आई......घराघरातील ईश्वर....
लहान मुल जेव्हा प्रथम आई म्हणतं ना तेव्हा त्या माऊलीला आकाश ठेंगणं
होतं. मुल जेव्हा आईच्या कडेवर असतं तेव्हा त्याला कितीही आमिषं दाखवली तरी
ते कडेवरून उतरत नाही. चालू लागतं तेव्हा ते आईचा पदर सोडत नाही. पदरामागे
लपतं!!!! मग लिहायला शिकतं .. .तर श्रीकारानंतर
अ आ ई.... हेच शिकवलं जातं!!!!!
अ आ ई.... हेच शिकवलं जातं!!!!!
भीतीदायक, दुःख दायक घडलं तर
"आई गं" हेच उदगारर येतात.
विवेकानंदांनी आईचं महत्त्व सांगतांनाची गोष्ट सर्वांना माहितच आहे. एक व्यक्ती विवेकानंदांना म्हणते की आईची महती जेवढी गायली जाते तेवढे महत्त्व पित्याला का दिले जात नाही? तेव्हा ते त्या व्यक्तीला पोटाला एक धोंडा बांधून काम करायला सांगतात. तेव्हा दुसऱ्याच दिवशी ती व्यक्ती , माझी कंबर, पोट दुखतंय म्हणून ओरडत येते. तेव्हा स्वामी म्हणतात की ती माऊली नऊ महिने तुला पोटात घेऊन वाढवते, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही, त्या मातेची महती तिन्ही लोकांत सर्वश्रेष्ठच आहे.

शिवाजी महाराजांसमोर सुभेदाराच्या सुनेला उभे करतात तेव्हा महाराजांच्या तोंडून.... अशीच अमुची आई असती.... असेच उदगार येतात.
श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवदगीता सांगितली ती संस्कृत मधे आहे .
विनोबा भावे यांनी आपल्या आईला गीता वाचता यावी म्हणून ती मराठीत लिहिली
ती 'गीताई.'
जगात एवढे देश आहेत पण कोणताही देश मदर, मम्मी असा उल्लेख करत नाही.
विनोबा भावे यांनी आपल्या आईला गीता वाचता यावी म्हणून ती मराठीत लिहिली
ती 'गीताई.'
जगात एवढे देश आहेत पण कोणताही देश मदर, मम्मी असा उल्लेख करत नाही.
आपण ' भारतमाता ' असा उल्लेख करतो.
आपली मातृभूमी असंच म्हणतो.
आता आपली मुंबई
मुंबा+आई
Mum in English
Ba in gujrathi
Aai In Marathi
आता आपली मुंबई
मुंबा+आई
Mum in English
Ba in gujrathi
Aai In Marathi
आता जरा घराकडे वळू.
पुर्वी सासूला- सासुबाई, मामी, आत्या, माई म्हणत असत, मधल्या काळात अहो आई म्हटलं जाऊ लागलं !!!!
पण 'अगं', 'ए', हे नातं जास्त जवळचं वाटतं. हो ना!!!!
ए आई, ए मामी, ए मावशी, ए ताई, ए आत्या.....
तर आता सुना सासुबाईंना
'ए आई' म्हणू लागल्या आहेत.
यावर एका सुनेने सांगितलेला विचार मस्त आहे.....
ती म्हणाली मी तुला ए म्हटलं, माझ्या आईला म्हणते तसं.....
तर आई काही सांगण्यासाठी जसं रागवेल तर तिचा राग येत नाही ना तसाच सासूचा पण राग येणार नाही.
किती छान विचार आहे हा !!!!!!
No comments:
Post a Comment