गीता
अध्याय 15 वा यातील 14 वा श्लोक
अहं वैश्वानरो भूत्वा
प्राणिनां देहमाश्रितः
प्राणापानसमायुक्तः
पचाम्यन्नं चतुर्विधम्
अर्थ : मीच (भगवंत)
सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा,
प्राण व अपानाने संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन
चार प्रकारचे अन्न पचवितो.
*चार प्रकारचे अन्न*
१. भक्ष्य : चावून खाण्याचे... भाकरी पोळी इ.
२.भोज्य : पिण्याचे दूध इ.
३. लेह्य : चाटण्याचे चटणी इ.
४. चोष्य : चोखायचे, ऊस इ.
अध्याय सहावा...
श्लोक १७
युक्ताहारविहारस्य
युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य
योगो भवति दुःखहा
अर्थ:
जो मनुष्य आपल्या आहार, निद्रा, विहार किंवा करमणूक आणि कर्म
करण्याच्या
सवयीत नियमित असतो,
तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचे निदान करू
शकतो....
हा अध्याय हा ध्यानयोग, आत्मसंयम योग नावाचा अध्याय आहे.
जेव्हा या अध्यायाची आम्हाला संथा दिली तेव्हा ....
मला पाठ करा असे सांगितले...
कारण मी योगा शिक्षक आहे...
खरतर प्रत्येक श्लोक हा नीट शिकून समजून वागण्याचा आहे
... असा कोणताही एक श्लोक सांगता येत नाही..
पण त्यातल्या त्यात हा एक श्लोक सांगितला...
आणि त्याचा अर्थ.!
गीता..
श्रीभगवानुवाच
कालोऽस्मि
लोकक्षयकृत्प्रवृद्धो
लोकान्समाहर्तुमिह
प्रवृत्तः ।
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे
येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ।।
११| ३२
श्री भगवान म्हणाले,
जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे.
आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे.
तुझ्या व्यतिरिक्त
(पांडवांव्यतिरिक्त)
दोन्ही सैन्यातील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे.
------------------------------ -------------------
No comments:
Post a Comment