Sunday, 3 June 2018

नुब्रा व्हॅली येथून...

Hunder

नुब्रा व्हॅली येथून... 

(लडाख)

मस्त डोंगर पण 
उघडेबोडके!
येथील हॉटेल चारही बाजूनी डोंगर आणि मध्ये हॉटेल... डोम प्रमाणे.!

मस्त चिमण्यांची 
चिवचिव .!
 अगदी आपल्या सारख्याच चिमण्या.
 फक्त जास्त गुबगुबीत.! 
या रिसॉर्ट मध्ये भाजीपाला मस्त लावलाय. 
गुलाब किती सुरेख.! 
अगदी बाल्कनी मध्ये बसल्यावर हातात येत आहेत. बाल्कनी मधून पूर्वेला सियाचीन डोंगर शिखर ...
 बर्फाच्छादित दिसतंय.! 
सियाचीन... याबद्दल आपण वाचतो  ऐकतो...
आज प्रत्यक्ष बघत आहे...
बापरे.!!! किती खडतर भाग आहे हा.! 
जवानांचे काम... किती खडतर भागात बर्फात सीमा रक्षण.!!! 
करतात

कारगिल येथे टायगर हिल बघितली... आणि इतरही चार भाग बघितले... लहानपणी आपण वाचलंय शत्रू उंचावरून हल्ला करतो आणि आपले जवान खालून मारा करतात... 
असो... कधी स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते कि या भागात येऊ आज प्रत्यक्ष आलोय... हिमालयाच्या कुशीत.!
बघू हेलिकॉप्टर, विमान लँड होताना दिसेल का...
बहुतेक आले विमान
आवाज येतोय....
सर्वजण अगदी लहान मुलांप्रमाणे आकाशाकडे बघू लागलो... 
आणि विमान उडल्यावरच दिसले... 
उडताना दिसले तर??? 
जास्त छान वाटते असे ग्रुप लीडर म्हणाला..
( नंतर हेलिकॉप्टर पण दिसले...)
 तेव्हा आम्ही प्रवास करत होतो.
(काल रात्री 10 वाजता तापमान 6 होते, 
आणि येथील व्यक्ती म्हणाली आज ज्यादा नही है, नॉर्मल...
 नॉर्मल म्हणजे 5, 6 आहे.
काल जेव्हा आम्ही इकडे हॉटेल वर आलो
प्रवासाचा शीण सगळा निघून गेला. परिसरच सुंदर मनमोहक.!
 ज्यांचे हॉटेल आहे ते आवारात असलेल्या शेतात काम करत होते,
 छान छान भाज्या, फळे लावली होती, त्याची माहिती देत होते. 
रात्रीच्या जेवणात सुंदर पालेभाजी आणि मस्त गरम गरम सूप होते.

संध्याकाळी लॉन वर चहा गप्पा झाल्या 
आणि आम्ही आजूबाजूचा परिसर फिरायला गेलो.

केसाळ कुत्रे, पहाडी कावळा, असे प्राणी बघितले,
 तेथील फळांच्या दुकानात गेलो, 
 थोडे वेगळे दिसणारे पण त्याभागात होणारे आंबे घेतले...
 फेरफटका मस्त झाला, दमायला थकायला झाले नाही.

मस्त आराम.! रिलॅक्स झालो

पुढील प्रवास करण्यासाठी तयार..


No comments:

Post a Comment