जेट एअर....
२४ जून २०१५
वेळ दुपारी २.३५
विमान सुरू झाले. रनवे वरून समोरच असलेल्या समुद्रावरून विमानाने उड्डाण
केले. वरून छोट्या भासत आहेत इमारती! सगळं कसं हिरवंगार!!! आणि नंतर फक्त
समुद्र!!!!
आता तर समोरून ढग धावत आहेत.
त्याखाली ढगांचे शुभ्र पुंजके!
जणू काही कापूस पिंजून ठेवलंय!
काळे ढग अजिबातच नाहीत!!!
विमानात मिळालेला खाऊ खावून झाला. विमान आणखीन उंचावर गेलंय
विमानात मिळालेला खाऊ खावून झाला. विमान आणखीन उंचावर गेलंय
पांढरा शुभ्र गालिचाच अंथरलाय जणू!!!!!
हे दृश्य कसं दिसलं माहित आहे ???
हे दृश्य कसं दिसलं माहित आहे ???
जसं सिरिअल मधे देव बसलेत किंवा उभे आहेत असं दाखवतात ना!!!!
तसं दिसत होतं अगदी!!!दूरवर निळी रेघ दिसत नाही फक्त पांढरे शुभ्र ढग!!!
असं म्हणेपर्यंत दूरवर निळी रेघ आता उंचावर दिसत आहे.
फारच सुंदर आकाशाचा आकाशी रंग!!!
विमानाने थोडं वळण घेतलंय !!!आलो मुंबईकडे......३.१०
खाली अजुनतरी ढगच आहेत!!! काळे विरळ ढग!!!!
सीटबेल्ट लावा अशी सुचना आली. पटकन बेल्ट बांधला लक्ष खालीच. कशी दिसते मुंबई????
खाली बऱ्याच ठिकाणी पाणी खरंतर चिखलच वाटत होता!!!! आणि इमारती??? तर .....
९०% इमारतींच्या गच्ची? निळ्यारंगाच्या!!! पाऊस आहे ना?? तर ताडपत्री घातली आहे या गगनचुंबी इमारतींवर सुद्धा!!!!
मग दिसलं विक्रोळीची गोदरेजची इमारत!!!!
मग खुप ट्रॅफिक!!!!!! बेस्ट बसेस!!! मोटारगाड्या,
मुंबईची नीला रोहिणी- लोकलट्रेन

मेट्रो पण धावतांना दिसली. मग मेट्रो ची दोन स्टेशन्स!!!
आणि विमान उतरलंच!!!!
उतरतांना धडधडधडधड आवाज!!!
मस्त एक तासात मुंबईत!!!
उतरतांना धडधडधडधड आवाज!!!
मस्त एक तासात मुंबईत!!!
No comments:
Post a Comment