१६ ऑक्टोबर...
सकाळी समुद्र किनारी गेलो...
अगदी समुद्र किनारा बघून
निळाशार समुद्र
आणि पांढरी वाळू...
पोहोणाऱ्यांसाठी थोडी राखीव जागा... तेवढया भागात पोहायचे...
आम्ही दोघे पाण्यात पाय बुडवून आलो
अगदी घोटाभर पाण्यात...
अगदी लगेच कमर भर पाणी होते
फरक दिसत होता.
घोटाभर पाणी लाट येऊन फेसाळत फुटत होती.
आणि थोडे खाली खोल होते तेथील पाणी निळसर हिरवट असा मिक्स दिसत होते...
परदेशी पर्यटक... अगदी हवेतच असे कपडे घालून
कोणी सूर्य किरणं अंगावर घेत आहेत..
इतके दिवस जी इमारत सारखी बघत होतो
त्याच्या अगदी जवळ आलो अगदी बाजूलाच ती इमारत.!
बुर्ज अल अरब .... जगातील पहिले ७ स्टार हॉटेल
येथे फेडरर विरुद्ध.....
Match झाली होती
भलतेच महाग....
छान सगळं निरीक्षण करत बसलो..
बसायला बाक आहेत, झाडा भोवती, पाण्यात भिजून आल्यावर नळ आहे पाय धुण्यासाठी
आणि कपडे बदलायला बंदिस्त जागा.
अपंग व्यक्तींसाठी पाण्यात जायला एक बहुतेक mat असावे म्हणजे वाळूतून जावे लागणार नाही. अशी जागा
येथे जवळच झू पण आहे आम्ही नाही गेलो बघायला...
आजची सकाळ मस्त झाली.
No comments:
Post a Comment