Saturday, 14 October 2017

१४ डिसेंबर संध्याकाळ Desert Safari...

दुपारी ३.३० ला निघालो.


एके ठिकाणी थांबवले आणि म्हणाले.... 

कि तुम्हाला बाईक , जीप राईड करायची तर करा...


पण वाळूचे छोटे डोंगर, टेकड्या त्यावरून ती चालवायची होती.
आम्ही कुणीच हे धाडस केले नाही. गाडीत आम्हा चौघा व्यतिरिक्त अजून दोन पंजाबी स्त्रिया होत्या.

पण फोटो काढले.
म ५.३० दरम्यान गाडीत बसलो.

 आणि ... बापरे या वाळवंटातून आमची गाडी चालू लागली.

चालू कसली पळू लागली... 

निरनिराळे धाडस गाडी चालवणारे करत होते.
आजूबाजूच्या समोरच्या गाड्या बघत आणि हात हँडलला घट्ट धरत, जमेल तसे फोटो काढत होतो....
उतरल्यावर मात्र गाडी सारथी यांना नमस्कार केला.
हॅट्स ऑफ केले.!!
कितना स्किल है आपका
गाडी चलाने का...
असे तोडक्या मोडक्या
बंबईया हिंदीत कौतुक केले
ते फक्त किंचित हसले.!

आणि बरोबर सूर्यास्ताच्या वेळी गर्दी नसलेल्या ठिकाणी पोहोचलो.
थोडा वाळूचा डोंगर चढलो, दमछाक झाली
पण  तेवढेच उंचावर जाऊन सुंदर असा सूर्यास्त बघितला.
मुलं मात्र अजून उंचावर धावत गेली. धावत उतरली.!
आणि म मुख्य ठिकाणी बाय रोड येऊन पोहचलो.
तेथे निरनिराळी आकर्षणे होती.

◇ हातावर छोटी मेंदी काढली,

◇ फलाफल खाल्ले. आणि.. 

◇ उंटावर बसून एक मस्त छोटी फेरी मारली...

☆ उंट बसताना आणि उठताना थोडे त्रासदायक असावे असे वाटले पण जेव्हा प्रत्यक्ष बसलो तेव्हा तसे वाटले नाही.
फेरी पटकन झाली.
या उंटांची तोंडे बांधली होती. ते एका ओळीत चालावे म्हणून ते दोरीने बांधले होते.... (तीन उंट होते)
जसे आपण चित्रात बघतो तसे...
आता एक शो आहे...
नंतर जेवण

शो छान होते.
उत्तरोत्तर रंगत गेले.
मन बालपणात गेले.

आगीचा गोळा... डोंबारी करायचे तसा शो...

बहुरूपी... घोडा घेऊन नाच...

दिव्यांचा शो यात त्याने हजार दोन हजार तरी गिरक्या घेतल्या...

सुरुवात गिरकी ने आणि शेवट गिरकीने.!

या गिरक्या मध्ये अनेक प्रकार केले
त्यात घेराला दिव्यांची रोषणाई सुद्धा होती.
हातात गोल पसरट तबकड्या होत्या त्याचे सुद्धा अनेक प्रकार केले..

मी तर अचमबीत होऊन
(अगदी तोंडाचा आsss करून बघत होते, फोटो काढायचे भान राहिले नाही)
******************************

 काही मनात आले ते..

 वाळवंट.... वाळूतून चढून गेलो.
तेव्हा केळशी येथील वाळूचा डोंगर चढलो त्याची आठवण आली.

   मला एक कळले नाही..

एवढे तापमान सूर्यास्त होत होता तरी वाळूत चटके बसत नव्हते.

 वाळू गार होती.

संध्याकाळ आठवणीत राहील अशी झाली.
*****************************

आजच्या सफारी दरम्यान मनात आलेले अजून काही विचार...


☆ मला वाटत प्रत्येक संकटावर येथे मात केली आहे.
 ☆ ओसाड उजाड जागी कोण गेलं असत??

☆ वाळवंटाच्या अनुभव कोणी घेतला असता??

☆ पण आज हजारो लोक तिकडे गेले. रोजच जात आहेत...

☆ शेकड्याने गाड्या गेल्या.. जात आहेत.. रोजच

☆ रस्ते सुंदर .!
☆ वीज पुरवठा उत्तम.!

☆ आजूबाजूला काही सुद्धा नाही. ना इमारती, ना घरे.
ना ऑफिसेस....




 ☆ अनेक लोक काम करत आहेत. 
☆ अनेक व्यवसाय... निर्मिती झाली आहे.
☆ अनेकांना रोजीरोटी मिळत आहे.

☆ अगदी गरुड घेऊन एक माणूस फिरत होता.. कोणाला फोटो काढायचा असेल तर..

☆ तेथील ड्रेस फोटो पुरता भाड्याने मिळत होता..
☆ अगदी डोक्याला बांधायचा रुमाल सुद्धा.!


☆ खाण्याचे स्टॉल सुद्धा...

येथे भाजलेले कणीस सुद्धा मिळाले.
★ अजून एक... 

निरनिराळ्या देशातील लोक येथे हजारोच्या संख्येने होते. 

यांची हास्याची जशी एकच भाषा तशी... टाळ्या वाजवण्याची एकच भाषा

आणि सर्वात महत्वाचे...

पर्यटक म्हणून एकच जात.!


ना कसली गडबड, गोंधळ.. ना कोणी कुठेही कसला कचरा टाकत होते..
सगळे शांततेत, शिस्तीत चालले होते...

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

No comments:

Post a Comment