सुप्रभात.....
पाण्याचा रंग सांग बाई सांग
घडेल ज्याचा संग,
त्यातच दंग
घडेल ज्याचा संग,
त्यातच दंग
आजचे समुद्रदर्शन
समुद्रावर पावसाच्या ढगाची छाया पडली होती, ढग एकदम दाट होते. त्यामुळे
पाणी मातकट गढूळ दिसत होते तरीही ते संथ शांत दिसत होते. पुढे आले तर
पावसाळी ढग रस्त्यापर्यंत आला होता आणि कोणीतरी वरून पाणी टाकावे असे
सात-आठ मोठे थेंब खाली आले, या थेंबाचं चित्र जमिनीवर मात्र खरंच नाणं मोठं
कसं दिसेल तसं दिसत होतं आणि समुद्राचं पाणी मात्र छान स्वच्छ निळं!!!!
कारण आता समुद्रावर अजिबातच काळे ढग नव्हते
स्टेशनकडे वळतांना मात्र सुर्यदेवांचे दर्शन झाले पण..
खूप प्रकाशमान!!!! बघता येत नव्हते. तरी सुर्याला वंदन केले. आणि जिनखान्यांच्या बाजुने झाडाझाडातून मात्र सुंदर दर्शन झाले.
रेल्वेत बसल्यावर सुद्धा झाडातून त्याची किरण रेल्वे डब्यात येत होती. आणि सुर्याकडे बघता पण येत होते

****************************** ****************************** *********
No comments:
Post a Comment