Friday, 15 May 2015

पण वेळ कोणाला ????


वैशाख वणवा......

उन्हाळा सुसह्य करण्यासाठी निसर्ग सुसज्ज आहे.
* आणि आपणसुद्धा....
* बाजारात खास उन्हाळ्यासाठी मस्त कपडे आले आहेत.
* लग्न, मुंज यासारख्या समारंभांमुळे नातेवाईक, मित्रमंडळी भेटताहेत, गप्पा गोष्टी होत आहेत, मस्त!!!
* भर दुपारी सुद्धा मस्त वाऱ्याच्या झुळका येत आहेत.
(पण पंखा, AC आहे ना)
आणि बाहेर पडलो तर AC गाडी!!!!!
* कोकीळ पक्षी मस्त गातोय!
* मोगरा सोनचाफ्याचा सुगंध!
* बाहेर पडलो तर...
पांढरा चाफा, लॅबर्नमची फुले- २,३ रंगात, बोगनवेल अनेक रंगात बहरलीय, गुलमोहोर,.... ही फुले स्वागत करतात.
कुठे कुठे आंबे दिसतात झाडावर.....मुंबईतच बरं का
(Big bazar कडे जातांना वळणावर जाऊन बघा)
* फळाममध्ये खास उन्हाळी फळं - फळांचा राजा आंबा, फणस, जाम, जांभूळ, करवंदे, कलिंगड, ताडगोळे, आवळे...... आहेतच.
* माठातले थंडगार पाणी- खास वाळा घातलेले, कोकम, लिंबू, जिंजर लेमन, आवळा सरबत, कैरीचे पन्हे.....
* जेवणात... सोलकढी, चिंचेचे सार, कैरीची कढी, .....
आंब्याचा रस, फणसाची भाजी,
तसंच मधे मधे खायला  फणसाची इडली, आंबे, फणसाचे गरे, फणसाचे तळलेले गरे, काजू, आंबा-फणस पोळी., फणसाची सांदणं......
* घरामधे जमलेली भावाबहिणींची मुलं, नातवंड त्यांच्याबरोबर खेळतांना आपण सुद्धा लहान होऊन जातोय.
* सहलीला जाऊन नवी ठिकाणं,तिथला निसर्ग पाहू.
* खास पावसाळ्यासाठी पदार्थ करतांना होणारी तारांबळ, .......
* खास उन्हाळ्यासाठी पोहायला जाणं,
पोहायचं शिकायचं राहिलं असेल तर १५ दिवसांचं शिबिर आहेच,
* आणि या सगळ्याचा आस्वाद घ्यायचा तर ही मोठ्ठी उन्हाळ्याची सुट्टी आहेच की... कुठलीच घाई, गडबड, टाईमटेबल नसलेली सुट्टी !!!!!!!!

* आणि हो आलाच की  पावसाळा जवळ......

कशावरून काय विचारता!!!!!
* खुप उकडतंय, किती हा उन्हाळा असं बोलायला लागलेत लोक!!!!!
* कावळ्यांनी घरटी बांधायला घेतली आहेत,   
* संध्याकाळनंतर पंखवाल्या मुंग्या येऊ लागल्या की दिव्याजवळ!!!!!
म्हणता म्हणता उन्हाळा संपत आलाय.......

तेवढ्यातच उन्हाळी निसर्गाची मजा अनुभवूया !!!!

....................................

2 comments:

  1. क्या बात!!! आता तुझ्या लेखनाला गती येते आहे.मस्त,वाचणारा आपोआप तुझ्यामागे चालतो आहे.संदर्भातील स्थळांची,फुलांची,पक्ष्यांची नावे या मुळे मनात त्या त्या चित्र प्रतिमा आपोआप अधोरेखित होऊ लागताहेत.घरातच पंख्याखाली बसून ,तुझ्या बरोबर चाललो आहोत असे वाटून ,प्रभातफेरी घडते आहे.लगे रहो.मस्त लेखन,असेच बहरू दे.

    ReplyDelete
  2. क्या बात!!! आता तुझ्या लेखनाला गती येते आहे.मस्त,वाचणारा आपोआप तुझ्यामागे चालतो आहे.संदर्भातील स्थळांची,फुलांची,पक्ष्यांची नावे या मुळे मनात त्या त्या चित्र प्रतिमा आपोआप अधोरेखित होऊ लागताहेत.घरातच पंख्याखाली बसून ,तुझ्या बरोबर चाललो आहोत असे वाटून ,प्रभातफेरी घडते आहे.लगे रहो.मस्त लेखन,असेच बहरू दे.

    ReplyDelete