Saturday, 30 June 2018

कौतुक

कौतुक हा फार छोटा शब्द आहे.

 पण ते करायला मन मात्र खुप मोठे लागतं.

कौतुक.... 
तुमचा डीपी छान आहे,
तुम्हाला भेटून आनंद झाला...
हा ड्रेस, साडी, पेहराव शोभून दिसतोय,
अगं किती दमलीस, सकाळपासून नुसते काम काम काम.!

माझी फिरतीची नोकरी, सगळे तुझ्यावर पडते,

तुमची बॅग छान आहे.! 

तुमचं काम एकदम परफेक्ट असते,

अशा कौतुक भरल्या शब्दांनी किती आनंदित होते समोरची व्यक्ती.!

काय लागत??? कौतुक करायला?

 एक साधे हास्य सुद्धा पुरते...
कुणाचेही स्वागत करायचय हसा कि.!!

काम करायचय... खूप आहे??? 
करा हसत हसत.... आणि बघा काय जादू होते....

एक मुलगा आपल्या लहान भावाला पाठंगुळीस घेऊन भराभर जातोय घराकडे, 
 समोरून एक गृहस्थ येतोय, दमलेला... 
या मुलाला विचारतो... 
याचे ओझे घेऊन चालला आहेस दमायला नाही का होत????
मुलगा म्हणाला... 
काका हे ओझे नाही माझा भाऊ आहे...
 दमायला कसे होईल???
 या वाक्याने त्या छोट्याला किती आनंद झाला असेल
आपल्या भावाचे कौतुक वाटले असेल???

अगं तिच्या मुलाला छान मार्क मिळतात... 
त्यात काय विशेष??? 
कोण येत जात नाही काही काम नाही म मार्क मिळाले तर त्यात काय कौतुक???? 
पण तेच जर कौतुक भरले शब्द असतील तर...
छान मिळाले मार्क तर... माय लेकरू दोघे खुश होतील नाही का...

शब्द... शब्द जादू घडवतात. माणसे तोडतात, जोडतात
शब्द जपून वापरावेत

पण कौतुक करताना मात्र शब्द कंजुषी करू नये.


 काहीवेळा शब्दच वापरले पाहिजेत
 असे नाही
आपल्या देहबोलीतून
सुद्धा कौतुक करता येते.!

फक्त एकमार्गी कोणी आपले कौतुक करावे, 
आपलेच फोटो काढावेत, 
असे असू नये,
आयुष्याचा खेळ बुमरँग सारखा असतो ना...
कौतुक करावे आणि करून घ्यावे...
आपल्याबरोबर कोणी चांगले वागावे असे वाटत असेल तर... 
आपण पण त्यांच्या बरोबर चांगले वागले पाहिजे.!!!

काही वेळा कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.... 
तरी थोडक्यात कौतुक करून सांगावे... 
बघ कौतुक करायला शब्द कमी पडत आहेत,
 डोळे भरून आले, कंठ दाटून आला....

असो खुल्या मनाने कौतुक करावे,


मला नाही बाई कौतुक करता येत

 असे म्हणून अरसिकपणा दाखवू नये.


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Tuesday, 26 June 2018

बायकांचा जीव डब्यात,

कित्ती डबे, असतात तरीही...

बायकांचा जीव डब्यात, डबीत असतो.

 अजून असे किती डबे आहेत???
खास स्त्रीधन ठेवण्याचा पितळी डबा... 
अगदी व्यवस्थित कापडात बांधून ठेवलेला.!

चकचकीत..पानसूपारीचा डबा... बैठकीच्या खोलीतला

मग आले ते स्टीलचे डबे
असा प्रवास करतकरत 
घरोघरी विराजमान झाले प्लास्टिक चे सुंदर रंगातले, आकारातले डबे
आणि सोय म्हणून विकत आणलेले पदार्थ...
 त्याला तीच नावे पडली
अमूल दह्याचा डबा, मस्ती दह्याचा डबा
 छोटा/मोठा
(वारणा) श्रीखंडाचा डबा
अमुक हॉटेल मधून भाजी आणली तो डबा.!

ऑफिस ला जाताना लोणचं, चटणी नेण्याची छोटी डबी.! (डबा)

जरा स्टेटस दाखवण्यासाठी आले नावाजलेल्या कंपनी चे डबे.. 
यांनी तर रोजचे वापरातले तेल,
 मिसळणाच्या डब्याची सुद्धा जागा घेतली.

अगदी पूर्वी एका कंपनीचे 2 kg आणि 4 kg तुपाचे पत्र्याचे डबे यायचे... 
त्याच्या ओळी असायच्या घरोघरी...
आणि यातील जुना डबा.. तुळस लावली जायची त्या डब्यात.!!!

वाळवण ठेवण्यासाठी पत्र्याचे मोठे डबे घट्ट झाकण असते म्हणून वापरले जात..

याच मोठ्या डब्यातून दिवाळीचा फराळ ठेवला जात असे...

अजून सुंदर डबी बनते दगडाची.!
 झाकणावर कोरीवकाम,
 त्यात ठेवायचे साहित्य मौल्यवान... 

किती आणि काय काय पद्धतीचे डबे आणि डब्या.!
 तेवढ्यागणिक त्याच्या आठवणी.!
 आणि हो.......  कोणाला जर असा कोणताही दाब त्यात खाऊ घालून दिला तर..... 
तो घरी येईपर्यंत जीव काही डब्यात राहत नाही 
तिला वेळेवर डबा द्यायची सवय नाही,
ती तो वापरत असेल,
आपण कसा कोणाचा डबा असेल ते वेगळा ठेवतो,  
तिने कोणाला दिला पण असेल. आता ना पुढच्या वेळी 
प्लास्टिक चा दाब देईन नको लक्षात ठेवायला 
हल्ली कोणी असे डबे, ताटली दिली तर... 
जोडी होईल म्हणून कोणाला तरी देते.

 येथपर्यंत मी लिहिले 

<><><><><><><><><><><><><>

पण जी पोस्ट वाचून सुचले ती आहे खाली असलेली पोस्ट

 बायकांचा जीव डब्यात

काही म्हणा, एकवेळ आपली साडी बायका दुसऱ्याला वापरायला देतील आणि थोडे दिवस परत नाही आली तरी शांत बसतील, पण.... घरातला एक डबा एक आठवडा जर परत आला नाही तर इतक्या अस्वस्थ होतात, की विचारू नका

हसू नका, 
वाचल्या वाचल्या तुमच्या डब्याचे मनात ट्रॅकिंग सुरू झाले नं 

ही डब्याची आवड आपण जोपर्यंत मुली असतो, तोपर्यंत सुप्त अवस्थेत असते, 
पण एकदा स्वतःचं घर झाले की एकदम जागृत होते, आणि आपणही शेवटी ह्या डब्याडब्यात गुंतून पडतो

सुरवात होते ती आईनी रुखवतात दिलेल्या चहा, साखरेच्या डब्यापासून (माहेरचे डबे पण कायम special). ते आणल्या पासून लग्न होईपर्यंत आपण कसातरी धीर धरलेला असतो , 
मग मात्र कधी एकदा ते वापरतो असे झालेले असते, आणि मग ते डबे जवळ जवळ संपूर्ण आयुष्य साथ करतात, आठवा- इतर डबे जितक्या frequently बदलतो, तितके चहा, साखर डबे नाही बदलत, वर्षानुवर्षाची सकाळ त्याच्याच दर्शनाने होते.

मग दरवर्षी मिळणारे संक्रांतीच्या लुटीचे निरनिराळ्या आकाराचे आणि size चे डबे. 
ते नीट मांडणीमध्ये ठेवता पण येत नाहीत, तरी असुदे लागतील म्हणून तसेच ठेवतो.

हौसेचे डबे वेगवेगळ्या रंगाचे, मुद्दाम आणलेले- काही दिवस अगदी एका ओळीत एका आकाराचे, एका रंगाचे राहतात, 
मग सणवार आले की *त्यात वस्तूंची आणि जागेची जी उलथापालथ होते, ती कधीच परत जागेवर येत नाही* 

ऑफिसमध्ये बसून फोनवरून घरी असलेल्या मुलामुलीला वरून  २ऱ्या कप्यात ४था डबा काढ असं म्हणलेलं शेजारणिनी ऐकलं की लगेच कौतुक सुरु , 
ही  म्हणजे अगदी भारी आहे ग, सगळं कसं जिथल्या तिथे , इथून सांगतेय  बघ ती , मग ती पण उगीचच तोंड देखलं म्हणते, अग इतकी वर्षे तेच करतेय, पण मनात  खूष

काही समारंभ असला की उरलेलं अन्न द्यायला हे डबे जे पसार होतात, 
ते कधी कधी पुढच्या समारंभातच परत मिळतात, तोपर्यंत दहादा म्हणून होतं, डबा राहिलाय तिच्याकडे, येईपर्यंत खात्री नाही, आला तर न पोचा येता परत आला तर ठीक, नाहीतर मनातल्या मनात उद्धार, पण तोडदेखलं असुदे म्हणावं लागत.

जसे आपले डबे दुसऱ्याकडे तसे त्यांचे आपल्याकडे . पण आपण मुद्दाम नाहीं हं ठेवत, काहीतरी घालून देऊ म्हणून जे राहतात, ते आपलेच होतात. असे डबे कायम त्या माणसाची आठवण करून देतात.

ह्या डब्याचे प्रकार तरी किती-  
पोळीचा आडवा, पुरणपोळी साठी आडवा पण जरा मोठा,  
पेढेघाटी (  हे नाव कस आलं माहीत नाही), कोथिंबीर ठेवायचा जाळीचा, 
अनारसे भरून अधिकमासाचा दिलेला खास डबा, 
फ्रीजमधले निराळे, सुपारीचे निराळे , ड्रायफ्रूट बॉक्स म्हणून *दिवाळीत आलेले मस्त decorative.*

डबे कितीही असले तरी दुसऱ्याकडे पाहिले की घ्यावेसे वाटतात, 
हे कोडं मला कधी सुटत नाही. स्टील असले की काचेचे घ्यावे वाटतात , काच असली की प्लास्टिक मग परत स्टील अशी रोटेशननि आपली आवड बदलत राहते. 

पितळी डबे मात्र आता अगदीच दिसेनासे झालेत.  एकेकाळी फळीवर मान असलेला आता मात्र अगदी एकटा....... पण नशीब बदलायला वेळ नाही लागत,  अचानक तोच डबा स्वयंपाक घरातून चक्क 
*antique piece* म्हणून हॉल मध्ये दिमाखात जाऊन बसतो.
कित्ती डबे,असतात तरीही...

बायकांचा जीव डब्यात, डबीत असतो.






Tuesday, 12 June 2018

अध्याय 15 वा यातील 14 वा श्लोक

 गीता

अध्याय 15 वा यातील 14 वा श्लोक


अहं वैश्वानरो भूत्वा
प्राणिनां देहमाश्रितः

प्राणापानसमायुक्तः
पचाम्यन्नं चतुर्विधम् 

अर्थ : मीच (भगवंत)
 सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा,
 प्राण व अपानाने संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन 

चार प्रकारचे अन्न पचवितो.


*चार प्रकारचे अन्न*
१. भक्ष्य : चावून खाण्याचे... भाकरी पोळी इ.
२.भोज्य : पिण्याचे दूध इ.
३. लेह्य : चाटण्याचे चटणी इ. 
४. चोष्य : चोखायचे, ऊस इ.

अध्याय सहावा...

श्लोक १७

युक्ताहारविहारस्य

युक्तचेष्टस्य कर्मसु ।

युक्तस्वप्नावबोधस्य

योगो भवति दुःखहा

अर्थ: 
जो मनुष्य आपल्या आहार, निद्रा, विहार किंवा करमणूक आणि कर्म 
करण्याच्या सवयीत  नियमित असतो,
 तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचे निदान करू शकतो....

हा अध्याय हा ध्यानयोग, आत्मसंयम योग नावाचा अध्याय आहे. 
जेव्हा या अध्यायाची आम्हाला संथा दिली तेव्हा ....
मला पाठ करा असे सांगितले... 

कारण मी योगा शिक्षक आहे...


खरतर प्रत्येक श्लोक हा नीट शिकून समजून वागण्याचा आहे
... असा कोणताही एक श्लोक सांगता येत नाही..
पण त्यातल्या त्यात हा एक श्लोक सांगितला...
आणि त्याचा अर्थ.!
गीता..
        श्रीभगवानुवाच
कालोऽस्मि 
लोकक्षयकृत्प्रवृद्धो
       लोकान्समाहर्तुमिह
प्रवृत्तः ।
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे
         येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ।।
११| ३२

श्री भगवान म्हणाले, 
जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे. 
आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. 
तुझ्या व्यतिरिक्त 
(पांडवांव्यतिरिक्त)
 दोन्ही सैन्यातील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे.

-------------------------------------------------


बर्फाच्छादित शिखरे

हिमालय, 

बर्फाच्छादित शिखरे
















बर्फाच्या भिंती
अती उंचावर
प्राणवायू ची कमतरता

Zoji La pass

Kardung pass

Chang La baba pass

जिकडे तिकडे बर्फ
जसे काढले तसे फोटो
 चद्दर ट्रेक?  गाडीतून बघितले
 zero पॉईंट 
 समोरासमोर डोंगर चालत्या गाडीतून काढले रात्रीची वेळ

Monday, 11 June 2018

सूर्योदय, सूर्यास्त.!


Pangong

समोर चीन डोंगर दिसतात
वाळूचा डोंगर
आणि वाहणारी नदी
 Pangong
सूर्योदयापूर्वी



घराच्या खिडकीतून काढला

खूपच थंडी होती
मी बाहेर जाऊ शकले नाही







सूर्योदय
 31 मे
Zoji La पास

सूर्यास्त संध्याकाळी 7 वाजता

 सूर्यास्त होताना
एखाद्या डोंगरावर अशी किरणे
आणि काही डोंगर काळोख


जॉईन हिल 
जॉईन हार्ट 



ह्या भागातून गाडी जाताना एक वेगळाच अनुभ येत होता खरोखर कसा रास्ता काढला असेल??

Sunday, 10 June 2018

लेह लडाख निवडक फोटो २


तुरतुक 



सुंदर गाव



या गावात पिठाची गिरणी

आणि डोंगरावरून वेगात येणारे पाणी 





तुरतुक येथील राहण्याचे ठिकाण



 श्रीनगर  









दल लेक

 सिंधू आणि झंस्कार  

दोन नद्यांचा संगम लेह
पुढे पाकिस्तानात जातात.


कारगिल येथील हॉटेल मधून काढला


 जेव्हा बर्फ पडत नाही तेव्हा तुरतुक या गावात अशी शेती  



हिरवाई 



दूरवर बर्फाचे डोंगर


पण सध्या बर्फाचे पाणी होते आणि ती नदी वाहत असते


बांधावरून चालू कशी???    




योल फ्रोल हि गावे बघून तुरतुक हॉटेल कडे येताना असा ट्रेक केला

मजा आली
पण... सरकून पडू का??
असे वाटत होते...

एकमेकांच्या साहाय्याने हॉटेल वर आलो...

हे असे सगळे सांभाळून उतरत होते
वाटेत तुती मिळाली

 हॉटेल वर आल्यावर 
चहा भजी आणि कॅम्प फायर




गाणी म्हटली...
मजा आली.

 बुद्धिस्ट प्रेयर व्हील्स 

om  mani padme hum 

मंत्र 

 

 stone stacking 

एक सारखी रचना कुठे बघायला मिळत नाही.