o ऋतुनुसार, वय, उंची, पेशानुसार कपडे खरेदी करावेत, वापरावेत.
o लग्नकार्य, सहल, रोजचे ऑफिस, रात्री झोपतांनाचे कपडे वेगवेगळे असावेत.
काही कपडे, वापरता येत नाहीत, टाकूनही देता येत नाहीत
आपल्या आठवणी असतात ,
तर अशा कपड्यांपासून पर्सेस, गालीचे बॅग्ज बनवून
मिळतात. यांचे पत्ते फोन नं आपल्याकडे टिपून ठेवावेत.
o कपडे चांगल्या प्रतीचे खरेदी केले तर जेव्हा आपण ते
कोणाला तरी देतो तेव्हा ते जुने दिसत नाहीत.
व आपल्याला देतांना पण कसंतरी
वाटत नाही.
(अगदी बोहारणीला देतांना सुद्धा).
(अगदी बोहारणीला देतांना सुद्धा).
o दिवसभर घरात पंजाबी ड्रेस वापरावा.आणि जर गाऊन वापरायचा असेल तर चांगल्या प्रतीचा वापरावा.
o जुन्या जीन्स पासून सुद्धा बॅग्ज, स्कर्टस् शिवून मिळतात.
o कपडे खरेदी करतांना जवळच्या दुकानातून खरेदी करावेत.
म्हणजे ऑल्टर करावे लागणार असतील,
किंवा साडीला फॉल लावून मिळणार असेल तर
वेळ वाचतो.
o कुठे बाहेरगावी गेलो तर तेथून कोणासाठी तरी कपडे खरेदी करू
नये,
न आवडल्यास, साइज लहान-मोठा झाल्यास बदल करता येत नाही.
धुतल्यानंतर
रंग विटका झाल्यास दुकानदाराकडे जाता येत नाही.
o कपडे शिवतांना अस्तर लावायचे असेल तर ते चांगल्या प्रतीचे व स्वतः आणावे,
धुवून इस्त्री करून मगच शिंप्याला द्यावे.
o आपण जे कपडे खरेदी करतो ते जर ड्राय क्लीनींग करावे असे जर
लिहिले असेल तर
ड्राय क्लिनिंगच करावेत. आणि हो.... होम वॉश म्हटलं तरी
ड्राय क्लिनिंगच करावे.
o आपण कोणाला कपडे gift म्हणून देणार असू तर त्यांची आवड नीट
माहिती असेल तरच द्यावेत.
वापरेल एखाद्यावेळेस माझ्या आवडीचं, ते काय
जन्मभर पुरणार आहेत का असं म्हणू नये.
~•~•~•~•~•~•~•~•~•~•
~•~•~•~•~•~•~•~•~•~•
No comments:
Post a Comment