५ डिसेंबर २०१३
भुवनेश्वर ते मुंबई.
हॉटेल समुद्र येथून
सकाळी पाच वाजता आटपून भुवनेश्वर विमानतळाकडे निघालो.
सकाळची सुप्रसन्न वेळ.
सुंदर अशा उगवत्या सुर्यनारायणाचे दर्शन घेत,
वाटेत एके ठिकाणी चहा कॉफी
घेऊन,
छान झालेल्या यात्रेच्या आठवणी
मनात साठवत कधी विमानतळाकडे आलो ते
कळलंच नाही.
(सकाळी सात वाजता पोहोचलो.)
(सकाळी सात वाजता पोहोचलो.)
चेकिंग झाले आणि वेटींग हॉलमधे बसलो.
अजून एक तास होता.
मग तेथील दुकाने पहायला गेलो
अजून एक तास होता.
मग तेथील दुकाने पहायला गेलो
. ज्वेलरीचे दुकान होते,
तेथे पहिल्या विमान
प्रवासाची आठवण म्हणून
एक पांढऱ्या खड्याच्या कानातल्याचा जोड घेतला.
सेल्समन तुळजापूर येथील
'शुभम्' नावाचा मुलगा होता.
पहिल्या गेटमधून आत गेलो.
विमान - इंडिगो
सीट नं. मी २४ ए
विवेक २४ एफ वर बसलो.
खरंतर आमचे सीट नं २४ बी सी हे होते.
पण आम्हाला खिडकी हवी म्हणून आपापसात सीट बदलली.

"विमान फिरते अधांतरी मौज दिसे ही पहा कशी..!!"
हा अनुभव घ्यायचा होता ना!
लहानपणी दोन हात खांद्याच्या रेषेत पसरून विमानाप्रमाणे धावायचो
लहानपणी दोन हात खांद्याच्या रेषेत पसरून विमानाप्रमाणे धावायचो
याची आठवण येत होती.
खिडकीत बसून सर्व मजा बघायची होती.
खिडकीत बसून सर्व मजा बघायची होती.
विमान वर कसे जाते, वर गेलं की आकाश कसे
दिसते,
ढग, हवामान.... तसेच खाली दिसणारे डोंगर, घरे, रस्ते, समुद्र.....
हे सारे बघायचे होते.
विमानात असणाऱ्या सुचनांचे पालन केले.
विमानाने छान आकाशात झेप घेतली.
विमानाचा एका लयीत थोडा आवाज येत होता. विमान जवळजवळ बत्तीसहजार फुटांवरून उडत होते.
हाय-वे, नागमोडी रस्ते, छोटे रस्ते, घरे, पाण्याचे जलाशय, हिरवीगार शेतं, हे खालचं दृश्य तर आकाशात सुंदर आकाशी रंग आणि पांढरा रंग ढगांचा. आणि हे दोन वेगळे रंग दिसत होते एका छान निळ्या रेघेने.
खुप सुंदर दिसत होते. आमचे सहकारी यांनी त्याच्यातर्फे कॉफी दिली. (स्पॉन्सर)
हातात मस्त कॉफीचा छानदार कप, सुंदर दृश्य....
असा छान प्रवास सुरू होता.
साडेदहा वाजले आणि सुचना आली....
मुंबईचे तापमान ३० अंश सेल्सिअस .... पट्टे बांधा.
जशी मुंबई आली ती सुंदर निळी रेघ गेली आणि तेथे काळी रेघ दिसू लागली.
आणि क्षणातच चमचमणारा समुद्र दिसु लागला.
आणि खुप सारे ढग त्यामुळे काही क्षणच समुद्रदर्शन आणि

अनेक इमारती, एक
रेल्वे स्टेशन बहुदा घाटकोपर, विक्रोळी असेल.
आणि नंतर आशियातील सर्वात
मोठी झोपडपट्टी..... धारावी
आणि विमान अलगद रनवेवर उतरले.
आणि विमान अलगद रनवेवर उतरले.
फ्लॅप्स उघडल्या जमिनीवर विमान चालत चालत
ठरल्या ठिकाणी थांबले. शिडी लागली.
आम्ही उतरण्यापुर्वीच आमचे सामान
पट्ट्यावर पोहोचले.
मग सामान घेऊन आम्ही बाहेर आलो.
मग सामान घेऊन आम्ही बाहेर आलो.
टॅक्सीसाठी रांग लावली. लगेज किती हे सांगून प्रीपेडचे पैसे भरले.
"असा सुंदर झाला विमानप्रवास"
"असा सुंदर झाला विमानप्रवास"
पहाटे पाच पासून ते दुपारी एक वाजेपर्यंत. त्यातील विमानप्रवास दोन तास दहा मिनिटे.
आमचा पेहराव
मी- निळी डिझायनर साडी,
पांढरा स्वेटर
विवेक - लांब हाताचा शर्ट, बिनबाह्यांचा स्किन रंगाचा स्वेटर.
आमचा पेहराव
मी- निळी डिझायनर साडी,
पांढरा स्वेटर
विवेक - लांब हाताचा शर्ट, बिनबाह्यांचा स्किन रंगाचा स्वेटर.
अविस्मरणीय असा हा आमचा पहिला विमान प्रवास.!
अत्यंत आनंददायी.
यादिवशी हवामान खुपच छान होते.
No comments:
Post a Comment