Friday, 13 October 2017

दुबई ... दुसरा दिवस



शुक्रवार.... येथे सगळी ऑफिसेस शुक्रवार शनिवार बंद असतात.

सकाळी छान ब्रेकफास्ट झाला आणि आम्ही एक चक्कर मारून आलो..

आणि अबुधाबी येथून दुबई येथे येण्यासाठी  निघालो.
प्रवास सुंदर झाला.
हॉटेल वर आलो.
रूम छान आहे... 
लगेच फॅमिली friend घ्यायला आले. त्यांच्याबरोबर फिरायला निघालो,
 वाटेत सुखसागर लागले... तेथे छान नाश्ता / जेवण असे घेतले. 
आणि Emarete मॉल बघायला गेलो.. 
सुंदर असे पार्किंग... 
तेथे असलेले विशेष...

Ski दुबई....

म्हणजे बर्फाळ वातावरण पूर्णपणे... तेथे आम्ही दोघेच जायचे ठरले.

आधी पैसे भरले, एक कार्ड, आणि एक पट्टा दिला पट्टा बांधला आणि कार्ड दाखवून कपडे, बूट घेतले..
. ते घातले आणि आम्ही दोघेच निघालो बर्फाळ दुबई कडे... स्की दुबई कडे...
 उत्कंठा होती काय असेल??? किती थंडी वाजेल?? झेपेल ना...

येथे अनेक छान राईड होत्या पण.... आम्ही ते करू शकत नव्हतो.
बर्फातील स्केटिंग , घसरगुंडी, काय आणि काय...

 त्यातील एक राईड... चेअर लिफ्ट....

एक आकर्षण....

मस्त मजा आली शांतपणे त्यावर बसलो. आणि बर्फातील फेरी मारली.
खूपच थंडी वाजत होती पण मजा आली
मुले त्यावर बसून उंचावर गेल्यावर मस्त स्किइंग करत येत होती
अगदी सिनेमात बघतो तसे.!
तेथे पेंगविन बघितले मस्त वाटले... 

आम्ही बर्फात आणि मुलं बाहेर, 

काचेतून बघत होती, 

एक फोटो काढला त्यांनी, 

हात हलवून आनंद व्यक्त केला...


एक वेगळा अनुभव.!
कल्पना नसताना एवढया उकाड्यात एवढा बर्फ... आणि त्यात आम्ही जाऊन आलो.
कदाचित सगळे असते तर... सर्व राईड केल्या असत्या...
मस्त वाटले.
 हा मस्त अनुभव होता...
फक्त पैसे पुष्कळ
म आम्ही दोघेच बसलो.

मागे आम्ही सिमला मनाली येथे गेलो होतो.
तेव्हा हॉटेल वर जाण्यासाठी असा रोपवे होता... त्याला पैसे नव्हते.

आणि रोहतांग पास येथे बर्फात गेलो होतो...
बाकी बर्फात... नाही बहुतेक!!!

गारा पडताना बघितल्या, त्या वेचल्या आहेत.... प्रत्यक्ष.!

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

No comments:

Post a Comment