Sunday, 27 December 2015

माझ्यात काय आहे खास??



कोणीही काही गुपित सांगितलं तर ते कोणालाही सांगत नाही.

गेली सहा वर्ष मी अंध शाळेत रीडर म्हणून, 
स्वयंसेवक म्हणून काम करते. 
रोज दोन तास तरी.!
तसंच तेच काम घरी येऊन voice recording  करते.
या माझ्या विद्यार्थ्यासाठी जास्तीत जास्त वेळ देईन.

कोणाला मानसिक आधाराची गरज असेल तर 
त्यांचं टेंशन दूर करण्याचा प्रयत्न करते.
( गप्पांच्या माध्यमातून )

देवस्थानांना जातांना ती यात्रा आहे असं समजते
 त्यामुळे छान अनुभव येतात.

गरजा कमीतकमी ठेवते.
आपल्या बोलण्याने कुणी दुखावणार नाही हा प्रयत्न करते.

कोणतीही गोष्ट शिकले की त्यात प्राविण्य मिळवण्याचा प्रयत्न करते.
जसं, संस्कारभारती रांगोळी
योगासनं, प्राणायाम,
आताचं हे संपर्काचं साधन
Whatsapp, मराठी टाईप करायला शिकले.

मला जी गाणी आवडतात ती लिहिते आणि स्वतःपुरेसं म्हणून आनंद घेते

whatsapp चा सुयोग्य वापर करते.

अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे गोष्टी, संपादकीय, अभ्यासासंबंधी धडे पाठवते.

माझी ओळख एक चांगली व्यक्ती, माणूस म्हणून व्हावी असं काम करायला आवडतं.

जपजाप्य, स्तोत्र म्हणणं, पाठ करणं आवडतं.

कोणत्याही गोष्टीत सौंदर्य दिसलं की ते शेअर करायला आवडतं.

कुणाचंही कौतुक करायला आवडतं.

ज्या गोष्टींचा छंद आहे, आवड आहे
 त्याप्रत्येक गोष्टीसाठी वही, डायरी वेगळी नविन घेते.

माझ्या स्वतःच्या छान वह्या आहेत... स्वतंत्र

रांगोळी
योगासनं
रेसिपीज
रामदास स्वामींवर पेपर मधे आलेलं लिखाण
वाचनात आलेली छान वाक्य
देवांची स्तोत्रं
आवडती गाणी
भोंडल्याची गाणी
अशा वेगवेगळ्या वह्या आहेत.

तसंच यात्रेला गेले तेथील अनुभव, दैनंदिनी याची पण वही केली.

माझा blog सजवायला आवडतो.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

***********************************************

माझ्या मैत्रिणीचा रिप्लाय
wow..
किती मस्त लिहिलंय तुम्ही.
एकदम खरं आहे सगळं.....
पण मला एक माहित नव्हतं की तुम्ही आवडती गाणी लिहून काढता..
 त्यामुळे हे गुपित कळलं बरं का मला.!
.
खरंच तुम्ही लिहिल ते सगळं तुम्ही आयुष्यात नेहमीच आचरणात आणता..
.म्हणून तुमच्या साठी म्हणावं वाटत .....
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले

अजून मीही सांगते तुमच्या विषयी ..तुम्ही दुसर्‍यांना नेहमी आनंदी ठेवता
 तुमच्या गप्पांमधून, नेहमी प्रोत्साहन देता सर्वांना ,
 अतिथींच स्वागत आदरसत्कार कसा करावा हे कोणी ही तुमच्याकडून शिकाव..
.तुम्ही मित्र म्हणून खूप छान समजावून सांगता कोणतीही गोष्ट,
 सुखदुःखात सहभागी होता...
चुकलेल्याला वाट दाखवता खचलेल्याचा आधार होता...
एक शिक्षिका मित्र यापलिकडे जाऊन 
एक व्यक्ती म्हणून तुम्ही नेहमीच आदर्श वाटता 
आणि मला खूप खूप आवडता 

..prem

****************************************************************

Thursday, 24 December 2015

२०१३ यात्रेदरम्यान आलेले अनुभव.!


।। श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ।।

यात्रा : २४ नोव्हेंबर २०१३ ते
            ५ डिसेंबर २०१३.
****************************************************************
काही योगायोग, अनुभव.....
१. श्रावण महिन्याचा पहिला दिवस ते २५ नोव्हे. २०१३.
रोज १ माळ, ।। ॐ नमः शिवाय ।।
जपसंख्या १११ माळा झाल्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
२. पिठापूरम येथे अनघालक्ष्मी मंदिरात पूजा करतेवेळी आरती करतांना-
झोपाळ्यावर अनघदेव व अनघालक्ष्मी यांचा फोटो असलेली मोठी फ्रेम आहे. 
आरती करतांना या फ्रेमकडे लक्ष गेले, तर झोपाळा मंद / संथपणे झुलत होता, 
आम्हाला असं वाटलं की जणूकाही त्यांनी आमची पूजा मान्य केली आहे.

****************************************************

३. पिठापूरम् महासंस्थानात प्रदक्षिणा घालतेवेळी सहज मी माझी पावले मोजली,
 ती ३३ होती. हा एक योगायोग वाटला.
 कारण ३३ या संख्येचे महत्त्व चरित्रामृतात आहे.

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

४. आम्ही पिठापूरम् येथे ज्याठिकाणी राहिलो होतो, तेथील श्रीदत्तात्रेयांची पूजा आम्ही दोघांनी केली. त्यादिवशी शनिप्रदोष होता. (महासंस्थानात सगळ्यांनी मिळून तुपाचे  दिवे लावले)   
    जेथे आम्ही पूजा केली तेथे औदुंबर वृक्ष आहे. तेथेसुद्धा आम्ही ११ तुपाचे दिवे अगोदर लावले व आरती केली. अचानक हे सुचल्यामुळे असं वाटलं की श्रीदत्तमहाराजांनी ही सेवा आमच्याकडून   करवून घेतली असावी.

ÖöööööööööööööööööööööööööööööööööööööööööööÖ

५. पिठापुरम् येथे आमचे वास्तव्य चार दिवस होते.
 बहुतेक रोज एक प्रसाद आम्ही दाखवत होतो. ज्यादिवशी गुळाची छोटी ढेप, आणि
 एके दिवशी राजगिरा चिक्की याचा प्रसाद दाखवला/ ठेवला तो तेथेच ठेवला.
 बाकीचे प्रसाद परत देत होते.
[ श्रीपाद श्रीवल्लभ यांना राजगिरा भाजी, आणि गूळ पसंत आहे, असा उल्लेख चरित्रामृतात आहे ]

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

६. महासंस्थानात पादुका अभिषेकाच्यावेळी
 जेव्हा दूध अभिषेक होता तेव्हा पादुकांचे दर्शन विलोभनीय झाले.
 तर.... मधाने अभिषेक केला तेव्हा पादुका सुवर्णाच्या भासल्या.

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

७. कुरवपूर येथे दत्तयाग केला. 
आम्ही सकाळी वीस- बावीस जण गेलो होतो.
 तेव्हा पुढे गेलेल्यांना गुरूजींनी विचारले की यजमान दंपतीने नऊवार साडी नेसली आहे का?
आणि मी नऊवार साडी नेसले होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
।। कृते जनार्दनो देवत्रेतायाम रघूनंदनः
द्वापारे रामकृष्णौच कलौ श्रीपादश्रीवल्लभ ।।
!!! श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये !!!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
!!! अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त !!!

दत्तमंदिर चौल...

एक सुंदर अनुभव....

दत्त दर्शनाला जायाचं जायाचं
आनंद पोटात माझ्या माईना रं माईना...

काही वर्षापुर्वी आम्ही अलिबागला गेलो होतो.
संध्याकाळी दत्तगुरूंच्या दर्शनाला निघालो.
 हे स्वयंभू  दत्तात्रेयांचे मंदिर आहे.
खूप चढ...! दमछाक होत होती.
 मला वाटतं सातशे साडेसातशे पायऱ्या आहेत.
आणि इतक्यात घंटानाद सुरू झाला.
बाजुने चारपाच कुत्रे वेगाने धावत मंदिराकडे जातांना दिसले.
 पण आम्हाला मात्र आरती करीता वेगाने जाता आले नाही.
आरती संपली आणि मी धापा टाकत मंदिरात पोहोचले.
बरोबर असणारे आधी पोहोचले  असल्याने त्यावेळचा सुंदर अनुभव सांगू लागले.
आरती सुरू झाली आणि 
चार पाच कुत्रे मंदिराच्या दारात वर दिशेला तोंड करून शंख वाजवावा असा आवाज करत होते. 
प्रसादाचे पेढे खाल्ले, आणि ते तेथून गेले.
मी सुंदर असा घंटानाद ऐकला, कुत्रे जातांना पाहिले पण....
 या सुंदर अनुभवाला मुकले. पण असो !!! 
 बरोबरच्यांनी हा अनुभव अनुभवला, तो ऐकायला मिळाला यातही आनंद मिळाला.
(आम्हाला आधी आरतीची वेळ कळली असती तर... आम्ही जरा लवकर निघालो असतो.)








 

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀


काही वाचलेलं, समजलेलं, स्मरणात राहिलेलं......

श्रीदत्तात्रेय त्रिगुणातीत आहेत.
ब्रह्मा - निर्माण कर्ता
विष्णू - पालनकर्ता
महेश - संहारकर्ता

अनसुया - कोणतीही असुया नाही, महान पतिव्रता.!

अत्रि - त्रिगुणाची बाधा नाही ते अत्रि.

जगाचं कल्याण करण्याकरीता निघालेल्या पुरुषाला कोणीही अडवू शकत नाही.
भवसागर पार करणे म्हणजे निर्मळ होणे.
गुरुंनी संकल्प दिला की विकल्प येत नाहीत.
गुरू शिष्याच्या आवाक्यातला संकल्प देतात.

गुरूपुढे लीन होण्यासाठी जेव्हा मनुष्य धावतो तेव्हा आत्मिक समाधान मिळतं, शांती मिळते.

प्रवास - देह नुसताच धावतो तेव्हा घडतो तो प्रवास.
आणि
गुरुमाऊलींच्या चरणी लीन होण्यासाठी होते ती यात्रा.
साठलेल्या पाण्याला दुर्गंध येतो. तर वाहत्या पाण्याला सुगंध असतो.
कुरवपुर/ कुरगड्डी
यालाच गुरूगृह असं म्हणतात

कृष्णा नदीच्या दुभंगण्यामुळे कुरवपुर हे बेट तयार झालं.
वासुदेवानंद सरस्वतींनी याला कृष्णेचं नाभीस्थान असं म्हटलं आहे.
कुरवपुर येथे निःसिम भक्तांची धारा सतत वाहत असते.
हे श्रीपाद श्रीवल्लभ यांचे तपश्चर्या स्थान आहे.
जवळच भजनमंदिर आणि गर्भमंदिर आहे.
कुरवपुर येथे गुहेत स्वामी येथे तळघरात अनुष्ठान करीत असत.

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

Tuesday, 22 December 2015

तिखट मीठ




काल रेल्वे प्रवासात एका गोष्टीकडे लक्ष गेलं...
एक बाई संत्र्याची अर्धी साल काढून देत होती, 
आणि फोडलेल्या संत्र्यावर तिखटमीठ लावून देत होती.
कसं बरं लागत असेल ते संत्र??
तर एक बाई म्हणाली... मस्त लागतं.!

तर आपण असं तिखट मीठ लावून किंवा नुसतं मीठ लावून काय काय बरं खातो?

पेरू, गाभुळलेली चिंच,  रायआवळे, अननस,

नुसतं मीठ लावून..... 
कलिंगड, टरबूज, पपई,
 चन्यामन्या बोरं (काळपट लाल असतात ती)
 आंबटगोड लाल हिरवी बोरं जी थोडी मोठी असतात ती.
डोंगरची काळी मैना... करवंद, 

सफरचंदाच्या फोडींना पण मीठ लावून छान लागतं.!

जांभळं मीठाच्या पाण्यात टाकून खायला छान वाटतं,
तसंच बरेच दिवस आवळे कैऱ्या मिठाच्या पाण्यात ठेवलेल्या खायला मजा येते.
काहीजणांना फळांना मीठ लावून आवडतं.!

पपनस डाळिंब तर मीठ साखर लावुन मस्त लागतं.!

पण कुणी म्हणतात की असं मीठ लावून खाऊ नये.
पण लागतं मात्र मस्त.!
यामुळे फळाचा आंबटपणा कमी लागत असेल तर
 काही फळांचा गोडवा वाढतो हे मात्र नक्की.!!!
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माधुरी पटवर्धन म्हणते....
मी पहिली मीठ लावून फळे खाणारी. 
मला मीठ वरून लावून खायला खूप गोष्टी आवडतात. 
खरंच संत्रवाली देते तसंच मीठ तिखट लावून घरात आम्ही संत्र खातो.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
त्यावर माझं मत.!
क्या बात है
तुझ्याकडूनच शिकलो ना...
कलिंगड मीठ लावून खायला
असंच वेगळं टेस्ट करतो आणि आवडून जातं.
अगं हा विषय आवडला सगळ्यांना
मस्त रिप्लाय आले.
मला वाटत होतं की लिहिलंय पण पाठवू की नको
कसा अगदीच साधा वाटतो ना विषय
पण लिहितांना माझ्या तोंडालाच पाणी सुटलं......
गाभुळलेली चिंच, रायआवळे, जांभळं....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कलिंगड, टरबुज पपई यांची टेस्ट अजून वाढते.
पेरू तर पेरुवाल्याकडून कापून तिखटमीठ घालुन खाल्ला तर मस्तच
पण .... आपण घरी कापून तिखटमीठ घालुन खाल्ला तर ती टेस्ट येत नाही.

{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}

वेध संकल्पाचे




नवं वर्ष, नवा संकल्प.....

डिसेंबर सुरू झाला की वेध लागतात.....
संकल्प करण्याचे
आता जुने संकल्प मला वाटतं इतिहास जमा झाले असतील कदाचित!!!
जसं .... डायरी लिहिणे, मॉर्निंग वॉक सुरू करणे, व्यायामाला सुरूवात करणे...
हे आणि असे अजुन काही.
तर बघूया छोटे छोटे संकल्प

सहज पुर्णत्वास नेता येतील असे स्वतःसाठीचे काही संकल्प...

★ सकाळी उठल्यावर...
आजची सकाळ किती प्रसन्न आहे.! खुप छान वाटतंय.!
असं म्हणून दिवस सुरू करणे.
आपले जे श्रद्धास्थान असते त्यापुढे नतमस्तक होणे.!
पाच तरी मिनिटे स्वतः साठी ठेवणे.!
आपल्या आवडीचं गाणं ऐकणे, गुणगुणणे.
एखादी कविता, गाणं,
उतारा पाठ करणे.!
जवळच असलेल्या आवडत्या ठिकाणांना भेट देणे.!
आवडतं फुल, चॉकलेट, स्वतःसाठी, आणि कोणासाठीतरी आणणे.!
मनाला आपण आनंदी शांत असल्याची सुचना देणे.

दुसऱ्याचे कौतुक करणे.!

स्वतःची कामं स्वतः करणे.

छोटे छोटे निर्णय जे सहज घेता येतात ते स्वतः घेणे.

जसं चहा की कॉफी??
तर स्वतःला सांगतं आलं पाहिजे नक्की....
घरात शिरतांना ही आनंदी वास्तू आहे असं म्हणून घरात शिरा.
पाच श्वास तरी दीर्घ घ्या.!
★ दोन मिनिटे कपालभाती प्राणायाम करा.
पाच पीटीचे हात करा.!
★ उठल्या उठल्या आळस द्या. शरीराला ताण द्या.

कोणतेही एक रोप लावा
त्याला पाणी घाला.
त्याची वाढ बघा,
नवनिर्मिती आनंद देते.

झोपतांना, उठल्यावर सर्वांचं चांगलं होऊ दे अशी प्रार्थना करा..!!

कोणाबद्दल पटकन् मत न करणे.!

कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करणे.
(अपेक्षाभंगाचं दुःख होत नाही)

आहेत ना छोटे, साधे, सहज जमतील असे संकल्प....

तुम्ही पण काही करत असाल किंवा करणार असाल संकल्प तर सांगा...!
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
दोन रिप्लाय.....
१) सकाळी सुप्रभात चे येणारे सुंदर मेसेज वाचेन आणि
 ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करेन.

२) कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवणार नाही.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

Wednesday, 16 December 2015

यात्रा वेळापत्रक


कुरवपूर पिठापुरम् जगन्नाथपुरी यात्रा.....

रविवार २४ नोव्हेंबर २०१३ ते ४ डिसेंबर २०१३.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

५ डिसेंबर २०१३

विमान प्रवास.... दुपारी घरी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         ||श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये||

रविवार २४ नोव्हेंबर २०१३ संध्याकाळी ७.३० वाजता कुर्ला टर्मिनस साठी निघालो
कोइम्बतुर एक्सप्रेस १०.३०

==================================================

सोमवार २५ नोव्हेंबर सकाळी ११.३० वाजता रायचूर येथे पोहोचलो.
सायंकाळी - मंत्रालयम् येथे गेलो.

राघवेंद्र स्वामी व
मंचाली अम्मा यांचे दर्शन घेतले.
रात्री मक्ताल येथे गेलो.
______________________________________________________________
मंगळवार २६ नोव्हेंबर
५.३० वाजता कुरवपुर येथे जाण्यास निघालो.
यालाच कुरगुड्डी असंही म्हणतात.
दुपारी वल्लभपूर, पंचदेव पहाड येथे गेलो.
______________________________________________________________
बुधवार २७ नोव्हेंबर
रात्री सामलकोट येथे पोहोचलो.
पिठापुरम् येथील अन्नछत्रामध्ये प्रसादाचे जेवण घेतले.
 वास्तव्यासाठी काकीनाडा येथे गेलो.
______________________________________________________________
गुरुवार २८ नोव्हेंबर
सकाळी अनघालक्ष्मी  पूजन केले.
संध्याकाळी गोपाळबाबा दर्शन घेतले.
त्यानंतर आरती सोहळ्यात सहभागी झालो.
मनाला खुपच आनंद झाला.
______________________________________________________________
शुक्रवार २९ नोव्हेंबर
सकाळी व्यंकट श्रेष्ठी यांच्या घराच्या आवारात असलेल्या श्रीदत्तात्रेयांची पूजा केली.
चित्रा नक्षत्र पूजन :
पिठापुरम् महासंस्थानात पूजा केली.
ही पूजा सामुहिक असते.
या नक्षत्रावर श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म झाला आहे.
संध्याकाळी
कुकुटेश्वर मंदिर येथे गेलो.
अनघा लक्ष्मी मंदिरात
रात्री ७.०० वाजता कुंकुमार्चन केले.

卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐

शनिवार ३० नोव्हेंबर
शनिप्रदोष :
सकाळी दत्तात्रेय पूजन, अभिषेक केला.
अभिषेक ५०/-
रुद्राभिषेक ५००/-
यादिवशी रात्री श्रीपाद श्रीवल्लभ यांना हलव्याचा प्रसाद दाखवला.
१ किलो प्रसाद- २५०/-
१०० ग्रॅम प्रसाद आपल्याला व्यवस्थित पॅक करून देतात.
तीन डब्या बरोबर ठेवाव्यात.
प्रसाद, भस्म, अष्टगंध मिळते त्यासाठी.
१ बाटली तीर्थासाठी ठेवावी.

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

याच दिवशी अन्नावरम् येथे गेलो.

सत्यनारायणाचे वैभवशाली मंदिर आहे.

हे एकच मंदिर आहे सत्यनारायणाचे.!
येथे नवग्रह आहेत.

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀

रविवार १ डिसेंबर
सकाळी ८.०० वाजता  दत्तयागाला सुरुवात झाली.
फार छान..... पिठापुरम् महासंस्थानातीस सभागृहात याग संपन्न झाला.
______________________________________________________________
संध्याकाळी सामलकोट येथे कोणार्क एक्सप्रेस पकडण्यासाठी गेलो.
 गाडी ३ तास लेट होती.
('-')  ('-') ('-') ('-') ('-') ('-') ('-')  ('-') ('-') ('-') ('-') ('-')

सोमवार २ डिसेंबर
भुवनेश्वर येथे सकाळी पोहोचलो.
संध्याकाळी जगन्नाथाचे दर्शन घेतले.
श्रीजगन्नाथ, सुभद्रा, बलराम
दर्शन घेतले.
मंदिरातील चार देवींची कथा पंडितांनी सांगितली.
त्यांचे नाव मधुसूदन असे होते.
पुरी : अर्थ... पूर्ण, नगर .
असा आहे.


मंगळवार ३ डिसेंबर
कोणार्क सुर्यमंदिर, सँडप्रदर्शन बघितले.
संध्याकाळी नंदनकानन
(पांढऱ्या वाघांसाठी प्रसिद्ध)
बघितले.
येतांना लिंगराज महादेव,भुवनेश्वरी देवी, श्रीगणेशाचे दर्शन घेतले.
येतांना साक्षी गोपालाचे दर्शन घेतले.

卐  卐  卐  卐  卐  卐 卐 卐  卐  卐

बुधवार ४ डिसेंबर
चिल्का सरोवर बघायला गेलो.

{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}

गुरुवार ५ डिसेंबर
भुवनेश्वर विमानतळावर आलो.
८.५० चे विमान होते.
११.१० मुंबईत पोहोचलो.

०००००•••••०००००•••••०००००•••••०००००•••••०००००•••••०००००•••••

आमचा पहिला विमान प्रवास.....


५ डिसेंबर २०१३

भुवनेश्वर ते मुंबई.

हॉटेल समुद्र येथून 
सकाळी पाच वाजता आटपून भुवनेश्वर विमानतळाकडे निघालो.

सकाळची सुप्रसन्न वेळ.

सुंदर अशा उगवत्या सुर्यनारायणाचे दर्शन घेत,
 वाटेत एके ठिकाणी चहा कॉफी घेऊन,
 छान झालेल्या यात्रेच्या आठवणी
 मनात साठवत कधी विमानतळाकडे आलो ते कळलंच नाही.
(सकाळी सात वाजता पोहोचलो.) 
चेकिंग झाले आणि वेटींग हॉलमधे बसलो.
अजून एक तास होता.
मग तेथील दुकाने पहायला गेलो
. ज्वेलरीचे दुकान होते,
 तेथे पहिल्या विमान प्रवासाची आठवण म्हणून
 एक पांढऱ्या खड्याच्या  कानातल्याचा जोड घेतला.
सेल्समन तुळजापूर येथील
'शुभम्' नावाचा मुलगा होता.
पहिल्या गेटमधून आत गेलो.
विमान - इंडिगो
सीट नं. मी २४ ए
विवेक २४ एफ वर बसलो.

खरंतर आमचे सीट नं २४ बी सी हे होते.
पण आम्हाला खिडकी हवी म्हणून आपापसात सीट बदलली.

"विमान फिरते अधांतरी मौज दिसे ही पहा कशी..!!"

हा अनुभव घ्यायचा होता ना!
लहानपणी दोन हात खांद्याच्या रेषेत पसरून विमानाप्रमाणे धावायचो 
याची आठवण येत होती.
खिडकीत बसून सर्व मजा बघायची होती.
 विमान वर कसे जाते, वर गेलं की आकाश कसे दिसते,
 ढग, हवामान.... तसेच खाली दिसणारे डोंगर, घरे, रस्ते, समुद्र..... हे सारे बघायचे होते.
विमानात असणाऱ्या सुचनांचे पालन केले.
विमानाने छान आकाशात झेप घेतली.
विमानाचा एका लयीत थोडा आवाज येत होता. विमान जवळजवळ बत्तीसहजार फुटांवरून उडत होते.
हाय-वे, नागमोडी रस्ते, छोटे रस्ते, घरे, पाण्याचे जलाशय, हिरवीगार शेतं, हे खालचं दृश्य तर आकाशात सुंदर आकाशी रंग आणि पांढरा रंग ढगांचा. आणि हे दोन वेगळे रंग दिसत होते एका छान निळ्या रेघेने.
खुप सुंदर दिसत होते. आमचे सहकारी यांनी त्याच्यातर्फे कॉफी दिली. (स्पॉन्सर)
हातात मस्त कॉफीचा छानदार कप, सुंदर दृश्य....
असा छान प्रवास सुरू होता.
साडेदहा वाजले आणि सुचना आली....
मुंबईचे तापमान ३० अंश सेल्सिअस .... पट्टे बांधा.
जशी मुंबई आली ती सुंदर निळी रेघ गेली आणि तेथे काळी रेघ दिसू लागली.
आणि क्षणातच चमचमणारा समुद्र दिसु लागला.
आणि खुप सारे ढग त्यामुळे काही क्षणच समुद्रदर्शन आणि 
अनेक इमारती, एक रेल्वे स्टेशन बहुदा घाटकोपर, विक्रोळी असेल. 
आणि नंतर आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी..... धारावी
आणि विमान अलगद रनवेवर उतरले.
 फ्लॅप्स उघडल्या जमिनीवर विमान चालत चालत ठरल्या ठिकाणी थांबले. शिडी लागली. 
आम्ही उतरण्यापुर्वीच आमचे सामान पट्ट्यावर पोहोचले.
मग सामान घेऊन आम्ही बाहेर आलो. 
टॅक्सीसाठी रांग लावली. लगेज किती हे सांगून प्रीपेडचे पैसे भरले.
"असा सुंदर झाला विमानप्रवास"
पहाटे पाच पासून ते दुपारी एक वाजेपर्यंत. त्यातील विमानप्रवास दोन तास दहा मिनिटे.
आमचा पेहराव
मी- निळी डिझायनर साडी,
पांढरा स्वेटर
विवेक - लांब हाताचा शर्ट, बिनबाह्यांचा स्किन रंगाचा स्वेटर.

अविस्मरणीय असा हा आमचा पहिला विमान प्रवास.!

 अत्यंत आनंददायी.
यादिवशी हवामान खुपच छान होते.

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

 






 

 

 

चिल्का सरोवर.!

बुधवार ४ डिसेंबर २०१३

चिल्का सरोवर.!
जेवण झाल्यावर डॉल्फिन बघायला चिल्का सरोवर येथे गेलो.
तिकिट काढून दोन बोटी केल्या.
३६०० रूपये झाले बोटींचे.
एका बोटीत १० व दुसऱ्या बोटीत ९ असे बसलो.
पाण्यातील सफर छान वाटत होती. सुर्यास्त बघायला मिळणार होता.
वाटेत आयलँड्स् दिसत होती.
अशाच एकेठिकाणी बोट थांबली. तेथे एक माणूस लाल खेकडे घेऊन चढला.
ते बघितले, तेेवढ्यात एक माणूस शिंपले घेऊन चढला. त्यात मोती आहेत असे म्हणाला. 
पहिल्या दोनतीन शिंपल्यात मोती निघाले नाहीत.
नर मादी असे शिंपले असतात, मादी शिंपल्यात मोती असतात असे म्हणाला.
 एका शिंपल्यात चपटा मोती निघाला, एका शिंपल्यात गुलाबीसर मोती,
 एकात चक्र, तर एकात काळा मोती काढून दाखवला.
मग कोणी घेणार का??? असे विचारले. व किंमत सांगितली. घ्या, घ्या असं म्हणू लागला.
नंतर छोटे खडक सारखे दगड फोडले, त्यातून गुरुचा खडा, माणिक, पाचू, पोवळे, इ. काढून दाखवले.
ते इतके चकचकीत व पैलू पाडलेले कसे????
अशी शंका आली.
मग कोणीच खरेदी केली नाही.
त्यानंतर एक तास बोटीत होतो. पण डॉल्फिन काही दिसले नाहीत. 
एक सुंदर पक्षी मात्र दिसला.
पाच वाजत आले. सुर्यास्त होवू लागला.
मग मात्र माघारी वळलो.



















****************************************************************

konark photo









sand pradarshan





कोणार्क.....भुवनेश्वर...


३ डिसेंबर २०१३
कोणार्कला जातांना

 समुद्रकिनारी सँडशिल्प प्रदर्शन बघितले.

शिल्प तयार करतांना बघायला छान वाटलं व त्यामागील कष्ट, कला समजली.

तेथून

 सुर्यमंदिर बघितले.

गाइड छान होता. छान माहिती सांगत होता.
कुठले फोटो घ्या,
वाजले किती हे कसं ओळखतात, 
चित्रांची वैशिष्ट्य सांगत होता.


नंदनकानन अभयारण्य :

 
 विश्रांती घेत असलेला वाघ, अस्वल, पहुडलेली मगर  
                                     आमच्या समोरून धावत गेलेलं हरीण, बिबट्या, सिंहिण....
                                     एका वाघाने शिकार पकडावी त्याचप्रमाणे झडप घातली. 
                   आणि थोडे मांस खाल्ले मग हळू आवाजात डरकाळी फोडली, दोनतीन वेळा .!
                                              मग तो येरझारा घालू लागला.
                           खराखरा डरकाळी फोडणारा  वाघ बघायला मिळाला.
                                  वेळ संपल्याने सफारी करता आली नाही.

**********************************************

भुवनेश्वर......

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀

भुवनेश्वर हे देवळांचे शहर आहे.
येथे लाखाच्या आसपास मंदिरे आहेत. 
येथे लिंगराज महादेवाचे दर्शन घेतले.
श्रीगणेश, भुवनेश्वरी देवीचे दर्शन घेतले.
सर्व मंदिरं पहाण्यास काही काळ लागेल.

साक्षी गोपाल दर्शन....

आम्ही गाडीतून उतरलो.
 आणि एक वासरू 'यांच्या' बरोबरीने येऊ लागले.
 ते अगदी मंदिरापर्यंत आले.

 आम्ही सुंदर असं गोपालाचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो,

 तर वासरू बाहेर उभे.! पुन्हा ते 'यांच्याबरोबर'
चालू लागले ते थेट गाडीपर्यंत.
मग यांनी त्या वासरावरून प्रेमाने हात फिरवला.
 पण आमच्याजवळ खायला द्यायला काही नव्हते, त्याचे वाईट वाटले.
मला असं वाटलं की या दोघांचे गायवासराचे, आईलेकराचेच नाते असावे.

एक छान अनुभव....

परत घराकडे वळतांना वाटेत वासरंं सहज मोजली ती हजाराच्यावर होती.
ती अगदी रस्त्याच्या मध्यभागी बसलेली होती.
गाडीचा क्लिनर खाली उतरून त्यांना अलगद बाजुला करत होता
 मग गाडी पुढे जात होती प्रत्येक मिनिटांनी असंच  
आरडाओरडा न करता गाडी पुढे जात होती.

नुकतीच जन्माला आलेली इतकी वासरं बघून खूपच छान वाटत होतं.

साक्षी गोपालाच्या दर्शनाने आमची पुरीची यात्रा, 

त्याप्रमाणे चारधामापैकी महत्त्वाचे धाम जगन्नाथपुरी संपन्न झाले.

चारधाम

रामेश्वरम
बद्रीनाथ
द्वारका
श्रीजगन्नाथ

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀


कुंती माधव मंदिर.... आणि कुकुटेश्वर मंदिर

कुंती माधव मंदिर....

२८ नोव्हेंबर २०१३ रोजी
 पिठापुरम् येथील कुंती माधवाचे दर्शन घेतले.
संपूर्ण भारतात माधवाची पाच मंदिरे आहेत
काशी - बिंदूमाधव
प्रयाग - वेणीमाधव
रामेश्वरम् - सेतूमाधव
त्रिवेंद्रम् - सुंदरमाधव
पिठापुरम् - कुंतीमाधव
अप्रतिम दर्शन झाले.

ooooo•••••ooooo•••••ooooo•••••ooooo•••••ooooo•••••ooooo•••••

कुकुटेश्वर मंदिर!!!

शुक्रवार २९ नोव्हेंबर
संध्याकाळी या मंदिरात गेलो.
भगवंतांनी गयासुराचा उद्धार केला ते हे कुकुटेश्वर मंदिर.!
येथे....

कुकुटेश्वर शंकर मंदिर,

पुरुहुतिका देवी.

राजराजेश्वरी देवी.

स्वयंभू दत्तात्रेय

येथील श्रीगणेशाची मुर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.

यांचे दर्शन घेतले.

पादगया :

येथे गयासुराच्या शरीरावर देवांनी यज्ञ केला.
येथे गयासुराच्या पायांचे दर्शन होते.
पादगया, यालाच दक्षिण गया, पूर्ण गया असं म्हणतात.

येथील स्वयंभू दत्तात्रेय...

चरीत्रामृतात उल्लेख असलेलं, भाताची शिते दत्तात्रेयांच्या मुखाजवळ दिसत असत.
अप्पलराज शर्मा, श्रीपादांचे वडिल... यांच्याबरोबर दत्तात्रेय बोलत असत.
असे दत्तात्रेय मंदिर ...

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀