5/31, 4:13 PM
वासरे... आठदहा डोंगरावरून येताहेत...
हिरवा
गार डोंगर, बाजूने सिंधू नदी वाहत आहे,
आणि डाव्या बाजूला गाव आहे,
आणि
नदी त्या बाजूने वाहत जात आहे,
समोर डोंगर रांग, उंचावर थोडाच बर्फ वाटत
आहे,
पण जे पाणी येतंय ते वेगात आहे,
म्हणतो ना नदी दुथडी भरून वाहत आहे...
गोधुली या एका पोस्ट ची आठवण झाली.
गाई वासरे घराकडे निघाली आहेत,
वासरे दुडक्या चालीने खूर उधळत धावत उतरली सुद्धा...
छोटी काही दिवसाचीच असावीत.! वासरे, गाय नाही फक्त वासरे.!
[5/31, 5:42 PM] आता सहा वाजत आले
पण.... ट्रॅफिक जाम
म अजूनही तिथेच
उन्ह कमी होऊ लागलंय...
कधी सुरु होणार??? कुणास ठाऊक...
काही वर्षापूर्वीच्या
पुणे मुंबई ट्रॅफिक ची आठवण होत आहे....
आज हा Zoji La पास ओपन ठेवणार आहेत म्हणे.!
तीन दिवस बंद होता ना हा पास...
जवळपास 2000 गाडया अडकल्या आहेत म्हणे...
बघू कधी सुरु होतोय???
निसर्ग सौंदर्य अप्रतिम.! हवामान सुंदर
प्रवास आजच तर सुरु झालाय..
हिमाच्छादित शिखरे..
छान हिरवाई, आता सूर्यास्त होईल कि काय???
अजून पुढे काय काय बघायला मिळेल हि जिज्ञासा....
हिमालयात
जाणे,
हिमशिखरे प्रत्यक्ष बघणे,
तेथे येणाऱ्या अडचणी,
तेथील जनजीवन जवळून
बघायचे,
लहान असताना सिंधू नदी कोणत्या मार्गाने जाते हे अभ्यासले होते,
जवळून सिंधू नदी पहायची होती...
आज प्रत्यक्ष सगळे बघत आहे.
No comments:
Post a Comment