Friday, 3 July 2015

* प्रार्थना *

                                     * प्रार्थना *

आपल्या जीवनात प्रार्थनेला महत्वाचं स्थान आहे. लोक प्रार्थनेनंतर दैनंदिन कामाला सुरूवात करतात.
* प्रार्थना चालीत म्हटली तर मन चांगलं एकाग्र होते.
* आपण जी प्रार्थना म्हणणार आहोत त्याचा अर्थ माहित असणं महत्वाचं आहे.
* प्रत्येक धर्मात प्रार्थनेला अतिशय महत्त्व आहे.
* प्रार्थना अंतःकरणापासून, श्रद्धेने म्हटली पाहिजे.
* प्रार्थना म्हटली म्हणजे चांगले विचार येतात.
* प्रार्थनेत शब्दांपेक्षा मन गुंतलेले असणे जास्त चांगले.
* प्रार्थना म्हटल्यामुळे....
★ अंतःकरण शुद्ध होतं.
★ सद्सदविवेक बुद्धी प्राप्त होते.
★ मानसिक तणावापासून दूर जातो.

     ।। शांतीपाठ ।।

      ॐ सह नाववतु
      सह नौ भुनक्तु
      सहवीर्यं करवावहै।     
  तेजस्वीनावधितमस्तु।
      मा विद्विषावहै।।

  ॐ शातीः शांतीः शांतीः।।
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                                     ही मी रोज म्हणते.
                                      माझी स्वतःची!!!
प्रार्थना.....
हे देवा माझं चुकत आहे त्याबद्दल मला क्षमा कर आणि मला योग्य मार्गाने चालव.
★ तुझे गोड नाव अखंड मुखात राहू दे. शेवट जे सुटेल ते तुझे नावच असुदे.
★ सर्वांचं चांगलं कर !!!!!
ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं
ही पेपरमधे आली होती, त्यात काही माझी वाक्य आहेत.
(४ मे २०१५ संध्यानंद)
प्रार्थना.....
देवा मला चांगली बुद्धी दे !
अशी आपली प्रार्थनेची लहान वयात ओळख होते.

मग शाळेत आपण तालासुरात प्रार्थना म्हणतो. ती छान पाठ पण होते.
     प्रार्थना हे नम्रतेचं दुसरं रुप आहे. आपण त्रासात असलो, दुःखात असलो की देवाजवळ प्रार्थना करतो.
     काहीवेळा समोर उभ्या राहिलेल्या परिस्थितीला सामोरं कसं जायचं हे कळत नाही, काही मार्ग दिसत नाही, सुचत नाही, अशावेळी आपल्यापेक्षा अधिक जाणून घेणारा, सर्व ज्ञानी असलेला, असलेली परिस्थिती बदलू शकणारा, आपलं शांतपणे ऐकून घेणारा तो देव, त्याच्याकडे आपण प्रार्थना करतो.
★ मनापासून नम्र होणं ही शिकवण आपल्याला प्रार्थना देते, प्रार्थनेतून आपल्याला उर्जा मिळते.
प्रार्थना म्हणजे आत्मशोधाचा  आत्मचिंतनाचा एक मार्ग आहे. प्रार्थनेतून देवाची नुसती स्तुती करण्यापेक्षा या चैतन्याशी संवाद साधता आला पाहिजे.
★ आज सगळे घाईत आहेत. जर थोडा शांतपणा, ठेहराव हवा असेल तर तो आपल्याला प्रार्थनेतून मिळेल.
★ मनाला शांत करत नेणं, जीवन डोळसपणे जगण्याकडे जाणं, समृध्द होत राहणं, सकारात्मक होत राहणं आणि त्यातून साकारणाऱ्या जगण्याला अनुभवत राहणं....
सर्वे पि सुखिनः सन्तू।
सर्वे सन्तु निरामयाः
सर्वे भद्राणि पश्यन्तु।
मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ।।

ॐ शांतिः शांतिः शांतिः ।।

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मी ही वाचलेली प्रार्थना

हे ईश्वरा....

सर्वांना चांगली बुद्धी दे,
आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि
तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.....
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

              
                 

No comments:

Post a Comment