Tuesday, 7 July 2015

का बरं असं वागतो आपण???


* ट्रेनमधील संवाद :
काय गं कसे हे कानातले?
ताई , १० रु ला १.
मग तीन घेते, २५ रु ला देणार का ????
पण.... तेच जर दुकानात, मॉलमधे गेलो आणि
 अगदी १०० रु म्हटलं तर लगेच पैसे काढून देतो.

() () () () () () () () () () () () () () ()  () () () () () () () () () () () () () () ()

एखाद्या समारंभाला जातो.
जर सर्वसामान्य व्यक्ती असेल तर...
चालेल कमी किमतीची वस्तू दिली तरी, किंवा कमी पैसे पाकिटात भरले तरी.
पण...
जर श्रीमंत असतील तर पैसे जास्त भरतो, किंवा
 अहेर घेणार नसतील तरी घ्या, घ्या म्हणून आग्रह करतो.

[] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] []  [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] []

आपल्या घरी अचानक घरी पाहुणे येतात.
 आपण भराभर आंबे कापतो, पाहुण्यांसमोर ठेवतो,
पण ते खात नाहीत.
का करतो आपण असं ????
त्यांनी ते आंबे खावे असं वाटत असेल तर
 आपण आंब्याची साल काढून, फोडी करून, वाटी चमचा असे जर पुढे ठेवले असते तर?????

{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}

प्रथमच आलेल्या पाहुण्यांना आपण समोर वेफर्स ठेवले तर......
ते खात नाहीत.
का बरं!!!!
आपण पण कोणाकडे प्रथमच गेल्यावर खाणार नाही.

का बरं?????
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

No comments:

Post a Comment