Sunday, 27 December 2015

माझ्यात काय आहे खास??



कोणीही काही गुपित सांगितलं तर ते कोणालाही सांगत नाही.

गेली सहा वर्ष मी अंध शाळेत रीडर म्हणून, 
स्वयंसेवक म्हणून काम करते. 
रोज दोन तास तरी.!
तसंच तेच काम घरी येऊन voice recording  करते.
या माझ्या विद्यार्थ्यासाठी जास्तीत जास्त वेळ देईन.

कोणाला मानसिक आधाराची गरज असेल तर 
त्यांचं टेंशन दूर करण्याचा प्रयत्न करते.
( गप्पांच्या माध्यमातून )

देवस्थानांना जातांना ती यात्रा आहे असं समजते
 त्यामुळे छान अनुभव येतात.

गरजा कमीतकमी ठेवते.
आपल्या बोलण्याने कुणी दुखावणार नाही हा प्रयत्न करते.

कोणतीही गोष्ट शिकले की त्यात प्राविण्य मिळवण्याचा प्रयत्न करते.
जसं, संस्कारभारती रांगोळी
योगासनं, प्राणायाम,
आताचं हे संपर्काचं साधन
Whatsapp, मराठी टाईप करायला शिकले.

मला जी गाणी आवडतात ती लिहिते आणि स्वतःपुरेसं म्हणून आनंद घेते

whatsapp चा सुयोग्य वापर करते.

अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे गोष्टी, संपादकीय, अभ्यासासंबंधी धडे पाठवते.

माझी ओळख एक चांगली व्यक्ती, माणूस म्हणून व्हावी असं काम करायला आवडतं.

जपजाप्य, स्तोत्र म्हणणं, पाठ करणं आवडतं.

कोणत्याही गोष्टीत सौंदर्य दिसलं की ते शेअर करायला आवडतं.

कुणाचंही कौतुक करायला आवडतं.

ज्या गोष्टींचा छंद आहे, आवड आहे
 त्याप्रत्येक गोष्टीसाठी वही, डायरी वेगळी नविन घेते.

माझ्या स्वतःच्या छान वह्या आहेत... स्वतंत्र

रांगोळी
योगासनं
रेसिपीज
रामदास स्वामींवर पेपर मधे आलेलं लिखाण
वाचनात आलेली छान वाक्य
देवांची स्तोत्रं
आवडती गाणी
भोंडल्याची गाणी
अशा वेगवेगळ्या वह्या आहेत.

तसंच यात्रेला गेले तेथील अनुभव, दैनंदिनी याची पण वही केली.

माझा blog सजवायला आवडतो.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

***********************************************

माझ्या मैत्रिणीचा रिप्लाय
wow..
किती मस्त लिहिलंय तुम्ही.
एकदम खरं आहे सगळं.....
पण मला एक माहित नव्हतं की तुम्ही आवडती गाणी लिहून काढता..
 त्यामुळे हे गुपित कळलं बरं का मला.!
.
खरंच तुम्ही लिहिल ते सगळं तुम्ही आयुष्यात नेहमीच आचरणात आणता..
.म्हणून तुमच्या साठी म्हणावं वाटत .....
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले

अजून मीही सांगते तुमच्या विषयी ..तुम्ही दुसर्‍यांना नेहमी आनंदी ठेवता
 तुमच्या गप्पांमधून, नेहमी प्रोत्साहन देता सर्वांना ,
 अतिथींच स्वागत आदरसत्कार कसा करावा हे कोणी ही तुमच्याकडून शिकाव..
.तुम्ही मित्र म्हणून खूप छान समजावून सांगता कोणतीही गोष्ट,
 सुखदुःखात सहभागी होता...
चुकलेल्याला वाट दाखवता खचलेल्याचा आधार होता...
एक शिक्षिका मित्र यापलिकडे जाऊन 
एक व्यक्ती म्हणून तुम्ही नेहमीच आदर्श वाटता 
आणि मला खूप खूप आवडता 

..prem

****************************************************************

No comments:

Post a Comment