Tuesday, 1 December 2015

अनघालक्ष्मी पूजन.....


सकाळी अनघालक्ष्मी पूजन केले.

यासाठी ५०/- रू. ची रिसिट केली.
पुजेचे थोडे साहित्य तिकडे दिले.
काही आम्ही नेले होते.
कागदावर यंत्र होते त्याची पूजा केली.
गुरूजी त्यांच्या भाषेत बोलत होते, त्यामुळे भाषेचा गोंधळ होत होता.
(आम्हाला जसं वाटत होतं तसं जर आम्ही केलं तर त्या गुरूजींना आवडत नव्हतं)
पण ..... आमचे आयोजक यातील जाणकार.
 फेरी मारत मारत पूजा सांगत होते म्हणून काही अडचण आली नाही.
सर्वांतर्फे अनघादेवीची साडीखणाने ओटी भरली.

पूजा झाल्यावर आरती करत असतांना एक सुंदर अनुभव:

तिकडे थोडा दूर मंदिरात एक झोपाळा आहे. 
त्यावर अनघदेव व अनघालक्ष्मी अशी एक फोटोफ्रेम आहे.

 तर आरतीच्या वेळी तो झोपाळा संथपणे झुलत होता.

(त्यावेळी मंदिराचे दरवाजे खिडक्या बंद होते, कारण दर्शनाची वेळ संपली होती)
असं वाटलं की देवांनी आमची पूजा मान्य केली
पुजेदरम्यान ते इथेच होते.
मंदिर छान प्रशस्त आहे. आवार छान हिरवेगार आहे.
आत शिरतांनाच स्तंभ आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कुंकुमार्चन, कुमारीका पूजन

संध्याकाळी कुंकुमार्चन केले.
यासाठी ५०/- रू. रिसिट केली.
गुरूजी छान पूजा सांगत होते.
कुंकू तिकडे दिले.
बरेच साहित्य आमच्याकडे होते, नारळ केळी तेथे मिळाली.
पूजा फार छान झाली.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

यानंतर 

कुमारीका पूजन,

पाच छोट्या छोट्या कुमारीका आल्या होत्या.
मी जिचे पूजन केले तिचे नाव रेश्मा होते.
वस्त्र, खाऊ, शालोपयोगी साहित्य, दक्षिणा दिली.


(~•~) (~•~) (~•~) (~•~) (~•~) (~•~) (~•~) (~•~) (~•~)


अनघालक्ष्मी

संकलन
परमकरुणामय दत्त भगवानांनी वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन दीन जनांचा उद्धार केला आहे.
श्री दत्तगुरुंचे तत्व कल्पनातीत आहे
अवधूत स्वामींच्या रुपामध्ये प्रसिद्ध झालेल्या या लिलामूर्तींचे एक गृहस्थ रुप पण आहे.
स्वामी गृहस्थ रुपांत मात्र अनघस्वामी किंवा अनघास्वामी म्हणून ओळखले जातात. 
 त्यांच्या पत्नीचे नांव अनघा देवी आहे जी साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे.
 हे दांपत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना ऐहिक सुख, तत्वज्ञानद्वारा अनुग्रहित करीत असतात.
     अनघ दंपतिची उपासना पद्धती, 

कृतयुगात साक्षात दत्त सद्गुरुंनी आपला प्रिय भक्त कार्तर्वीर्यार्जुनाला स्वतः सांगितली.

ह्याचे विवरण व्यास लिखीत दत्तपुराणामध्ये आहे.
त्रेतायुगात प्रभू श्रीराम व दशरथ महाराज यांनी केले.

या व्रतासाठी अतिमुख्य दिवस हा मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी हा आहे.

 पण कोणत्याही अष्टमीला केले तरी चालते.

अघ म्हणजे पाप

अनघ म्हणजे पापहीन,

मन, वाचा, कर्म द्वारे आपण प्रत्येक क्षणी अनेक पापे करतो.
 या पापांमध्ये झालेली वाढ आपल्यासमोर विविध अडचणींच्या रुपात येते.
 अशा पापांना दूर करणारे, जगाचे जनक जननी अनघ दंपति होय.

     || जय गुरु दत्त ||

No comments:

Post a Comment