Sunday, 22 October 2017

गीता... २२ ऑक्टोबर


आज मी पाचवा अध्याय पाठ करायला घेतला आहे.

हा 29 श्लोकांचा अध्याय आहे.

कर्म संन्यास योग..!!

म्हणजेच कृष्णभावनाभावित कर्म..!!


आता हा पाठांतराचा शेवटचा अध्याय आहे...

हा अध्याय पाठ झाला कि संपूर्ण गीता पाठ होईल.

○ म उत्तम कशी म्हणता येईल...
○ बिनचूक कशी म्हणता येईल..
○ बारीक सारीक कुठे चुकते, 
○ कुठे अडखळते ...

*तिकडे पूर्ण लक्ष द्यायचे आहे...*


खूप सराव करावा लागेल..

 तुमच्या सर्वांच्या सदिच्छा पाठीशी आहेत 

म्हणून मी हे करू शकत आहे
 मैत्रीणीला म्हटले तुला सांगू??

तू दिलेले पुस्तक खूप उपयोगी पडते....


प्रत्येक श्लोक पाठ करताना आधी अर्थ बघते..
शब्दाचा, मग श्लोकाचा..
म श्लोक पाठ करताना बरे पडते...

नंतर मात्र इतका अर्थ लक्षात राहत नाही
पण श्लोक पाठ होतो...

त्या पुस्तकातील फक्त अर्थच वाचते... इतर निरूपण वाचत नाही सध्या..

तेवढा वेळ नाही
श्लोक पाठांतराला महत्व
सध्या..
है ना

पुस्तकाचा छान उपयोग...

गीता जशी आहे तशी हे प्रभूपाद यांचे पुस्तक 
सिद्धी ने मला गीता संथा वर्ग सुरु झाल्यावर दिले आहे...

तिलाच मी सांगत होते कि आता माझी गीता पाठ होईल
********************************

Wednesday, 18 October 2017

दुबई येथील फोटो

१२ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर

दुबई
अटलांटा 

 

 

अथांग सागर 

छोटासा सुंदर स्वच्छ किनारा 


 लिमोझीन राईड



 डेझर्ट सफारी
 सूर्यास्त

 वाळूतून थरारकतेने गाडया चालवतात



संपूर्ण वाळवंट आणि तरीही रोज लोक येथे भेट देतात व्यवसाय मिळाला आहे येथील लोकांना 

 १६ ऑक्टोबर संध्याकाळ
विशेष दिवस
संध्याकाळी सर्वात उंच इमारतीला भेट

 गरुड
 १२३ व मजला सुंदर झुंबरे  प्रत्येक मजल्यावर
 १२४ व्या मजल्यावरून दुबई दर्शन



असा सुंदर पिझ्झा पहिल्याच दिवशी मिळाला 

 
 मस्त सूप खारवलेले भरपूर काजू



क्रूझ डिनर

Monday, 16 October 2017

दुबई मॉल...

 १६ ऑक्टोबर दुपार

खूपच मोठा....

आज येथील प्रथम आकर्षण... मत्स्यालय...
म सूर्यास्त... अर्थातच जगातील सर्वात उंच इमारतीवरून.. १२४ व्या मजल्यावरून.!
आणि नंतर fountan...show

मत्स्यालय बघितले
वाह अप्रतिम.!!!
खूप फोटो आणि व्हिडिओ काढले.
नावे लक्षात राहिली नसती.

पेंग्विन बघितले, मस्त व्हिडिओ घेतला.

आताच्या आता दुबई मध्ये पेंग्विन दुसऱ्यांदा बघितले.
ski  दुबई मध्ये

आणि मुंबईत एकदा!!!
राजमाता जिजामाता प्राणी संग्रहालय  येथे 
दुबई  मॉल येथे गेल्या गेल्या मत्सालाय बघितले
अप्रतिम.! 
शब्दच कमी पडतील वर्णन करायला

तरी आम्ही वेगळ्या राईड घेतल्या नाहीत
नुसतेच मासे बघितले.

काही जण माशांबरोबर पोहत होते...
काही त्या पाण्यात बोटीतून फिरत होते.


:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
१६ ऑक्टोबर 
संध्याकाळ
दुबई मॉल मध्ये.

बुर्ज खलिफा इमारतीत जाण्यासाठी तयार आहोत.. 

तिकीट आधीच काढले आहे. वेळेत आलोय.. 
लिफ्ट साठी भलीमोठी रांग आहे...
 पण जरासुद्धा चुळबुळ, अस्वस्थता, घाई, गडबड गोंधळ नाही.
 चला, लागला नं लिफ्ट साठी, बहुतेक एकावेळी पंचवीस माणसे....
 आणि काहीच वेग न कळता
 अलगद दीड मिनिटात 124 व्या मजल्यावर आलो सुद्धा.!
आणि खूप लोक असले तरी... असे खूप गर्दी, रेटारेटी काहीच नाही.
लोक फोटो काढत आहेत.. कोणी मस्त बसलेत... असो

आता सूर्यास्त होईल.. 
काही मिनिटातच 

यासाठीच तर आलोय इतक्या वर
 समोर अथांग सागर.. ज्याचे वेगवेगळ्या भागातून दर्शन घेतले आहे... 
वेगळाच दिसला आहे समुद्र .... वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या वेळी
आज सकाळचा
निळाशार... उन्हातला..
सुंदर समुद्र...
आणि आताचा... दूरवर दिसणारा सूर्यास्त होत जाणारा... 
असो.. उंचावरून संपूर्ण दुबई पण छान दिसते...आहे.

आता फक्त संधी प्रकाश.!!

केशरी सोन्याचा गोळा
पण अजून प्रखर दिसतोय सूर्य..

छान नैसर्गिक केशरी लालसर, सोनेरी, जांभळट छटा दिसतात.

मानवाला सूर्यास्त बघण्याचे आकर्षण असते... कुठेही गेले तरी कसा असतो सूर्यास्त???
बघुया.....
तसे आपल्याकडे आपण बघतोच सूर्यास्त आणि सूर्योदय सुद्धा... 
आणि आपण तर ऋतुमान बदलणाऱ्या भागात राहतो... त्यामुळे होणारे निसर्गातील बदल अनुभवतो.

खाली कुठेतरी वाचलेले आहे...

 आकाशाला हात लागतील ... 


तसे काही नाही...
 पण आलोय मात्र खूपच उंचावर... 
खास सूर्यास्त बघण्यासाठी..
सुंदर असा सूर्यास्त बघितला...
 व्हिडिओ घेतला म्हणून कळले..
. पूर्ण सूर्यबिंब नजरेआड होण्यासाठी फक्त तीन मिनिटे..! 
अगदी कवितेच्या ओळी ओठी आल्या.. 

कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा...

नंतर जिने चढून 125 व्या मजल्यावर गेलो..

३६ पायऱ्या अर्थात गोलाकार जिने....

थोडावेळ सगळे पुन्हा निरीक्षण केले

परत खाली आलो

म मात्र या शहराचे शांतपणे बदलणारे रूप बघत होते...

 हळूहळू चमचमती.. दुबई दिसू लागली...

 ब्रिजचे जाळे, दिसणारा ट्रॅफिक... पण सतत.. प्रवाही...

ट्रॅफिक जाम कुठंच दिसत नाही.

उंच इमारती आता खाली दिसत आहेत..

आता बघितले तर.. वर स्टॉल्स आहेत... पण काही घ्यायचे नव्हते...

चला लिफ्ट साठी रांग लावली...
लिफ्ट आली.. निघालो
१२३ व्या मजल्यावर उतरलो... 
आणि वेगळ्या लिफ्ट साठी उभे राहिलो.
निरीक्षण केले...
 या मजल्यावर ऑफिस असावे... छान वाटत होते

प्रत्येक ठिकाणी सुंदर वेगवेगळी झुंबर.. काचेची

असो.. लिफ्ट आली आणि एक मिनिटात खाली आलो सुद्धा...

१२ तारखेला जेव्हा दुबई विमान तळावर उतरलो तेव्हा वाचले होते...

स्वर्गाचा दरवाजा चीन येथे तर.... 

त्या दरवाजाची किल्ली दुबई आहे

(असे इंग्रजी वाक्य विमानतळावर वाचले...)


त्यानंतर तिकडेच जेवलो

आणि नंतर fountain शो बघितला जेवता जेवता

छोटासा पण छान झाला. Show


यांचा खास वाढदिवस साठ  पूर्ण 

परदेशी दुबई येथे 

जगातील उंच इमारतीत १२४ व्या मजल्यावर 

आगळ्या वेगळ्या रीतीने साजरा झाला 

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

निळाशार समुद्र आणि पांढरी वाळू...

१६ ऑक्टोबर...
सकाळी समुद्र किनारी गेलो...
अगदी समुद्र किनारा बघून 

व्वा.! आले.

 

 

निळाशार समुद्र

आणि पांढरी वाळू...

पोहोणाऱ्यांसाठी थोडी राखीव जागा... तेवढया भागात पोहायचे...

आम्ही दोघे पाण्यात पाय बुडवून आलो
अगदी घोटाभर पाण्यात...
अगदी लगेच कमर भर पाणी होते
फरक दिसत होता.
घोटाभर पाणी लाट येऊन फेसाळत फुटत होती.
आणि थोडे खाली खोल होते तेथील पाणी निळसर हिरवट असा मिक्स दिसत होते...


परदेशी पर्यटक... अगदी हवेतच असे कपडे घालून
कोणी सूर्य किरणं अंगावर घेत आहेत..

इतके दिवस जी इमारत सारखी बघत होतो 

त्याच्या अगदी जवळ आलो अगदी बाजूलाच ती इमारत.!

 बुर्ज अल  अरब .... जगातील पहिले ७ स्टार हॉटेल 

 


येथे फेडरर विरुद्ध.....
Match झाली होती

येथे ice cream घेतले

भलतेच महाग....
छान सगळं निरीक्षण करत बसलो..
फोटो काढले.

बसायला बाक आहेत, झाडा भोवती, पाण्यात भिजून आल्यावर नळ आहे पाय धुण्यासाठी
आणि कपडे बदलायला बंदिस्त जागा.

अपंग व्यक्तींसाठी पाण्यात जायला एक बहुतेक mat असावे म्हणजे वाळूतून जावे लागणार नाही. अशी जागा
येथे जवळच झू पण आहे आम्ही नाही गेलो बघायला...
आजची सकाळ मस्त झाली.

येथेच जगातील मोठे सेव्हन स्टार हॉटेल आहे.





दुबई मॉल...

१६ ऑक्टोबर दुपार

खूपच मोठा....

आज येथील प्रथम आकर्षण... मत्स्यालय...

म सूर्यास्त... अर्थातच जगातील सर्वात उंच इमारतीवरून.. १२४ व्या मजल्यावरून.!
आणि नंतर fountan...show

मत्स्यालय बघितले

वाह अप्रतिम.!!!

खूप फोटो आणि व्हिडिओ काढले.
नावे लक्षात राहिली नसती.

पेंग्विन बघितले, मस्त व्हिडिओ घेतला.


आताच्या आता दुबई मध्ये पेंग्विन दुसऱ्यांदा बघितले.

आणि मुंबईत एकदा!!!
राजमाता जिजामाता उद्यान येथे

दुबई मॉल येथे गेल्या गेल्या मत्सालाय बघितले

अप्रतिम.! 

शब्दच कमी पडतील वर्णन करायला


तरी आम्ही वेगळ्या राईड घेतल्या नाहीत
नुसतेच मासे बघितले.

काही जण माशांबरोबर पोहत होते...
काही त्या पाण्यात बोटीतून फिरत होते.


:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

१६ ऑक्टोबर 

संध्याकाळ

दुबई मॉल मध्ये.
बुर्ज खलिफा इमारतीत जाण्यासाठी तयार आहोत..
 तिकीट आधीच काढले आहे. वेळेत आलोय.. 
 लिफ्ट साठी भलीमोठी रांग आहे... 
पण जरासुद्धा चुळबुळ, अस्वस्थता, घाई, गडबड गोंधळ नाही.
 चला, लागला नं लिफ्ट साठी, ब
हुतेक एकावेळी पंचवीस माणसे.... 
आणि काहीच वेग न कळता 
अलगद दीड मिनिटात 124 व्या मजल्यावर आलो सुद्धा.!
आणि खूप लोक असले तरी... 
असे खूप गर्दी, रेटारेटी काहीच नाही.
लोक फोटो काढत आहेत..
 कोणी मस्त बसलेत... असो

आता सूर्यास्त होईल.. 
काही मिनिटातच 

यासाठीच तर आलोय इतक्या वर
 समोर अथांग सागर.. ज्याचे वेगवेगळ्या भागातून दर्शन घेतले आहे... 
वेगळाच दिसला आहे समुद्र .... वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या वेलू
आज सकाळचा
निळाशार... उन्हातला..
सुंदर समुद्र...
आणि आताचा... 
दूरवर दिसणारा सूर्यास्त होत जाणारा... असो.. 
उंचावरून संपूर्ण दुबई पण छान दिसते...आहे.

आता फक्त संधी प्रकाश.!!

केशरी सोन्याचा गोळा
पण अजून प्रखर दिसतोय सूर्य..

छान नैसर्गिक केशरी लालसर, सोनेरी, जांभळट छटा दिसतात.

मानवाला सूर्यास्त बघण्याचे आकर्षण असते...
 कुठेही गेले तरी कसा असतो सूर्योदय , सूर्यास्त???
बघुया.....
तसे आपल्याकडे आपण बघतोच सूर्यास्त आणि सूर्योदय सुद्धा... 
आणि आपण तर ऋतुमान बदलणाऱ्या भागात राहतो...
 त्यामुळे होणारे निसर्गातील बदल अनुभवतो.

खाली कुठेतरी वाचलेले आहे...

 आकाशाला हात लागतील ... 


तसे काही नाही... पण आलोय मात्र खूपच उंचावर... खास सूर्यास्त बघण्यासाठी..
सुंदर असा सूर्यास्त बघितला... व्हिडिओ घेतला म्हणून कळले... पूर्ण सूर्यबिंब नजरेआड होण्यासाठी फक्त तीन मिनिटे..! 
अगदी कवितेच्या ओळी ओठी आल्या..
 कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा

आज १६ ऑक्टोबर.. विशेष दिवस.!!!!!

सुप्रभात...


आत्ता इकडे ५.५० झाले आहेत. नेहमी प्रमाणेच जाग येते, पहाटे...
आता तांबडं फुटू लागलंय.!
चंद्राची कोर दिसत आहे.
खिडकीतून बघितले तर दुबईला पण जाग आली आहे... 
सातव्या मजल्यावर आहोत. 
खाली बघितले तर... 
बस दिसली स्टॉप वर. 

बस स्टॉप छान बंदिस्त आहे... 

 अर्थात एसी बस थांबा.!!! 

कोणीही बस मध्ये चढू शकत नाही.
आठ दिवसांचा पास काढावा लागतो, 
पण तो मेट्रो, मोनो रेल साठी पण चालतो. 
टॅक्सी सर्विस महाग आहे. 
गाड्या सुद्धा धावत आहेत पण तुरळक.!
(बाकी आपल्यासारखे नसणार... दूध येतंय घरोघरी... कचरा काढणारे, पाणी सोडणारे, हार लावणारे,)
(दुकानाच्या दरवाजाला)

असो,
सगळीकडे स्वच्छता आहे, कचरा काढतात तो मशीनने... 
यांना पोशाख (युनिफॉर्म) आहे, आणि 
इकडे कुठे कचरा दिसत नाही, कोणी टाकत नाही, दंड खूप आहे.
ट्राफिक पोलीस.... दिसत नाही कारण कॅमेरे बसवलेत... चूक झाली तर... शंभर  दिऱ्हाम परस्पर खात्यातून जातात.
असो 
सातव्या मजल्यावरून छान दिसतय. रूम नं आहे 706...
पहिल्या दिवशी दहाव्या मजल्यावर होतो. 
रूम नं 1003
अर्थात दुसऱ्या दिवशी सूर्योदय बघितला....

सूर्यदेव अगदी वर आले कि दर्शन... तळपलेले दिसतील..
पण आत्ता मात्र छान वाटत आहे.

...................................................

सगळे लिहून होईपर्यंत
 वेळ दाखवत आहे...
६.१५
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::


आमच्या हॉटेल मधून दिसत होते


Sunday, 15 October 2017

क्रूझ डिनर... १५ ऑक्टोबर संध्याकाळ...

बसलो क्रूझ मध्ये.


डेक फुल झालंय.!
पण हवे तेव्हा डेकवर जाता येईल...
छान चार जणांचे टेबल मिळालंय..!!

नाहीतर... सहा आठ जणांचे टेबल
म कोणी वेगळे फॅमिली...

असो
कोणाही बरोबर राहता आले पाहिजे.



 आजचे डिनर मस्त होते...
संथ लाटा.. पाणी प्रवाह

बोटीत शांत संगीत आणि lighting पण शांत...

सगळे आपापल्या जागी बसलेत... कोणी फोटो काढत आहेत,
 कोणी आजूबाजूचे निरीक्षण करत आहेत...

जेवण सुंदरच होते...
त्यानंतर जसा desert सफरीला नृत्य कार्यक्रम झाला 

तसाच गिरक्यांचे सुंदर नृत्य झाले... अगदी जवळून बघता आले..

असेही मला नृत्य पाहायला आवडते.

निघताना.. फोटो दिले...  इन्स्टंट
अर्थात त्याचे ३० दिऱ्हाम दिले.
फोटो छान आले.

कोणी काढले आणि फोटोग्राफर ने काढले तर फोटो थोडे वेगळे वाटतात.

खरतर आपण असतो तसेच दिसतो... तरी...
फोटोग्राफीची कमाल असते....
खास फोटोग्राफी ने व्यक्ती वेगळी भासते.

फोटोशॉप करून, स्पेशल इफेक्ट देऊन, एडिट करून वेगळे दिसतात फोटो.!

१. आम्ही दोघे
२. अर्चना ओंकार
३. आणि आम्ही चौघे
असे तीन फोटो काढले...
आम्ही ते घेतले.

लगेच मिळाले फोटो.!!
इन्स्टंट..!!



म्हणजे निघेपर्यंत आणून दिले...
सगळ्यांनाच..... :)
{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}




जे बघितले आणि समजले ते...

१५ ऑक्टोबर


येथील तापमान 40° च्या आसपास आहे.
पण सगळीकडे एसी.

अगदी अपार्टमेंट मध्ये सुद्धा centralise एसी.

जास्त तापमान हे 56 पर्यंत जाते.

उष्णता जाणवत नाही
सतत एसी.!!!

या आता टोलेजंग इमारती दिसतात तेथे वाळवंटच होते... गेल्या काही वर्षात हि प्रगती झाली आहे.

अबुधाबी हे कॅपिटल सिटी आहे
बहुतेक business येथे आहेत
सध्या दुबईत दिवाळी रोषणाई भरपूर आहे.
{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}

 दुबई येथे जिकडे तिकडे मस्जिद आहेत 
एकही देऊळ दिसले नाही.
प्रश्न होता ....
आहे का देऊळ.??
आपल्याकडे देऊळ असले कि जवळच मस्जिद असते....


तर हो.... कृष्ण, राम आणि हनुमान यांचे मंदिर आहे....


आणि गणपती मूर्ती मिळतात.

आणि विसर्जन करण्यासाठी एक ठिकाण केले आहे.

एक जण म्हणाले कि त्या दिवशी पोलीस म्हणतो...
जो करना है वो एक दिन करो।

 येथे चोरी, लबाडी,
गाडी नियम न पाळणे असे गैर काही होत नाही.
कारण सापडला त तर खूप मोठा फाईन असतो.

जर तुमचे पाकीट पडले तर ते कुणी उचलत नाही.

पडलेल्या जागी आपल्याला मिळते.

कुणीही भिकारी येथे दिसला नाही.

येथे राहतात त्यांना मेडिकल, स्कूल फ्री आहे.
पण पाहुणे आले तर मेडिकल फी खूप आहे

250 दिऱ्हाम.!!


1 दिराम म्हणजे 17/18 ₹


ऑफिस ने घर दिले असेल तर.... छान
नाहीतर भाडे 5000 दिऱ्हाम.!!


येथे सौरऊर्जा प्रकल्प...

फक्त 5% वापरली जाते पण 2030 पर्यंत 30% पर्यंत वापरली जाईल.


रस्त्याच्या कडेने खजूर झाडे आहेत. त्यांना दिवसातून दोन वेळा पाणी घातले जाते... 

पाणी रिसायकल करून वापरतात.

वाहतूक पोलीस दिसला नाही
तरी सगळीकडे शिस्त आहे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

गोल्ड मार्केट...मसाला मार्केट.

१५ ऑक्टोबर

आपला झवेरी बाजार.!!!
 गोल्ड मार्केट
डोळे दिपले


मसाला मार्केट.

येथे भेट दिली.

3 डब्या  केशर घेतले.

आपले भुलेश्वर मार्केट आहे तसे होलसेल मार्केट...

बाकी काहीच खरेदी केली नाही.

वेळ होता.
          फिरून आलो.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
हॉटेल रूम वर आलो आणि सहज टेबलचा खण उघडला तर...
त्यात एक कुराण प्रत आहे...


जर कोणी मुस्लिम असेल तर त्यांना त्यांच्या वेळेनुसार नमाज करता यावा...
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आपल्या येथे असे काही असते का????
 आणि आसन सुद्धा आहे तेथे...
 आताच पडलेला प्रश्न एका मैत्रिणीला विचारला... तर ती म्हणाली कि..
बंगलोर येथे भगवद गीता आणि गोवा येथे बायबल होते.

मी दोन्ही ठिकाणी जाऊन आले पण... असे असल्याचे बघितले नाही..
(टेबलचा ड्रॉवर उघडून बघितला नाही)
*******************************
आणि एकदम लक्षात आले

आज एकादशी आहे..
मी दर एकादशीला संपूर्ण गीता वाचते.
दुबई येथे येताना असे म्हटले होते,
 बहुतेक नाही जमणार गीता वाचायला.! पण आज वेळ आहे... 
आता एकदम संध्याकाळी बाहेर जायचय..
आणि सगळी गीता झाली कि वाचून..

चांगली इच्छा नेहमी पूर्ण होते.!!


******************************

Saturday, 14 October 2017

१४ डिसेंबर संध्याकाळ Desert Safari...

दुपारी ३.३० ला निघालो.


एके ठिकाणी थांबवले आणि म्हणाले.... 

कि तुम्हाला बाईक , जीप राईड करायची तर करा...


पण वाळूचे छोटे डोंगर, टेकड्या त्यावरून ती चालवायची होती.
आम्ही कुणीच हे धाडस केले नाही. गाडीत आम्हा चौघा व्यतिरिक्त अजून दोन पंजाबी स्त्रिया होत्या.

पण फोटो काढले.
म ५.३० दरम्यान गाडीत बसलो.

 आणि ... बापरे या वाळवंटातून आमची गाडी चालू लागली.

चालू कसली पळू लागली... 

निरनिराळे धाडस गाडी चालवणारे करत होते.
आजूबाजूच्या समोरच्या गाड्या बघत आणि हात हँडलला घट्ट धरत, जमेल तसे फोटो काढत होतो....
उतरल्यावर मात्र गाडी सारथी यांना नमस्कार केला.
हॅट्स ऑफ केले.!!
कितना स्किल है आपका
गाडी चलाने का...
असे तोडक्या मोडक्या
बंबईया हिंदीत कौतुक केले
ते फक्त किंचित हसले.!

आणि बरोबर सूर्यास्ताच्या वेळी गर्दी नसलेल्या ठिकाणी पोहोचलो.
थोडा वाळूचा डोंगर चढलो, दमछाक झाली
पण  तेवढेच उंचावर जाऊन सुंदर असा सूर्यास्त बघितला.
मुलं मात्र अजून उंचावर धावत गेली. धावत उतरली.!
आणि म मुख्य ठिकाणी बाय रोड येऊन पोहचलो.
तेथे निरनिराळी आकर्षणे होती.

◇ हातावर छोटी मेंदी काढली,

◇ फलाफल खाल्ले. आणि.. 

◇ उंटावर बसून एक मस्त छोटी फेरी मारली...

☆ उंट बसताना आणि उठताना थोडे त्रासदायक असावे असे वाटले पण जेव्हा प्रत्यक्ष बसलो तेव्हा तसे वाटले नाही.
फेरी पटकन झाली.
या उंटांची तोंडे बांधली होती. ते एका ओळीत चालावे म्हणून ते दोरीने बांधले होते.... (तीन उंट होते)
जसे आपण चित्रात बघतो तसे...
आता एक शो आहे...
नंतर जेवण

शो छान होते.
उत्तरोत्तर रंगत गेले.
मन बालपणात गेले.

आगीचा गोळा... डोंबारी करायचे तसा शो...

बहुरूपी... घोडा घेऊन नाच...

दिव्यांचा शो यात त्याने हजार दोन हजार तरी गिरक्या घेतल्या...

सुरुवात गिरकी ने आणि शेवट गिरकीने.!

या गिरक्या मध्ये अनेक प्रकार केले
त्यात घेराला दिव्यांची रोषणाई सुद्धा होती.
हातात गोल पसरट तबकड्या होत्या त्याचे सुद्धा अनेक प्रकार केले..

मी तर अचमबीत होऊन
(अगदी तोंडाचा आsss करून बघत होते, फोटो काढायचे भान राहिले नाही)
******************************

 काही मनात आले ते..

 वाळवंट.... वाळूतून चढून गेलो.
तेव्हा केळशी येथील वाळूचा डोंगर चढलो त्याची आठवण आली.

   मला एक कळले नाही..

एवढे तापमान सूर्यास्त होत होता तरी वाळूत चटके बसत नव्हते.

 वाळू गार होती.

संध्याकाळ आठवणीत राहील अशी झाली.
*****************************

आजच्या सफारी दरम्यान मनात आलेले अजून काही विचार...


☆ मला वाटत प्रत्येक संकटावर येथे मात केली आहे.
 ☆ ओसाड उजाड जागी कोण गेलं असत??

☆ वाळवंटाच्या अनुभव कोणी घेतला असता??

☆ पण आज हजारो लोक तिकडे गेले. रोजच जात आहेत...

☆ शेकड्याने गाड्या गेल्या.. जात आहेत.. रोजच

☆ रस्ते सुंदर .!
☆ वीज पुरवठा उत्तम.!

☆ आजूबाजूला काही सुद्धा नाही. ना इमारती, ना घरे.
ना ऑफिसेस....




 ☆ अनेक लोक काम करत आहेत. 
☆ अनेक व्यवसाय... निर्मिती झाली आहे.
☆ अनेकांना रोजीरोटी मिळत आहे.

☆ अगदी गरुड घेऊन एक माणूस फिरत होता.. कोणाला फोटो काढायचा असेल तर..

☆ तेथील ड्रेस फोटो पुरता भाड्याने मिळत होता..
☆ अगदी डोक्याला बांधायचा रुमाल सुद्धा.!


☆ खाण्याचे स्टॉल सुद्धा...

येथे भाजलेले कणीस सुद्धा मिळाले.
★ अजून एक... 

निरनिराळ्या देशातील लोक येथे हजारोच्या संख्येने होते. 

यांची हास्याची जशी एकच भाषा तशी... टाळ्या वाजवण्याची एकच भाषा

आणि सर्वात महत्वाचे...

पर्यटक म्हणून एकच जात.!


ना कसली गडबड, गोंधळ.. ना कोणी कुठेही कसला कचरा टाकत होते..
सगळे शांततेत, शिस्तीत चालले होते...

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

लिमोझिन राईड...

 १४ डिसेंबर २०१७
सकाळ...

लिमोझिन राईड...

एक तास.... होती.
बाहेरून लांबून बघायचा पॅलेस... येथे नेतात बहुतेक.! एक तासात एवढेच बघता येते.
फोटोग्राफी साठी उत्तम आहे .
छान गार्डन....






पॅलेस खूप लांबून बघायचा...

पण लोक फोटो साठी येतात.
गाडीवल्याने सुरुवातीला माहिती दिली.
लिमोझिन मध्ये...
संगीत ऐकू शकता, 
सॉफ्ट ड्रिंक घेऊ शकता...
आता एकतास मी तुमच्या बरोबर आहे...

त्या महालात खूप मोर आहेत असे कळले.
पण आम्हाला मात्र दिसले नाहीत.

पण ... लिमोझिन राईड मिळाली....
नाहीतर आपण कुठे बसणार या गाडीत???
फिरून आलो आणि वाहन चालकाचा
 गाडी बरोबर फोटो काढला... ते खूपच खुश झाले.

छोटीशी गोष्ट.... चेहऱ्यावर एक छान स्मित देऊन गेले त्यांच्या...

येथे माझ्या आवडीची गवती गुलाबाची खूप फुले बघायला मिळाली...

रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला...
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे लळा लळा....

✽ ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽ ✽

यालाच ऑफिस टाईम किंवा ten O'clock असे सुद्धा म्हणतात.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

Friday, 13 October 2017

अलं जुमेरा ते अटलांटिस स्टेशन

 १३ ऑक्टोबर

 संध्याकाळी एक छान अनुभव घेतला... मोनो  मध्ये बसलो.

अलं जुमेरा ते अटलांटिस स्टेशन


या रेल चे वैशिष्ट्य...
हा भाग कसा वसवला आहे याचे उत्तम दर्शन होते. सुप्रसिद्ध अटलांटा हॉटेल... जे समुद्रावर आहे... सुंदर सूर्यास्त या रेल मधून बघितला... 
२डिसेंबर हा येथील नॅशनल डे आहे

मेट्रो स्टेशन चे नाव
 2 December station
सगळीकडे प्रवेश घेण्यासाठी कार्ड पद्धत आहे. 
अगदी लिफ्ट मध्ये शिरण्यापासून...
 रेलमध्ये, स्की दुबईत राईड घ्यायला सुद्धा....


तर सुंदर छोटा समुद्र किनारा...
 थोडे उभे राहिलो आणि पुढील आश्चर्य... 
टनेल, बोगद्यातून आमची गाडी जात होती आणि आमच्या वरून अथांग सागर... 
कळत सुद्धा नाही
आणि थोड्या वेळाने आम्ही समुद्रावरून... 
पण ते हि कळले नाही.
अटलांटा येथे कोणत्यातरी सिनेमाचे शूटिंग झाले आहे.

आज प्रवासा दरम्यान एक ठिकाण लागले...
 तेथे शाहरुख खान यांना एक निवास स्थान भेट म्हणून दिले आहे. 

आणि अजून कोणी तरी
नाव विसरले.

तसे Emerates मॉल येथे आशा भोसले यांचा Asha's असे खाण्याचे ठिकाण आहे...
हि संध्याकाळ नजरेत साठवले, फोटोत काही बंदिस्त केले...

आमचे फॅमिली friend इकडचे रहिवासी!!
गेली सात वर्षे इकडे स्थायिक
त्यांनी छान फिरवले, उत्तम माहिती देत होते...


हा खरतर यांचा विद्यार्थी आणि जावयाचा खास मित्र.!

रात्री त्यांच्या घरी गेलो जेवायला!!!

आणि येताना दोघेच टॅक्सी ने हॉटेल वर आलो


प्रथमच येथील चलन वापरले...


त्यांचे घर जुन्या दुबई मध्ये आहे 


53 .50 दिऱ्हाम झाले,

ड्रायव्हरने सगळे पैसे दिले.

Chutta नही असे टिपिकल उत्तर आले नाही

२डिसेंबर हा येथील नॅशनल डे आहे


मेट्रो स्टेशन चे नाव

 2 December station


दुबई ... दुसरा दिवस



शुक्रवार.... येथे सगळी ऑफिसेस शुक्रवार शनिवार बंद असतात.

सकाळी छान ब्रेकफास्ट झाला आणि आम्ही एक चक्कर मारून आलो..

आणि अबुधाबी येथून दुबई येथे येण्यासाठी  निघालो.
प्रवास सुंदर झाला.
हॉटेल वर आलो.
रूम छान आहे... 
लगेच फॅमिली friend घ्यायला आले. त्यांच्याबरोबर फिरायला निघालो,
 वाटेत सुखसागर लागले... तेथे छान नाश्ता / जेवण असे घेतले. 
आणि Emarete मॉल बघायला गेलो.. 
सुंदर असे पार्किंग... 
तेथे असलेले विशेष...

Ski दुबई....

म्हणजे बर्फाळ वातावरण पूर्णपणे... तेथे आम्ही दोघेच जायचे ठरले.

आधी पैसे भरले, एक कार्ड, आणि एक पट्टा दिला पट्टा बांधला आणि कार्ड दाखवून कपडे, बूट घेतले..
. ते घातले आणि आम्ही दोघेच निघालो बर्फाळ दुबई कडे... स्की दुबई कडे...
 उत्कंठा होती काय असेल??? किती थंडी वाजेल?? झेपेल ना...

येथे अनेक छान राईड होत्या पण.... आम्ही ते करू शकत नव्हतो.
बर्फातील स्केटिंग , घसरगुंडी, काय आणि काय...

 त्यातील एक राईड... चेअर लिफ्ट....

एक आकर्षण....

मस्त मजा आली शांतपणे त्यावर बसलो. आणि बर्फातील फेरी मारली.
खूपच थंडी वाजत होती पण मजा आली
मुले त्यावर बसून उंचावर गेल्यावर मस्त स्किइंग करत येत होती
अगदी सिनेमात बघतो तसे.!
तेथे पेंगविन बघितले मस्त वाटले... 

आम्ही बर्फात आणि मुलं बाहेर, 

काचेतून बघत होती, 

एक फोटो काढला त्यांनी, 

हात हलवून आनंद व्यक्त केला...


एक वेगळा अनुभव.!
कल्पना नसताना एवढया उकाड्यात एवढा बर्फ... आणि त्यात आम्ही जाऊन आलो.
कदाचित सगळे असते तर... सर्व राईड केल्या असत्या...
मस्त वाटले.
 हा मस्त अनुभव होता...
फक्त पैसे पुष्कळ
म आम्ही दोघेच बसलो.

मागे आम्ही सिमला मनाली येथे गेलो होतो.
तेव्हा हॉटेल वर जाण्यासाठी असा रोपवे होता... त्याला पैसे नव्हते.

आणि रोहतांग पास येथे बर्फात गेलो होतो...
बाकी बर्फात... नाही बहुतेक!!!

गारा पडताना बघितल्या, त्या वेचल्या आहेत.... प्रत्यक्ष.!

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::