Saturday, 2 June 2018

कारगिल विजयपथ.!!!!!

द्रास...
 रात्री द्रास येथे पोहोचलो
साडेबारा होऊन गेले होते.
 साधेसे हॉटेल/ खानावळ. 
येथे आम्ही पोहोचलो आणि लगेच नंतर आलेल्याना काहीच मिळणार नाही असे सांगितले... 
दोन ऑप्शन्स 
भात राजमा किंवा मॅगी

झाले जेवण... परत प्रवास.... 

कारगिल.!


प्रवास केला आणि
 राहण्याची सोय बघून संपूर्ण प्रवासाचा शीण निघून गेला. 

अत्युत्तम राहण्याचे ठिकाण...

पण इकडे थोडे ऍडजस्ट करावे लागले 

Zoji La pass येथे नैसर्गिक आपत्ती असल्या मुळे काही लोक अडकले होते..!


सकाळ नेहमीप्रमाणे... अगदी लवकर पाच च्या दरम्यान... छान उजडलय
गॅलरी मध्ये डोकावले....

 ओह... काय सुंदर view आहे...

लवकर आटपले आणि तयार होऊन खाली गेले
सुंदर नाश्ता करून 
फोटो काढले
8 वाजता निघायचे होते.

कारगिल विजयपथ.!!!!!

मुख्य आकर्षण हेच तर होते... 

येथील युद्ध, कामी आलेल्या जवानांना सलाम करायचा.!
सगळे येथे आलो... येथील कथा ऐकल्या... कोणी कशी कामगिरी केली
ग्रुप मधील सगळ्यांनी 
आपले राष्ट्रगीत म्हटले
आणि माझ्या वहिनीने

भारतीय नागरिकाचा 

घास रोज अडतो ओठी

सैनिक हो तुमच्यासाठी 

हे गीत म्हटले...
ज्यांना येत होते त्यांनी म्हटले.! 
पण स्वर मात्र कातर येत होता...

येथे documentry दाखवतात
एक जवान सर्व शौर्य गाथा खड्या आवाजात सांगतात.!

येथे शत्रूचे काम म्हणजे...
भारतीय जवानांना रसद घेऊन जाणाऱ्या गाड्यांवर गोळीबार करणे....

हा आहे NH1


आता तेथे भिंत उभारली आहे,
 म्हणजे रसद घेऊन जाणाऱ्या गाड्या व्यवस्थित जातात.

येथील डोंगरावर काही लिहिले आहे... 
त्याचा अर्थ त्यावेळी सांगितला होता, 
आता मात्र विसरले

कारगिल युद्ध म्हणून जरी आपण ऐकले आहे तरी ते द्रास युद्ध आहे.

कारगिल विजयपथ...
आपल्या सरन्यायाधीश आल्या होत्या.!
त्या जवानाचें  शौर्य गाथा ऐकण्यास आमच्यासोबत उभ्या होत्या..

सर्व परिसर डोळ्यात साठवून ठेवला...



No comments:

Post a Comment