बसलो क्रूझ मध्ये.
डेक फुल झालंय.!
पण हवे तेव्हा डेकवर जाता येईल...
छान चार जणांचे टेबल मिळालंय..!!
नाहीतर... सहा आठ जणांचे टेबल
म कोणी वेगळे फॅमिली...
असो
कोणाही बरोबर राहता आले पाहिजे.
आजचे डिनर मस्त होते...
संथ लाटा.. पाणी प्रवाह
बोटीत शांत संगीत आणि lighting पण शांत...
सगळे आपापल्या जागी बसलेत... कोणी फोटो काढत आहेत,
कोणी आजूबाजूचे निरीक्षण करत आहेत...
जेवण सुंदरच होते...
त्यानंतर जसा desert सफरीला नृत्य कार्यक्रम झाला
तसाच गिरक्यांचे सुंदर नृत्य झाले... अगदी जवळून बघता आले..
असेही मला नृत्य पाहायला आवडते.
निघताना.. फोटो दिले... इन्स्टंट
अर्थात त्याचे ३० दिऱ्हाम दिले.
फोटो छान आले.
कोणी काढले आणि फोटोग्राफर ने काढले तर फोटो थोडे वेगळे वाटतात.
खरतर आपण असतो तसेच दिसतो... तरी...
फोटोग्राफीची कमाल असते....
खास फोटोग्राफी ने व्यक्ती वेगळी भासते.
फोटोशॉप करून, स्पेशल इफेक्ट देऊन, एडिट करून वेगळे दिसतात फोटो.!
१. आम्ही दोघे
२. अर्चना ओंकार
३. आणि आम्ही चौघे
असे तीन फोटो काढले...
आम्ही ते घेतले.
लगेच मिळाले फोटो.!!
म्हणजे निघेपर्यंत आणून दिले...
सगळ्यांनाच..... :)
{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{} {}{}{}{}{}
No comments:
Post a Comment