आज जरा लवकरच बाहेर पडले. मस्त गार वाऱ्याच्या झुळका स्वागत करत होत्या.
आकाशाकडे बघितलं, तर...
खूप भरलेलं आभाळ. म्हटलं आला पाऊस तर भिजूया!!!
वाऱ्याने डोलणारी झाडं/पानं, आता कुठेतरी दिसणारी लॅबर्नमची फुले, गुलमोहोर असं बघत बघत चालत असतांना लक्ष पूर्वेकडे गेलं तर पावसाळी काळे ढग पुंजक्यांनी दिसत होते ,म्हणजे आज सूर्यदर्शन नाही होणार असं वाटलं!!!
पण थोडं पुढे आले तर झाडाआडून सुर्यदर्शन झाले, मग पुन्हा सुर्यासमोर काळे ढग आले.
चर्नीरोड स्टेशनसमोर आले लक्ष समुद्राकडे होतं, कारण पाणी गढूळ दिसत होतं, लाटांचा आवाज मात्र येत होता, आकाश भरलेलं!!!!

आणि तेवढ्यात आकाशात इंद्रधनुष्य....दिसले,
ते पाण्यातून दिसले तेथे एक बोट होती, आणि कोठपर्यंत तर मलबार हिल पर्यंत
ते दिसत होते. अगदी चित्रात दिसतं ना तसंच दृष्य!!! खूप खूप आनंद झाला!!!
हे दृश्य ५ मिनिटे होते ते बघत उभी राहिले. मग मात्र सुर्यदेव दिसू लागले.
कधी बघायला मिळेल इंद्रधनुष्य???? असं वाटलं होतं!
No comments:
Post a Comment