कौतुक हा फार छोटा शब्द आहे.
पण ते करायला मन मात्र खुप मोठे लागतं.
कौतुक....
तुमचा डीपी छान आहे,
तुम्हाला भेटून आनंद झाला...
हा ड्रेस, साडी, पेहराव शोभून दिसतोय,
अगं किती दमलीस, सकाळपासून नुसते काम काम काम.!
माझी फिरतीची नोकरी, सगळे तुझ्यावर पडते,
तुमची बॅग छान आहे.!
तुमचं काम एकदम परफेक्ट असते,
अशा कौतुक भरल्या शब्दांनी किती आनंदित होते समोरची व्यक्ती.!
काय लागत??? कौतुक करायला?
एक साधे हास्य सुद्धा पुरते...
कुणाचेही स्वागत करायचय हसा कि.!!
काम करायचय... खूप आहे???
करा हसत हसत.... आणि बघा काय जादू होते....
एक
मुलगा आपल्या लहान भावाला पाठंगुळीस घेऊन भराभर जातोय घराकडे,
समोरून एक
गृहस्थ येतोय, दमलेला...
या मुलाला विचारतो...
याचे ओझे घेऊन चालला आहेस
दमायला नाही का होत????
मुलगा म्हणाला...
काका हे ओझे नाही माझा भाऊ आहे...
दमायला कसे होईल???
या वाक्याने त्या छोट्याला किती आनंद झाला असेल
आपल्या भावाचे कौतुक वाटले असेल???
अगं
तिच्या मुलाला छान मार्क मिळतात...
त्यात काय विशेष???
कोण येत जात नाही
काही काम नाही म मार्क मिळाले तर त्यात काय कौतुक????
पण तेच जर कौतुक भरले
शब्द असतील तर...
छान मिळाले मार्क तर... माय लेकरू दोघे खुश होतील नाही का...
शब्द... शब्द जादू घडवतात. माणसे तोडतात, जोडतात
शब्द जपून वापरावेत
पण कौतुक करताना मात्र शब्द कंजुषी करू नये.
काहीवेळा शब्दच वापरले पाहिजेत
असे नाही
आपल्या देहबोलीतून
सुद्धा कौतुक करता येते.!
फक्त एकमार्गी कोणी आपले कौतुक करावे,
आपलेच फोटो काढावेत,
असे असू नये,
आयुष्याचा खेळ बुमरँग सारखा असतो ना...
कौतुक करावे आणि करून घ्यावे...
आपल्याबरोबर कोणी चांगले वागावे असे वाटत असेल तर...
आपण पण त्यांच्या बरोबर चांगले वागले पाहिजे.!!!
काही
वेळा कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात....
तरी थोडक्यात कौतुक करून
सांगावे...
बघ कौतुक करायला शब्द कमी पडत आहेत,
डोळे भरून आले, कंठ दाटून
आला....
असो खुल्या मनाने कौतुक करावे,
मला नाही बाई कौतुक करता येत
असे म्हणून अरसिकपणा दाखवू नये.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° °°°°°°
No comments:
Post a Comment