१२ ऑक्टोबर..२०१७
सकाळी ८.३० च्या विमानाने दुबई साठी निघालो.
पहिलाच परदेश प्रवास.!
दुबई विमानतळ मोठा...
बॅग्स C8 वर मिळणार... तिकडे मेट्रो सारखी छोटी रेल्वे... त्यात बसून bagege साठी गेलो..
बॅग घेतल्या आणि बाहेर आलो. बाहेर आधीच बुक केलेली गाडी होतीच...
आज अबुधाबी येथे राहणार आहोत.
हॉटेल पर्यंत जाताना ची निरीक्षणे.
प्रवास बहुतेक दोन तासाचा आहे.
☆ दोन गाडीमधील अंतर छान असते... ☆ टोल भरण्यासाठी रांग नाही,
थांबणेच नाही, गाडीत सिम बसवलेले असते. आपोआप पैसे खात्यातून जातात
☆ स्पीड 120 च्या वर गेला तर गाडीत बेल वाजते...
☆ रस्त्याच्या कडेला थोड्या थोड्या अंतरावर एक पोल होता तो म्हणजे कॅमेरा होता...
☆ रस्ते प्रशस्त...
आणि हो...
☆ लेफ्ट हँड ड्राईव्ह.. असते बहुतेक परदेशात... (म्हणजे भारत सोडून सर्वच ठिकाणी..)
******************************
आपल्याला थोडे हे वेगळे आहे. मधेच एक आयलँड लागले,
पाणी सुंदर निळेशार....
वाळू थोडी पिवळसर...
******************************
आम्हाला
जी व्यक्ती घ्यायला आली होती ती मूळ हैद्राबादची .. पण आता येथील निवासी
गेली १४ वर्ष... कुर्ग सारख्या सुंदर ठिकाणी राहणारी पण..... आता इकडची
रहिवासी.!!!
गाडीत बसल्या बसल्या पाण्याची छोटी बाटली देऊन स्वागत केले.
*****************************
खरतर आधी सुप्रसिद्ध मस्जिद बघायला गेलो त्याचे वर्णन नंतर...
****************************** *
संध्याकाळी Emirates पॅलेस बघितला... वाह अप्रतिम.!
आता तेथे राहण्याची सोय आहे...
आम्ही खालील दालनात फिरलो..
खरतर रेस्टॉरंट आहे. पण आम्ही तिकडे खाल्ले नाही.
आम्ही दोन तीन ठिकाणे बघणार होतो.
मरिना मॉल, समुद्रकिनारा, ....
Presidencial पॅलेस बाहेरून बघितला...
सगळेच भव्यदिव्य... झगमगते..
मनात येत होते भारतातून सोन्याचा धूर निघत होता पण इकडे...
बापरे.. क्षणोक्षणी अती श्रीमंती दिसून येते...
असो काय खरेदी करावी हे मात्र कळत नाही.
आपला देशच छान खरेदी करीता.....
☆ गाडी नं पाच अंकी आहेत.
अंक इंग्लिश मध्ये.
आणि बाकी जे लिहिले ते उर्दू किंवा अरबी भाषेत
अरबीच असावी.
आता अबुधाबी येथून निघणार...
एक चक्कर मारून आलो. पायी.!!
☆ क्रॉस करताना...
झेब्रा crossing वरून आणि प्रथम उजवीकडे बघायचे ...
लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे ना...
म्हणजे तो नियम पण बदल ना....
इकडे right सिग्नल ओपन असतो.
रस्त्याच्या कडेने झाडे लावली आहेत. त्यांना दोनवेळा पाणी घालतात ते पाणी रिसायकल केलेले असते.
भरपूर हिरवी नेटकी झाडे.!!
पाऊस नोव्हेंबर मध्ये एकदा दोनदा भुरुभुरु पडतो..
पाणी रोजचे जे वापरू तसे बिल येते.
वीज तयार करण्यासाठी सुद्धा समुद्राचे पाणी रिसायकल केले जाते....
तरी सगळीकडे विजेचा चमचमाट
आणि खूपच स्वच्छता...
पादचाऱ्यांना आधी रस्ता क्रॉस करायला....
गाड्या सगळ्या नव्याच वाटतात.
पार्किंग मध्ये उभी असलेली गाडी मॉल मध्ये...स्वच्छ करणारा माणूस असतो तो त्यासाठी पैसे घेत नाही.
इकडे शुक्रवार शनिवार सुट्टी....
पाच दिवसाचा आठवडा
काही सायकल वापरतात.
बसेस सुद्धा नव्याच वाटतात...
इकडे हॉटेल वर आलो तर रूम वर पाणी नाही.
मागितले तर खूपच महाग पाणी.....
म संध्याकाळी मॉल मध्ये गेलो तर.. पाणी बाटल्या एकदम एक पॅक घेतला ८ बाटल्यांचा... स्वस्त होता.. १६ दिऱ्हाम.!
:::::::::::::::::::::::::::::: ::::::::::::::::::::::::::
No comments:
Post a Comment