Monday, 29 June 2015

सुप्रसन्न सुप्रभात....


सकाळी जाग आली आणि पहिला प्रश्न ...
किती वाजले??
५.३५.
मग लगेच दुसरा प्रश्न??? पाऊस नाही ना?
अजिबातच नाही!!!
चला तयार झाले आणि जरा लवकरच बाहेर पडले. आल्हाददायक वातावरण...
 कुठेतरी सोनेरी केशरी ढगांचा पुंजका दिसतोय पण.... ढग काळे- पावसाळी!!!!
 थेंबथेंब पावसाला सुरूवात झाली. पण दोन मिनिटातच थांबला! म्हणजे सूर्य दर्शन होतं तेथपर्यंत मिळणार तर जायला!!!!
 थोडं उकडतंय! फिरायला येणाऱ्यांची संख्या पण कमी झाली आहे. तर पाच मिनिटे बाकावर बसले.
 इतका थंड वारा येत होता, खूप छान वाटलं!!
 पण... चालतांना तो जाणवत नव्हता. आज सूर्यदेवांचं दर्शन मात्र झालं नाही. पण जेथे सूर्योदय झाला तेथील ढग काही क्षण शुभ्र दिसले मग मात्र सगळीकडे पावसाळी ढग!!!!
जिमखान्यांवर मस्त हिरवे वेलवेटचे गालिचे अंथरलेत जणू!!!! समुद्राचे पाणी मात्र स्वच्छ वाटले! पण किनाऱ्यावर मात्र प्लास्टीक पिशव्यांच्या चिंध्या चिंध्या (रंगीबेरंगी) दिसत होत्या.

गावापेक्षा मुंबईत सगळंच बेगडी वाटतं

 पण वारा, पाऊस, पागोळ्या यांचे आवाज  यांची जाणीव तर सारखीच आहे नां?
शेतं नाहीत. आपल्या भागात पण सुंदर देवळं , तेथील घंटानाद,
झाडं- सगळीच माड, वड, पिंपळ उंबर, बदाम ...
फुलझाडं तर पुष्कळच
पाऊस जास्त झाला की होणारा चिखल....
आणि  सुंदर समुद्रकिनारा...
पहिला पाऊस पडतो तेव्हा येणारा मातीचा सुगंध!!!!
तो पण सारखाच
कोकीळेचे कूजन ऐकतोय!
सकाळी पाखरांची किलबिल...
कधीतरी दिसणारा पोपटांचा थवा...
कबुतरांचं गुटुर्रगुss
अजुनतरी आपण नशीबवान आहोत.
याचा अनुभव घेतोय.
है ना!!!!

No comments:

Post a Comment