसले तरी कोणी काही बोलत नाहीत.
      येथे भजन गायन सेवा देऊ शकतो, गजर म्हणू शकतो.
दर्शन घ्यायला घाई-गडबड नाही.-

अभिषेक झाल्यानंतर....

     तीर्थ ठेवलेले असते ते बाटलीत घेऊ शकतो.
     अष्टगंध पादुकांना लेपन केलेले असते ते प्रसाद म्हणून वाटतात,
 ते आपण घरी आणू शकतो.
अभिषेक- पंचामृत, आमरस, सुकामेवा, संत्रारस, नारळपाणी यांचा करतात.
 ते प्रसाद म्हणून ग्लासमधुन देतात.
     आपण श्रीपादांना आवडणारा हलवा प्रसाद म्हणून वाटू शकतो,
ऑफिसमधे पैसे भरले की तो तयार करून देतात.

     येथे सुंदर गोशाळा आहे.

गोशाळेतील गायी बघण्यात रमून गेले.


मंदिरातच आम्हाला रामस्वामी यांचे दर्शन झाले.

 त्यावेळी आम्ही प्रदक्षिणा घालत होतो. 
त्यांनी मुख्य मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यावेळी मी प्रदक्षिणा घालत होते.
 नंतर ते प्रदक्षिणा घालत असतांना आम्ही एका बाजुला उभे राहिलो आणि दर्शन घेतले.
 मग ते त्यांच्या स्थानावर जाऊन बसले.
 मग सर्वांनी ओळीने दर्शन घेतले.
 ते निघाले तेव्हा त्यांचा पाठमोरा फोटो घेता आला.

**********************************************

महासंस्थानाची धर्मशाळा सोयींनी युक्त आहे.
राहण्यासाठी छान खोल्या, 
आंघोळीसाठी गरम पाणी मिळते.
सकाळी चहा,कॉफी मिळते, दोन्ही वेळेला प्रसादाचे जेवण मिळते.

**********************************************

पंचदेव पहाड.....


वल्लभपूर येथून आम्ही पंचदेव पहाड येथे आलो.
येथे श्रीपाद श्रीवल्लभ यांचे वास्तव्य होते.
 हे श्रीपाद श्रीवल्लभ यांचे दरबार स्थान व तपस्या भूमी आहे
गावकऱ्यांचे प्रश्न ते सोडवत असत.
आता या ठिकाणी ....
श्रीपाद श्रीवल्लभ व देवीचे मंदिर आहे.
येथेच... गजानन महाराज, 
अक्कलकोट स्वामी, 
नवनाथ शंकर महाराज,
रामदास स्वामी,
नृसिंह सरस्वती, माणिकप्रभू
यांच्या मूर्ती आहेत.
सुंदर मुर्ती आहेत.
नावात जरी पहाड हा शब्द असला तरी हा काही पहाड नाही.


ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ंं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़


     पंचदेव पहाड येथील दर्शनानंतर मक्ताल येथे आलो
 जेवण झाल्यावर गाड्या करून वाडी जंक्शनला आलो.
ही तारीख २६ नोव्हेंबर २०१३. रात्र !


सामलकोटला जाताना गोदावरी नदीचे खूप मोठे पात्र बघितले
 रेल्वेने २७ नोव्हेंबरला रात्री ८.०० च्या दरम्यान सामलकोटला उतरलो.
 जीपने पिठापुरम् संस्थान येथे आलो.
उशीर झाला होता त्यामुळे अन्नछत्रामध्ये  प्रसादाचे जेवण केले...
पण.... मंदिर मात्र बंद झाले

पूर्ण रात्रीची प्रतिक्षा…!!!

श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दर्शनाची.....

काकीनाडा येथे हॉटेल वास्तव्य होते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Thursday, 26 November 2015

वल्लभपूर :

卐   卐   卐   卐   卐   卐   卐   卐   卐


                                            यागानंतर हरगोलमधे बसून वल्लभपूरला गेलो.






                वल्लभपूरला प्रसादाचे जेवण झाल्यावर तेथे एका मंदिराचे बांधकाम सुरू होते तेथे गेलो.

                                                                    येथे एक हॉल आहे
                                                  तेथे श्रीपाद श्रीवल्लभ यांची एक फोटोफ्रेम आहे.



                          तेथे भिंतीवर काही क्षण टक लावून बघायचे  व नंतर डोळे मिटायचे,
                                                      मला तरी हनुमंताचे दर्शन झाले.







                                                     औदुुंबर, दत्तात्रेय मंदीर.
                                         येथील त्रिशुल व शिळा वैशिष्ट्यपूर्ण आहे.
                                                        सुंदर असं दर्शन…!!!
              मनात काही इच्छा धरून २७ प्रदक्षिणा केल्या तर मनातील इच्छा पूर्ण होते, असं सांगितलं.






                                              पहिल्या मजल्यावर देवीचं मंदिर आहे
                                      दुसऱ्या मजल्यावर शाळीग्राम व दत्तात्रेय मंदिर आहे.
                                                     सुंदर असं हे वल्लभपूर,
                                        संथ वाहते कृष्णामाई.... सुंदर असं तिचं दर्शंन,
                                                        पलिकडे कुरवपूर
                                            जेथे श्रीपाद श्रीवल्लभ यांचे वास्तव्य होते,
                                                  टेंबेस्वामींनी साधना केली.
पंचवड ....
हरगोलमधील अविस्मरणीय प्रवास,
सुंदर असा सुर्योदय....




 

 पुन्हा कधी जायला मिळेल ????

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

यागानंतर....

-:- -:- -:- -:- -:- -:- -:- -:- -:-


     कृष्णामाईची ओटी भरायची होती त्यांनी गुरूजींच्या पत्नीची ओटी भरली.

     टेंबेस्वामी जेथे ध्यान करत त्या गुहेचे दर्शन घेतले. येथे रांगत किंवा बसत बसत जावे लागते,
 काळोख आहे, येथे शांततेचा अनुभव घेतला
    या गुहेवर आता शिवलिंग स्थापले आहे. महादेवाचे दर्शन घेतले.
    

    नंतर
     आम्ही केलेला जप ....
ॐ नमः शिवाय हा कृष्णेला अर्पण केला.

     हरगोल मधे बसल्यानंतर,
ज्यांना प्रत्यक्ष कृष्णामाईची ओटी भरायची होती त्यांनी ओटी भरली.

★ ज्यावेळी नदीला पाणी कमी असते, हरगोलमधून प्रवास करता येत नाही,
 चालत कृष्णेचं पात्र पार करावं लागतं....
त्यावेळी
श्रीपाद श्रीवल्लभ जेथे प्रातःकाली साधना करीत,
 सूर्यनमस्कार घालत ती शिळा.....बघायला मिळते.
आजही त्रिशुलधारी स्वामींचे दर्शन होते. 

येथेच श्रीपाद स्वामींच्या चरणपादुका उमटल्या आहेत. 
 तिकडे जाता येते.
ती जागा, ती शिळा कोठे आहे ते दाखवले.

(ती शिळा आम्हाला बघता आली नाही. साधारण मार्च नंतर जाता येत असेल)

हरगोलमधे बसलो असतांना दूरवर ते ठिकाण दाखवले.

****************************************************************

श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थान श्रीक्षेत्र कुरवपूर

.     दिगंबरा दिगंबरा
।।श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

            ।।श्री।।

               ॐ

श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थान
       श्रीक्षेत्र कुरवपूर

असं गेटवर लिहिलेलं आहे.
येथून आपण आत जातो.
 तेव्हाच आपल्याला औदुुंबराचा पार दिसतो आणि 
तेथेच दोन छोटी देवळं पारावर दिसतात.
१) हे शंकराचं मंदिर
२) हे हनुमानाचं मंदिर

नंतर दिसतं ते मुख्य मंदिर.

     मुख्य मंदिरात .....
श्रीपाद श्रीवल्लभांची श्रीदत्तमहाराजांच्या रुपात नितांत सुंदर अशी मुर्ती आहे.
 या दर्शनाने मन प्रफुल्लीत होते.
 त्यापुढेच निर्गुण पादुका आहेत.
मुख्य मंदिराच्या बाहेर सभागृहात निरनिराळ्या देवांच्या फ्रेम्स आहेत.












   



 २६ नोव्हेंबर २०१३
 यादिवशी दत्तयाग करणार होतो.
 दत्तयागाची तयारी या पाराजवळ केली होती.
८.३० वाजता  यागाला सुरूवात झाली.
पंचधातूची दत्तात्रेयांची मूर्ती पुरातन आहे.
प्रथम पंचनद्यांच्या पाण्याने अभिषेक केला. 
गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा नर्मदा.
नंतर नारळपाणी, आमरस, पंचामृताचे अभिषेक केले.

 

 

दत्तात्रेयांना स्नान घातले व पूजा केली



आमरस अभिषेक



यानंतर सुंदर फुलांनी सजवले. सर्वांतर्फे पितांबर व उपरणं अर्पण केले.
यानंतर सुंदर फुलांनी सजवले. सर्वांतर्फे पितांबर व उपरणं अर्पण केले.

 नवग्रहांची पूजा केली.
प्रत्यक्ष होमाला/यागाला सुरूवात झाली.
सोवळं नेसलेल्या पुरूषांना हवन करता येते. आहुती होमात अर्पण करता येतात.
स्त्रियांना मात्र आहुती होमात अर्पण करता येत नाहीत, एकत्र करून गुरूजी अर्पण करतात.
त्यानंतर आरती झाली. प्रसाद वाटला.























----------------------------------------------------------------------------------------------------------------------------














चला कुरवपूरला

२६ नोव्हेंबर २०१३

सकाळी मक्ताल येथून गाडीने निघालो.
 सकाळची सुप्रसन्न वेळ....
झुंजुमुंजु होऊ लागले होते.
अजून सुर्योदय व्हायचा होता.
गाड्या वल्लभपूरला आल्या.
गाडीतून उतरल्यावर समोरच शांत, संथ कृष्णामाईचे दर्शंन…!!!

आणि पाण्यात हरगोल/बुट्ट्या दिसत होत्या. यातूनच आम्ही कुरवपूरला जाणार होतो.

हरगोल म्हणजे चटईची टोपलीच असते.

  यात टायर ठेवला होता. 
त्यावर बसून आमचा या तिरावरून त्या तिराकडे प्रवास सुरू झाला. 
एका बुट्टीत सात ते आठ जण बसतात.
पाचसात मिनिटातच आम्ही कुरवपूरला पोहोचलो.

जात असतांना सुंदर असा सुर्योदय होत होता

 आम्ही गजर करत श्लोक म्हणत

दत्तनामावली ऐकत कुरवपूरला आलो.

आमचा अंजी नावाचा नावाडी होता जो लहानपणापासून हेच काम करतो.
तेथून पंधरावीस पावलांवर पाच वड एकत्र आले आहेत असे १००० वर्षापुर्वीचे वडाचे झाड 
आणि तेथे श्रीपाद श्रीवल्लभ ध्यान करत असत असं हे ठिकाण आहे,
 तेथे आता छोटेसे श्रीपाद वल्लभ यांचे मंदीर आहे.
त्यांचे दर्शन घेतले.
तुपाचे पाच दिवे लावले.

नमस्कार करून मुख्य मंदिराकडे निघालो.

卐   卐   卐   卐   卐   卐   卐   卐   卐   卐