स्वयंपाक घरातून....
१] दोडक्याची भाजी करतांना, दोडक्याची साल त्यात तिखट मीठ
घालून मिक्सर मधे वाटून घ्यावे व ते भाजीला घालावे, म्हणजे दाण्याचं कूट व
खोबरं घालावं लागत नाही.
२] पडवळाच्या बिया मिक्रमधे वाटून त्या तांदुळाच्या पिठात घालावे व घावन करावेत म्हणजे घालन चुरचुरीत होतात.
३] थालिपीठ करतांना त्यात आमटी, वरण असेल तर ते घालावे. म्हणजे एक वेगळी टेस्ट येते व ती खुसखुशीत होतात.
४] ड्रायफ्रुट लाडू करतांना खजूर घालावा व त्यात तूप घातले तर लाडू वळणे सोपे होतेे.
५] कुकरची शिटी झाल्यावर एखादे छोटे पातेले पाणी घालून
झाकणावर ठेवावे म्हणजे पाणी गरम होते आणि ते गरम पाणी हात पुसायचा रुमाल,
किंवा
तेलकट-तुपकट भांडे धुण्यासाठी होतो.
तेलकट-तुपकट भांडे धुण्यासाठी होतो.
६] कांदा चिरतांना डोळ्यातून पाणी येते ते येऊ नये म्हणून
दातात सेफ्टी पीन पकडावी पाणी येत नाही डोळ्यातून. तसेच एक लसूण सोलून बाजूला ठेवावी यामुळे डोळ्यातून पाणी येतं नाही.
दातात सेफ्टी पीन पकडावी पाणी येत नाही डोळ्यातून. तसेच एक लसूण सोलून बाजूला ठेवावी यामुळे डोळ्यातून पाणी येतं नाही.
(डोळ्यातून पाणी येणं चांगलं, कारण यानिमित्ताने डोळे स्वच्छ होतात.)
****************************** ****************
No comments:
Post a Comment