तीन दिवस न थकता मिलिटरी लोक काम करत आहेत
पण... अजूनही नाही...
कळल्याप्रमाणे रस्ता सुरु झाला
म्हणून घाईने निघालो
पण रस्ता सुरु झाला नसावा....
लवकरच सुरु होवो
आणि आम्ही मार्गस्थ व्हावे...
स्वामी धावा सुरु केलाय...
स्वामी ओ स्वामी...
आम्हाला मार्ग मिळू दे...
या ठिकाणी दोन तास गाडीत बसलो होतो
आता थोडे पुढे आलोय पण... पुन्हा ठप्प!!!
कुणी पंजाबी ड्रायव्हर छान जाल पुढे असे म्हणाला... पण
रात्र काढावी लागली तर 0 तापमान होते
करावे देशाटन...
अनुभव मिळेल....
मुंबईची थंडी... काही वेळा ती सुद्धा जास्त वाटते
काल सोनमर्ग हॉटेल मध्ये झोपलो तेव्हा 9 तापमान होते.
खूप छान मोठ्या गोधडीत गुरगुटून झोपलो... आज जवळ आहे त्या साहित्यात बसून झोपावे लागणार...
बहुतेक...
चला सुरु झाला रस्ता,
कुठेतरी डोंगरावर बर्फ.!
रस्ता वळणावळणाचा.!
कलती सूर्याची किरणे.
कधी सूर्य डाव्या बाजूला
कधी उजव्या तर कधी मागे..
खाली गाव दिसलेच तर... घराचे छप्पर लाल रंगाचे...
आणि कधी त्यावर पत्रे...
उन्हें त्यावर पडत म ती चमकत...
सर्व घरे सारखीच वाटतात,
रंग रूप आकार...
बर्फ पडतो ना... म्हणून घरावर पत्रे.!
कधी डोंगर वाळूचा, कधी झाडं, हिरवळीचा तर कधी चुनखडीचा कधी ताशीव दगडाचा...
डोंगराची निरनिराळी रूपे बघायला मिळत आहेत..
सगळ्या गाड्या आगेमागे आहेत,
पुन्हा एकदा साडे आठच्या दरम्यान गाड्या थांबल्या...
0° ला थांबल्या
थोडे लोक होते बर्फात खेळत...
पण हुश्य सुरु झाले...
आणि विजा चमकू लागल्या
पटकन सामानवर प्लास्टिक घातले
ड्रायव्हरने.!
आणि पाऊस.... गारांचा..
अगदी थर्माकोल चे मणी असतात तसे मणी पडू लागले....
मज्जा वाटली.
खूप वर्षांपूर्वी साताऱ्याहून येताना गारा गोळा केल्याचे आठवले.
चला, सुरु झाला... मार्ग
आणि पोहोचलो द्रास...
छान चंद्रप्रकाश आहे...
जेवण... मॅगी किंवा राजमा भात.!
1 वाजत आलाय...
ओह, पुढे कारगिल ला जायचय...
किती वाजले कुणास ठाऊक
कारगिल हॉटेल वर पोहोचायला...
झोपलोच लगेच...
No comments:
Post a Comment