Wednesday, 6 June 2018

Pangong


14,000 फीट वर आहोत आत्ता.!
पण अस वाटतंय कि आपण उंचावर नाही
रस्ता आता तरी सरळ वाटतय...
मध्येच नदीच्या पात्रातून आलो अगदी थोडे.....
पण त्या दगडात गाडी फसली.!
समोरून आर्मीची मारुती जिप्सी येत होती 
त्यातील एक जवान उतरला आणि
 गाडीच्या चाकाच्या आजूबाजूचे दगड बाजूला केले 
आमची गाडी त्या अडथळ्यातून बाहेर आली.
रस्त्याने केबल टाकण्याचे काम सुरु आहे.
आता आम्ही त्या बाजूने या बाजूला आलोय.

 


पँगाँग

काल पोहोचलो,
 संध्याकाळ होत होती तरी असे वाटले दुपारच आहे. 
खूप ऊन, पण वारा होताच.! लगेच थोडे फोटो काढले...

शांत संथ निळ्याशार पाण्याचा अनुभव घेतला.
प्रवास झाल्यामुळे पायात बूट, वारे म्हणून स्वेटर, कानटोपी,असा बंदोबस्त.!
 हे काढून फोटो काढण्याची हिम्मत झाली नाही..
नशीब.... सूर्य मागच्या बाजूला होता 
नाहीतर समोरच्या डोंगर रांगा बघता आल्या नसत्या.!
या लेकचे पाणी पवित्र पाणी.. 
पण कोणी म्हणे हे खारे आहे.
चारही बाजूने डोंगर
दूरवर चीन बॉर्डर.! 
शत्रू दबा धरून बसलाय.

या पाण्यावर सैबेरिया येथून येणारे समुद्र पक्षी विहार करताना दिसले
आपल्याकडे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मध्ये हे पक्षी हजारोंनी येतात...
रात्री भरपूर थंडी होती, ब्रॅन्डी घ्यावी लागली...

रात्री बहुतेक 1, 2 तापमान होते...

 श्वासाला त्रास वाटला डोके किंचित दुखले (प्रथमच)
पण झोप छान झाली.
सकाळी अगदी लवकर उजाडते
 पण सूर्योदय पाच वाजून दहाच्या दरम्यान...
 म्हणून पावणेपाच पासून जागी पण ... नेमक्या वेळेला थंडी आणि झोप.!
म्हणून सूर्योदय बघता आला नाही...
पण सूर्योदयापूर्वी चे फोटो घरातील खिडकीतून काढले.
आणि ग्रुप मधील friends नी काढलेत... सूर्योदय फोटो

नऊच्या दरम्यान रिसॉर्ट सोडले
Three idiot 
पॉईंट येथे गेलो
काही फोटो काढले.

थंड वारे वाहत आहेत म फार काळ उभे राहता आले नाही...
पण आनंद घेता आला
 बाजार झालाय, सगळ्या साठी पैसे
याक, घोडा सफारी, नेमबाजी
ड्रेस घालून स्कूटर, bike,
पिंपात बसून उभे राहून फोटो, 
तीन खुर्च्या...
 सगळे सिनेमा प्रमाणे
कुणाला रोजी रोटी मिळाली, 
निदान या सीझनला.!

आता पुन्हा लेहकडे निघालो... 
आता परतीचा प्रवास...

उद्या निघायच ना घरी येण्यासाठी


तरी वाटेत दिसणारे प्राणी, 
दिसणारे डोंगर, बर्फ नदीचे पात्र निरीक्षण,
 कुठेतरी हिरवाई 

आणि हो अजून लेह किती किमी... यावर लक्ष.!

No comments:

Post a Comment