* एक सुंदर अनुभव. *
रविवारची संध्याकाळ , आम्ही समुद्रकिनारी फिरायला गेलो होतो. वाळुत जाऊन
बसलो आमचे लक्ष निर्माल्य कलशाकडे गेले. तेथे कचरा गोळा करणारी बाई दिसली.
ती काय करते याकडे आमचे लक्ष गेले. तिने आपल्या जवळच्या एका पिशवीत हात
घातला. आणि एक थोडी जाडसर प्लास्टिकची पिशवी काढली. वाळुत एक खड्डा केला
छोटा. आता आमची उत्सुकता वाढली. त्या खड्ड्यावर ती पिशवी ठेवली. आपल्या
जवळच्या दुसऱ्या पिशवीतुन पाण्याची बाटली काढली आणि त्यातील पाणी त्या
खड्ड्यावरील पिशवीवर ओतले. बाजुलाच उभ्या असलेल्या कुत्र्याने ते पाणी
प्याले व समाधानाने निघुन गेला.त्यानंतर दुसरा कुत्रा आला त्याने उरलेले
पाणी प्याले.हे सर्व घडले त्यावेळी ती बाई तेथुन गेली होती.आणि आम्ही हे
दृश्य बघत होतो.
यातुन जे जाणवले ते असे : लोक कोणासाठी काही काम केले तर त्याचा गाजावाजा करतात.
आपले नांव यावे म्हणुन धडपड करतात.
एखादी व्यक्ती समाजोपयोगी काम करत असेल तर ती कशी आपल्या जवळची आहे. ते सांगतात.
पण.... या बाईने मात्र खरीखरी भूतदया केली.
हीच खरी ईश्वर सेवा.
हेच खरे पुण्यकर्म !!!

No comments:
Post a Comment