उन्हाळ्यात, पाणी कमी असलेल्या जागी, समुद्रकिनारी फुलणारा गुलमोहोर.!
याची कोवळी पाने फारच सुंदर रंगाची असतात, आता लॅबर्नम वाळू लागला डार्क चॉकलेटी शेंगा दिसू लागला.. (या शेंगा आकाराने छोट्या असतात.)
आणि गुलमोहोर मात्र फुलू लागला , फुलाला पाच पाकळ्या असतात.. मध्येच केशरी पिवळी छटा असते. फुले गळतात, असे म्हणण्यापेक्षा याच्या पाकळ्या गळतात आणि सडा पडतो, फुलांना कोणताही वास नसतो, नाही देवाच्या पायाशी, नाही फ्लॉवर पॉट मध्ये... पण रस्ता कडेने ओळीने असणारे हे झाड याच्या खास रंगाने लक्ष वेधून घेते. जसा लालभडक रंग तसा केशरी रंगाची फुले असलेली झाडे बघितली आहेत. अगदी शेंड्यावर फुले असतात, आणि इतका बहरतो तेव्हा पाने आहेत कि नाहीत असे वाटते. आणि जेव्हा बहर ओसरतो तेव्हा मस्त कोवळी पोपटी पाने दिसतात... पाने छोटी छोटी असतात.. चिंचेच्या किंवा गुंजेच्या पानांसारखी.!!!
याच्या शेंगा चॉकलेटी रंगाच्या साधारण दीड दोन फूट लांब असतात त्या खुळखुळ वाजतात, पूर्वी ट्रिप मध्ये गाणी म्हणताना वाजवल्याचे स्मरते.!
या शेंगा मागील वर्षाच्या फळापासून बनतात.
याची मुळे जमिनीवर उथळ असतात...
त्यामुळे वादळ वारा सुटला तर झाड उन्मळून पडते...
रस्त्याच्या कडेने नैसर्गिक फ्लॉवर पॉट.!
आता बाकी उन्हाळी फुलांचा सिझन संपला आहे आणि गुलमोहोर बहरू लागला आहे....
अगदी लक्ष वेधून घेतोय.!!
:::::::::::::::::::::::::::::: ::::::::::::::::::::::
No comments:
Post a Comment