असंच असतं.....
बाळाचा जन्म होतो. जिकडे तिकडे आनंदी आनंद होतो. हे बाळ
फक्त आईलाच ओळखतं. मग ते आईवर प्रेम करायला लागतं. कुणी काहीही दिलं तरी ते
आईच्या कडेवरून खाली उतरत नाही.
(आमचे शेजारी याला सिंहासन असं म्हणायचे,
ते म्हणायचे आत्ता हजार रु. द्या नाहीतर सोन्याचा गोळा काहीच फरक पडणार
नाही.)
मग हे बाळ थोडं मोठं होतं मग थोडं आईपासुन दूर जातं. त्याला खेळणी आवडू लागतात. आई मग ये , हा खाऊ घे. असं आमीष पण दाखवते पण ते खेळण्यात रमतं.
जसा शाळेत जातो तसा पुस्तकांवर, शाळेतल्या सवंगड्यांवर प्रेम करू लागतो.
मग अजून थोडा मोठा झाल्यावर मित्रमंडळी आवडू लागतात. त्यांचा पगडा जास्त असतो. मित्रांना काही बोललं तर याला राग येतो. कॉलेजमधे गेल्यावर डीग्री मिळते. मग नोकरी/ व्यवसाय करू लागतो.
मग लग्न !!!!!
जोडीदारावर प्रेम करू लागतो. मग आईकडे दुर्लक्ष!!
आईमात्र आपल्या मुलाला समजून घेते.
(इथे बाळ म्हणजे मुलगा किंवा मुलगी असं आहे).
एकजण बोलता बोलता म्हणाले होते, की जनरेशन गॅप दर १५/२० वर्षांची असते. यावेळी मुलांना आपल्या आईवडिलांची मतं वेगळी वाटू शकतात)
तसंच ते म्हणाले होते की ३० वर्षांनी वेगळे लोक भेटतात आणि ते लोक आवडतात.

तर हे निसर्गाचं चित्र आहे ते असंच फिरत राहणार, यात बदल होणार
नाह
कुठे मुलं दूर जातील, कुठे आई वडिलांना दूर ठेवतील, कुठे एकत्र
राहतील पण बोलायला वेळ नसेल.
No comments:
Post a Comment