Monday, 16 October 2017

दुबई मॉल...

१६ ऑक्टोबर दुपार

खूपच मोठा....

आज येथील प्रथम आकर्षण... मत्स्यालय...

म सूर्यास्त... अर्थातच जगातील सर्वात उंच इमारतीवरून.. १२४ व्या मजल्यावरून.!
आणि नंतर fountan...show

मत्स्यालय बघितले

वाह अप्रतिम.!!!

खूप फोटो आणि व्हिडिओ काढले.
नावे लक्षात राहिली नसती.

पेंग्विन बघितले, मस्त व्हिडिओ घेतला.


आताच्या आता दुबई मध्ये पेंग्विन दुसऱ्यांदा बघितले.

आणि मुंबईत एकदा!!!
राजमाता जिजामाता उद्यान येथे

दुबई मॉल येथे गेल्या गेल्या मत्सालाय बघितले

अप्रतिम.! 

शब्दच कमी पडतील वर्णन करायला


तरी आम्ही वेगळ्या राईड घेतल्या नाहीत
नुसतेच मासे बघितले.

काही जण माशांबरोबर पोहत होते...
काही त्या पाण्यात बोटीतून फिरत होते.


:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

१६ ऑक्टोबर 

संध्याकाळ

दुबई मॉल मध्ये.
बुर्ज खलिफा इमारतीत जाण्यासाठी तयार आहोत..
 तिकीट आधीच काढले आहे. वेळेत आलोय.. 
 लिफ्ट साठी भलीमोठी रांग आहे... 
पण जरासुद्धा चुळबुळ, अस्वस्थता, घाई, गडबड गोंधळ नाही.
 चला, लागला नं लिफ्ट साठी, ब
हुतेक एकावेळी पंचवीस माणसे.... 
आणि काहीच वेग न कळता 
अलगद दीड मिनिटात 124 व्या मजल्यावर आलो सुद्धा.!
आणि खूप लोक असले तरी... 
असे खूप गर्दी, रेटारेटी काहीच नाही.
लोक फोटो काढत आहेत..
 कोणी मस्त बसलेत... असो

आता सूर्यास्त होईल.. 
काही मिनिटातच 

यासाठीच तर आलोय इतक्या वर
 समोर अथांग सागर.. ज्याचे वेगवेगळ्या भागातून दर्शन घेतले आहे... 
वेगळाच दिसला आहे समुद्र .... वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या वेलू
आज सकाळचा
निळाशार... उन्हातला..
सुंदर समुद्र...
आणि आताचा... 
दूरवर दिसणारा सूर्यास्त होत जाणारा... असो.. 
उंचावरून संपूर्ण दुबई पण छान दिसते...आहे.

आता फक्त संधी प्रकाश.!!

केशरी सोन्याचा गोळा
पण अजून प्रखर दिसतोय सूर्य..

छान नैसर्गिक केशरी लालसर, सोनेरी, जांभळट छटा दिसतात.

मानवाला सूर्यास्त बघण्याचे आकर्षण असते...
 कुठेही गेले तरी कसा असतो सूर्योदय , सूर्यास्त???
बघुया.....
तसे आपल्याकडे आपण बघतोच सूर्यास्त आणि सूर्योदय सुद्धा... 
आणि आपण तर ऋतुमान बदलणाऱ्या भागात राहतो...
 त्यामुळे होणारे निसर्गातील बदल अनुभवतो.

खाली कुठेतरी वाचलेले आहे...

 आकाशाला हात लागतील ... 


तसे काही नाही... पण आलोय मात्र खूपच उंचावर... खास सूर्यास्त बघण्यासाठी..
सुंदर असा सूर्यास्त बघितला... व्हिडिओ घेतला म्हणून कळले... पूर्ण सूर्यबिंब नजरेआड होण्यासाठी फक्त तीन मिनिटे..! 
अगदी कवितेच्या ओळी ओठी आल्या..
 कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा

No comments:

Post a Comment