एक सुंदर, अविस्मरणीय, दृश्य....
संध्याकाळी आम्ही जगन्नाथपुरीच्या मंदिरात निघालो,
एक छान
जागा बघितली आणि तेथे बसलो.
कळसापासून जरा लांब बसलो होतो. पण लक्ष फक्त
कळसाकडे…!!
तो क्षण आला.
तो क्षण आला.
कळसाकडे पाठ अाणि लोकांकडे तोंड करून भराभर एकजण चढू लागला.
कमरेला थोडे ध्वज हातात पण असावेत थोडे ध्वज असं भराभर चढतांना कोणीतरी
दिसत होतं
(आश्चर्याने आमचे डोळे मोठे झाले आणि तोंडाचा आ झाला असेल.)
बरं, तर एका मिनिटाच्या आत तो कळसापर्यंत पोहोचला.
भराभर त्याने कालचे
दोरीला बांधलेले ध्वज काढले, जवळ असलेले ध्वज बांधायला सुरुवात केली.
अरे.! हे काय ????
तोपर्यंत दुसरा अजून एक हे असच चढतांना दिसला.
दिसला
दिसला म्हणेपर्यंत पोहोचला सुद्धा कळसापर्यंत!
ओ.... अजून वर चढतो़य. अरे
ते चक्र आहे त्या चक्रावर मोठ्ठा ध्वज आहे तो त्याने उतरवला
आणि स्वतःजवळ
असलेला ध्वज तेथे लावला.
आता सांगू का.... हा ध्वज एका काठीला, काठी कसली? बांबूला तो ध्वज एकट्याने बांधला.
नंतर जवळचे ध्वज खाली बांधले.
आता सांगू का.... हा ध्वज एका काठीला, काठी कसली? बांबूला तो ध्वज एकट्याने बांधला.
नंतर जवळचे ध्वज खाली बांधले.
जे उतरवलेले ध्वज घेऊन ते तेवढ्याच वेगाने खाली आले.
आता मी भराभर त्या मुलांना बघायला कळसाकडे गेले. प्रचंड गर्दी होती.
तरी
त्या मुलापर्यंत पोहोचले,
त्याच्याबरोबर हात मिळवला शाबासकी दिली आणि परत
फिरले,
आनंदाने ही गोष्ट सांगितली, मग आम्ही दोघं तिकडे गेलो, त्याला यांनी
१०० रुपये बक्षिस दिले.
आणि त्या मुलाने एक ध्वज आम्हाला दिला.
मला तर तो भगवंताचा प्रसादच वाटला.
हा केशरी रंगाचा ध्वज आहे.
जे १० रु, ५० रुपये देत होते त्यांना एक ध्वजाची पट्टी देत होता.
हे तरूण वीसबावीस वर्षाचे आहेत,
यांचे एक घराणे आहे ते काम करतात.
वर्षाचे ३६५ दिवस ध्वज चढवला जातो.
हा जो एकदम वर ध्वज आहे तो डौलाने, दिमाखाने एकाच दिशेने फडकतो.
हा जो एकदम वर ध्वज आहे तो डौलाने, दिमाखाने एकाच दिशेने फडकतो.
वाऱ्याची दिशा कोणतीही असली तरी.
त्या मंदिराच्या कळसावरुन पक्षी उडत नाहीत असं म्हणतात.
जर ध्वज चढवणे हे एखाद्या दिवशी झाले नाही तर....
पण असं कधीही झालेलं नाही.
त्या मंदिराच्या कळसावरुन पक्षी उडत नाहीत असं म्हणतात.
जर ध्वज चढवणे हे एखाद्या दिवशी झाले नाही तर....
पण असं कधीही झालेलं नाही.
ध्वज :
१ फूट असेल तर १०० रुपये.
२ फूट असेल तर २०० रुपये.
याप्रमाणे....
२ फूट असेल तर २०० रुपये.
याप्रमाणे....
हे ध्वज त्या मुलाकडे देण्यासाठी ऑफिसमधे पैसे भरायचे.
आमच्या ग्रुपतर्फे आम्ही एक ध्वज घेतला होता. रंग लाल होता.
हे ध्वजाचे पैसे अन्नदानासाठी वापरले जातात.
वारा असो नसो सगळे ध्वज डौलाने फडकत असतात.
सुंदर असे हे दृश्य बघायला कधी जाऊया.....
कारण हे मला शब्दात वर्णन करता येणं .... नाही ना येत!
कारण हे मला शब्दात वर्णन करता येणं .... नाही ना येत!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~
No comments:
Post a Comment