Tuesday, 22 December 2015

तिखट मीठ




काल रेल्वे प्रवासात एका गोष्टीकडे लक्ष गेलं...
एक बाई संत्र्याची अर्धी साल काढून देत होती, 
आणि फोडलेल्या संत्र्यावर तिखटमीठ लावून देत होती.
कसं बरं लागत असेल ते संत्र??
तर एक बाई म्हणाली... मस्त लागतं.!

तर आपण असं तिखट मीठ लावून किंवा नुसतं मीठ लावून काय काय बरं खातो?

पेरू, गाभुळलेली चिंच,  रायआवळे, अननस,

नुसतं मीठ लावून..... 
कलिंगड, टरबूज, पपई,
 चन्यामन्या बोरं (काळपट लाल असतात ती)
 आंबटगोड लाल हिरवी बोरं जी थोडी मोठी असतात ती.
डोंगरची काळी मैना... करवंद, 

सफरचंदाच्या फोडींना पण मीठ लावून छान लागतं.!

जांभळं मीठाच्या पाण्यात टाकून खायला छान वाटतं,
तसंच बरेच दिवस आवळे कैऱ्या मिठाच्या पाण्यात ठेवलेल्या खायला मजा येते.
काहीजणांना फळांना मीठ लावून आवडतं.!

पपनस डाळिंब तर मीठ साखर लावुन मस्त लागतं.!

पण कुणी म्हणतात की असं मीठ लावून खाऊ नये.
पण लागतं मात्र मस्त.!
यामुळे फळाचा आंबटपणा कमी लागत असेल तर
 काही फळांचा गोडवा वाढतो हे मात्र नक्की.!!!
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माधुरी पटवर्धन म्हणते....
मी पहिली मीठ लावून फळे खाणारी. 
मला मीठ वरून लावून खायला खूप गोष्टी आवडतात. 
खरंच संत्रवाली देते तसंच मीठ तिखट लावून घरात आम्ही संत्र खातो.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
त्यावर माझं मत.!
क्या बात है
तुझ्याकडूनच शिकलो ना...
कलिंगड मीठ लावून खायला
असंच वेगळं टेस्ट करतो आणि आवडून जातं.
अगं हा विषय आवडला सगळ्यांना
मस्त रिप्लाय आले.
मला वाटत होतं की लिहिलंय पण पाठवू की नको
कसा अगदीच साधा वाटतो ना विषय
पण लिहितांना माझ्या तोंडालाच पाणी सुटलं......
गाभुळलेली चिंच, रायआवळे, जांभळं....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कलिंगड, टरबुज पपई यांची टेस्ट अजून वाढते.
पेरू तर पेरुवाल्याकडून कापून तिखटमीठ घालुन खाल्ला तर मस्तच
पण .... आपण घरी कापून तिखटमीठ घालुन खाल्ला तर ती टेस्ट येत नाही.

{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}

No comments:

Post a Comment