Saturday, 5 December 2015

फार वेळ लावू नका -



एकदातरी आठवणीने हाक मारा !

(मनाला स्पर्श करणारी कविता) .......

फक्त एकदाच...
आपली माणसं आपल्याला कायमची सोडून
जाण्यापूर्वी,
फक्त एकदा तरी हाक मारा त्यांना...

प्लीज!

आपण म्हणतो,
मीच का नेहमी फोन करायचा,
मीच का एसएमएस करु,
आणि कधीतरी जिवाभावाचं माणूस अशा ठिकाणी
निघून जातं,
जिथे नेटवर्क पोहचत नाही,
आपलं माणूस नॉट रिचेबल होण्यापूर्वी,
एक फोन कराल त्यांना..

प्लीज..!

आपण असतो फार बिझी,
वेळचं नाही,
कुठं जायला फुरसत नाही,
जिवाभावाची माणसं आठवतसुद्धा नाहीत,
आपण कधी पत्र लिहित नाही,
ख्यालीखुशाली विचारत नाही,
त्यांचे बर्थडे आपल्याला आठवत नाही,
त्यांच्या आठवणींनी मन काहूर करत नाही..
आणि मग एक दिवस येतो निरोप,
ते 'नसल्याचा'..
आणि जातो फक्त दारावर,
कधीही न होणाऱ्या भेटीसाठी..
असं होण्यापेक्षा
कधीतरी पाच मिनिट वेळ काढता नाही का येणार,
थोडा वेळ भेटून गप्पा मारता नाहीच का येणार..
प्लीज.. त्या गप्पांना वेळ द्याच..

प्लीज..

हे सारं कळतं आपल्याला,
पटतंही..
मात्र तरीही आपण आपल्याच आयुष्यात
बांधलेले,
आपले दोर काचलेले..
त्या काचल्या दोरांपायी
कुणाशी शेवटची भेट झाली नाही
असं होऊ नये..
आणि जिवंत असलेली माणसं कायमची दुरावू नये,
म्हणून एकदाच..
मनापासून हाक माराल प्लीज..
आपल्या माणसांना..........॥

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~




********************************

यावर मी लिहिलंय…!

********************************
ही कविता माझ्या वाचनात आली आणि
 मनात अनेक विचार फेर धरू लागले....

कुणा नातेवाईकाला आपल्याकडे राहायला यायचंय,
आपण म्हणतो
"या ना केव्हाही"
हे मग कधी घडतच नाही
आणि उरते ती आठवण!


कुणी म्हणतं,
अगं तु केलेलं अमुक कर ना गं एकदा,
करू, करू म्हणतो आणि राहून जातं.!


एकदा ना त्या अमुक अमुक व्यक्तीला फोन करायचा आहे...
 मग राहूनच जातो.


कोणाला भेटायला जायचं आहे, जाऊ नंतर कधीतरी...
मग म्हणजे कधीच नाही.


वेळ नसेल जायला तर नक्कीच फोनवर
 खूप वेळ गप्पा मारू शकतो.

व्यक्ती गेल्यानंतर मात्र तो पूर्ण दिवस त्यासाठी देतो पण.....
आजारी असतांना मात्र वेळ काढता येत नाही.


मला एका ओळखीतल्या काकांनी सांगितलं होतं की,

जर कोणा व्यक्तीला तुझ्याकडे यायचं असेल तर ताबडतोब घेऊन ये.
 त्यासाठी जर काही गैरसोय होणार असेल तर ती सोय करता येईल.
आणि तुला कोणाला भेटायला जायचं असेल तर 
कोणतंही कारण न सांगता भेटून ये.
किती मोलाचं सांगितलं ना त्यांनी.!
खरं होतं त्यांचं म्हणणं
असं करू शकले मी काही जणांच्या बाबतीत, 

म्हणून चांगल्या आठवणी काढू शकते.

★★★★★★★★★★★★★★★

या केव्हाही....

नक्की भेटू कधीतरी....

एकदा या आमच्याकडे...

तर होत नाही ते बहुदा…!

★★★★★★★★★★★★★★★

उद्याचे काम आज
आणि आजचे काम आत्ताच.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

No comments:

Post a Comment