ताडोबा...२५ जानेवारी २०१५ ......
सुप्रसन्न सकाळ!!!!!
जंगलात जाण्याचा पहिलाच अनुभव!!!!
खरंतर वाघ बघण्याची उत्सुकता!!!!
आणि एक सुचना मिळाली.....
खरंतर वाघ बघण्याची उत्सुकता!!!!
आणि एक सुचना मिळाली.....
आपण जंगलात जात आहोत, निरनिराळे पक्षी,
त्यांचे आवाज, जंगलातला वेगळा वास अनुभवा...
.त्याचा आनंद घ्या!!!!
या सुचनेमुळे एक नजर मिळाली की फक्त वाघ नाही तर इतर गोष्टीतला आनंद आपण नक्कीच मिळवू शकतो.....
तर सकाळी ८.०० च्या दरम्यान एका पाणवठ्याजवळ एक रानगव्याचं कुटुंब पाणी पिण्यासाठी जात होतं, आणि कुटुंब प्रमुख आपलं कर्तव्य करत होता.
तो आजुबाजुला शोधक नजरेनं बघत होता, काही धोका नाही ना?????
तर सकाळी ८.०० च्या दरम्यान एका पाणवठ्याजवळ एक रानगव्याचं कुटुंब पाणी पिण्यासाठी जात होतं, आणि कुटुंब प्रमुख आपलं कर्तव्य करत होता.
तो आजुबाजुला शोधक नजरेनं बघत होता, काही धोका नाही ना?????
माझं कुटूंब सुरक्षित आहे ना !!!!!
सगळ्यांचं पाणी पिऊन झाले सगळे बाहेर आले मग हा गवा पाणी प्याला.
यात महत्वाची गोष्ट ही की यातील लहान पिल्ले मध्यभागी ठेऊन सगळे चालत होते.
(हे रावगव्याचं कुटूंब चांगलं १५ जनावरांचं तरी होतं.)
जंगलातला हा क्षण नेमका अनुभवता आला.कारण नेमक्या वेळीच आमची जीप तेथे होती.
यात महत्वाची गोष्ट ही की यातील लहान पिल्ले मध्यभागी ठेऊन सगळे चालत होते.
(हे रावगव्याचं कुटूंब चांगलं १५ जनावरांचं तरी होतं.)
जंगलातला हा क्षण नेमका अनुभवता आला.कारण नेमक्या वेळीच आमची जीप तेथे होती.
No comments:
Post a Comment