सुप्रभात...
आत्ता इकडे ५.५० झाले आहेत. नेहमी प्रमाणेच जाग येते, पहाटे...
आता तांबडं फुटू लागलंय.!
चंद्राची कोर दिसत आहे.
खिडकीतून बघितले तर दुबईला पण जाग आली आहे...
सातव्या मजल्यावर आहोत.
खाली बघितले तर...
बस दिसली स्टॉप वर.
बस स्टॉप छान बंदिस्त आहे...
अर्थात एसी बस थांबा.!!!
कोणीही बस मध्ये चढू शकत नाही.
आठ दिवसांचा पास काढावा लागतो,
पण तो मेट्रो, मोनो रेल साठी पण चालतो.
टॅक्सी सर्विस महाग आहे.
गाड्या सुद्धा धावत आहेत पण तुरळक.!
(बाकी आपल्यासारखे नसणार... दूध येतंय घरोघरी... कचरा काढणारे, पाणी सोडणारे, हार लावणारे,)
(दुकानाच्या दरवाजाला)
असो,
सगळीकडे स्वच्छता आहे, कचरा काढतात तो मशीनने...
यांना पोशाख (युनिफॉर्म) आहे, आणि
इकडे कुठे कचरा दिसत नाही, कोणी टाकत नाही, दंड खूप आहे.
ट्राफिक पोलीस.... दिसत नाही कारण कॅमेरे बसवलेत... चूक झाली तर... शंभर दिऱ्हाम परस्पर खात्यातून जातात.
असो
सातव्या मजल्यावरून छान दिसतय. रूम नं आहे 706...
पहिल्या दिवशी दहाव्या मजल्यावर होतो.
रूम नं 1003
अर्थात दुसऱ्या दिवशी सूर्योदय बघितला....
सूर्यदेव अगदी वर आले कि दर्शन... तळपलेले दिसतील..
पण आत्ता मात्र छान वाटत आहे.
.............................. .....................
सगळे लिहून होईपर्यंत
वेळ दाखवत आहे...
६.१५
No comments:
Post a Comment