Sunday, 15 October 2017

जे बघितले आणि समजले ते...

१५ ऑक्टोबर


येथील तापमान 40° च्या आसपास आहे.
पण सगळीकडे एसी.

अगदी अपार्टमेंट मध्ये सुद्धा centralise एसी.

जास्त तापमान हे 56 पर्यंत जाते.

उष्णता जाणवत नाही
सतत एसी.!!!

या आता टोलेजंग इमारती दिसतात तेथे वाळवंटच होते... गेल्या काही वर्षात हि प्रगती झाली आहे.

अबुधाबी हे कॅपिटल सिटी आहे
बहुतेक business येथे आहेत
सध्या दुबईत दिवाळी रोषणाई भरपूर आहे.
{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}

 दुबई येथे जिकडे तिकडे मस्जिद आहेत 
एकही देऊळ दिसले नाही.
प्रश्न होता ....
आहे का देऊळ.??
आपल्याकडे देऊळ असले कि जवळच मस्जिद असते....


तर हो.... कृष्ण, राम आणि हनुमान यांचे मंदिर आहे....


आणि गणपती मूर्ती मिळतात.

आणि विसर्जन करण्यासाठी एक ठिकाण केले आहे.

एक जण म्हणाले कि त्या दिवशी पोलीस म्हणतो...
जो करना है वो एक दिन करो।

 येथे चोरी, लबाडी,
गाडी नियम न पाळणे असे गैर काही होत नाही.
कारण सापडला त तर खूप मोठा फाईन असतो.

जर तुमचे पाकीट पडले तर ते कुणी उचलत नाही.

पडलेल्या जागी आपल्याला मिळते.

कुणीही भिकारी येथे दिसला नाही.

येथे राहतात त्यांना मेडिकल, स्कूल फ्री आहे.
पण पाहुणे आले तर मेडिकल फी खूप आहे

250 दिऱ्हाम.!!


1 दिराम म्हणजे 17/18 ₹


ऑफिस ने घर दिले असेल तर.... छान
नाहीतर भाडे 5000 दिऱ्हाम.!!


येथे सौरऊर्जा प्रकल्प...

फक्त 5% वापरली जाते पण 2030 पर्यंत 30% पर्यंत वापरली जाईल.


रस्त्याच्या कडेने खजूर झाडे आहेत. त्यांना दिवसातून दोन वेळा पाणी घातले जाते... 

पाणी रिसायकल करून वापरतात.

वाहतूक पोलीस दिसला नाही
तरी सगळीकडे शिस्त आहे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

No comments:

Post a Comment